VIDEO: अरे, हे काय चाललंय काय? राज्यात पुन्हा हिट अँड रनची घटना; सुसाट कारने पादचाऱ्याला उडवलं

Buldhana Hit And Run Case Accident: राज्यात आणखी एक हिट अँड रनची घटना घडलीये. बुलढाण्यात भरधाव कार चालकाने पादचाऱ्याला उडवले आहे. या अपघातात वृद्धाचा जागीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
अरे, हे काय चाललंय काय? राज्यात पुन्हा हिट अँड रनची घटना; सुसाट कारने पादचाऱ्याला उडवलं
hit and run Saam tv

बुलढाणा : राज्यात पुणे आणि नागपूरनंतर पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. बुलढाण्यातील मलकापूरमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. एका भरधाव कारचालकाने पादचाऱ्यास उडवले आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे. या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे, नागपूर त्यानंतर आता बुलढाण्यातील मलकापूरमध्ये हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. मलकापूर शहरात परप्रांतीय भरधाव वाहनामे पायी जाणाऱ्या व्यक्तीला उडवल्याने या व्यक्तीचा जागीचा मृत्यू झाला आहे.

अरे, हे काय चाललंय काय? राज्यात पुन्हा हिट अँड रनची घटना; सुसाट कारने पादचाऱ्याला उडवलं
Nandurbar Crime: लग्नसोहळ्यात अचानक लाईट गेली, अंधाराचा फायदा घेत चोरट्याने डाव साधला; तब्बल साडे सहा लाखांचे दागिने लंपास

या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हॉटेल यादगारजवळ ही भाषण अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. या कारचालकाने व्यक्तीला उडवल्यानंतर सुसाट पुढे गेला.

अरे, हे काय चाललंय काय? राज्यात पुन्हा हिट अँड रनची घटना; सुसाट कारने पादचाऱ्याला उडवलं
Freight train derailed : अहमदनगरमध्ये भीषण रेल्वे अपघात, मालगाडीचे डबे रुळावरून घसरले

नेमकं काय घडलं?

सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, एका कारने रस्त्यावर चालणाऱ्या पादचारी वृद्ध व्यक्तीला अक्षरश: फुटबॉल सारखं हवेत भिरकावलं. मलकापूरमधील हिट अँड रनची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या पादचाऱ्याला धडक देणारी कार गुजरात राज्याची असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.

या भीषण अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून काढता पाय घेत सुसाट पुढे गेला. या भीषण अपघातानंतर या जखमी पादचारी नागरिकाला मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी या पादचाऱ्याला मृत घोषित केले. मलकापूर पोलीस कार चालकाचा पोलीस शोध घेत आहे.

दरम्यान, नागपुरातही काही दिवसांपूर्वी हिट अँड रनची घटना घडली होती. या हिट अँड रनच्या घटनेनंतर आरोपी महिला कित्येक महिने फरार होती. या प्रकरणाच्या आरोपी महिलने पोलिसांना आत्मसमर्पण केलं आहे.

मध्यरात्री क्लबमधून घरी जाताना आरोपी रितिकाने दोघांना धडक दिली होती. या धडकेत दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर ही महिला फरार होती. त्यानंतर काल सोमवारी या आरोपीने पोलिसांना आत्मसमर्पण केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com