बुलढाणा: MSRDC कार्यालयावर पति-पत्नीचे शोले स्टाईल आंदोलन!

महिला सरपंचाचा पतीसह MSRDCच्या विरोधात आत्मदहनाचा प्रयत्न
Sholey Style Agitation
Sholey Style Agitationसंजय जाधव
Published On

संजय जाधव

बुलढाणा: मेहकर तालुक्यातील गंवढाळा कबंरखेडच्या महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव व पती गजानन जाधव हे दोघे पतिपत्नी एमएसआरडीसी विरोधात मेहेकर येथील कार्यलयाच्या इमारती वर हातात ज्वलनशील पदार्थ घेऊन चढले, जोपर्यंत मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत शोले आंदोलन (Agitation) सुरूच राहील अशी भूमिका पति व संपनच पत्नी यांनी घेतल्याने मेहेकर शहरात एकच गोंधळ उडाला होता. (Buldhana News In Marathi)

Sholey Style Agitation
वऱ्हाड निघालं बैलगाडीतून! नांदेडमधील कुटुंबाने जपलेली जुनी परंपरा...

मेहकर ते शेगांव हायवे सिमेंटरोडचे काम मागील दोन वर्षाअगोदर करण्यात आले. तो हायवे रोड गंवढाळा गावातून गेल्यामुळे येथील पाइपलाइन, दोन्ही साईटचे इलेक्ट्रिक विद्यूत खांब, विद्यूत रोहित्र, दोन्ही साईटचे पिवर ब्लॉक, एमएसआरडीसी व ए जी कन्सट्रक्शन कंपनीने उध्दवस्त केले म्हणून त्या कामाची दुरस्ती करण्यासाठी महिला सरपंचानी वेळोवेळी निवेदन दिले.

हे देखील पहा-

रास्तारोको, हंडानांद आंदोलन, रिकाम्या खुर्चीला बांगड्याचा हार घालून आंदोलन केले मात्र गेल्या दोनवर्षापासून शाखा अभियंता उदय भरडे यांनी दुर्लक्ष करुन कोणत्या कामाची दुरस्ती केली नाही. म्हणून गावाच्या विकासात्मक दृष्टितून नाईलाजास्तव कंटाळून महिला सरपंच ताई जाधव व पती गजानन जाधव यांनी एमएसआरडीसी कार्यलयाच्या दुसऱ्या मजल्यावर चढून पती पत्नी चढून अंगावर डिझेल घेण्यासाठी गेले होते व शोले आंदोलन सुरू केले. यावेळी डोणगांव हायेवर कार्यल्यासमोर एकच गोंधळ उडाला होता. त्यावेळी पोलीसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळ गाठून महिला सरपंच यांची समजूत काढली व त्यांना एमसीआरडीसी अधिकारी यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करून आत्मदहन करण्यापासून रोखले व अनर्थ टळला. (Buldhana News Updates)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com