Buldhana News: शेतमालाची राख; शॉर्टसर्किटमुळे घरातील १० क्विंटल कापूस जळाला, लाखो रुपयांचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे घरातील १० क्विंटल कापूस जळून राख; लाखो रुपयांचे नुकसान
Buldhana News
Buldhana NewsSaam tv

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे शॉर्टसर्किटमुळे सुमारे १० क्विंटल कापूस (Cotton) जळून खाक झाल्याची घटना घडली. आगीत शेतकऱ्याचे (Farmer) सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. (Live Marathi News)

Buldhana News
Pune Crime News: पोलिस हवालदाराचा महिलेवर अत्‍याचार; कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत धक्‍कादायक कृत्‍य

किनगाव जट्टू येथील शेतकरी श्रीराम आश्रुजी गायकवाड यांचे दुसरबीड रस्त्यावर शेत आहे. शेतातच त्यांचे घर आहे. दरम्यान डीपीची अचानक वायर तुटल्याने घरात शॉर्टसर्किट झाला. यावेळी घरात ठेवलेल्या कापसाला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. क्षणातच सर्व कापूस जळून राख झाला.

Buldhana News
Dhananjay Munde: लोकसभा निवडणुकीबाबत धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितले; दिल्ली माझ्यासाठी खूप लांब

कनेक्‍शन तोडल्‍याने बचावली जनावरे

घटनेच्या वेळी गोठ्यात जनावरे, चारा व इतर साहित्य जवळच पडले होते. घटनेनंतर तात्काळ कनेक्शन तोडण्यात आल्याने अनुचित प्रकार टळला. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी वासुदेव जायभाय यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com