Buldhana News: धक्कादायक! दहावीत ६५ टक्के गुण, तरीही विद्यार्थ्याने संपवलं जीवन; बुलढाण्यातील घटना

10th Pass Student End Life: बुलढाणा जिल्ह्यात एका दहावी पास विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. संग्रामपूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
 दहावी पास विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना
10th Pass Student End LifeSaam Tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

दहावीचा निकाल (२७ मे) रोजी जाहीर झालाय. त्यानंतर एका दहावी पास विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. अनेकदा विद्यार्थी नापास झाल्यानंतर असं टोकाचं पाऊल उचलतात. पण, बुलढाण्यात दहावी पास विद्यार्थ्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांना धक्का बसत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव येथे गोकुळ प्रकाश ढेंगे नावाचा मुलगा दहावीत (10th Pass Student End Life) शिकत होता. यंदा त्याने दहावीची परीक्षा दिली होती. काल दुपारी एक वाजता दहावीच्या परिक्षेचा निकाल लागला. त्याने त्याचा निकाल चेक केला. परिक्षेत गोकुळला ६५ टक्के मार्क्स मिळाले होते.

त्यानंतर गोकुळ (10th Student) घरातील वरच्या माळ्यावर गेला आणि गळफास घेऊन जिवन संपवलं आहे. त्याच्या मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक गोकुळ याने शेगाव येथील शाळेत शिकुन दहावीची परीक्षा दिली होती. आता या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत (Buldhana News) आहे.

 दहावी पास विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना
10th SSC Result : पोरांपेक्षा पोरीच ठरल्या सरस, गुणवंतांचा टक्काही वाढला; वाचा दहावीच्या निकालाची महत्वाची वैशिष्ट्ये

गोकुळला दहावीत ६५ टक्के (10th Result) मिळाल्याची माहिती मिळत आहे. दहावीत पास झाल्यानंतरही गोकुळने असं टोकाचं पाऊल का उचललं? हा सर्वांसमोर प्रश्न निर्माण होत आहे. अजून गोकुळच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. त्याच्या मृत्युमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करून आत्महत्येचं कारण शोधत आहेत.

 दहावी पास विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना
SSC Exam Result 2024 : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी; नागपूरचा निकाल सर्वात कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com