वऱ्हाड निघालं बैलगाडीतून! नांदेडमधील कुटुंबाने जपलेली जुनी परंपरा...

अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा
वऱ्हाड निघालं बैलगाडीतून
वऱ्हाड निघालं बैलगाडीतूनसंतोष जोशी
Published On

संतोष जोशी

नांदेड: आजकाल तरुणाईत नवं काही तरी करण्याचं ट्रेंड आलयं.. विमान, जहाज आणि सोशलमिडीयावर लग्न असं हटके करण्याच्या जमान्यात नांदेडच्या एका कुटूंबाने जुनी परंपरा जपत चक्क बैलगाडीतून वऱ्हाडी मंडळी ची पाठवणी केलीय. या अनोख्या लग्नाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. (Nanded News In Marathi)

वऱ्हाड निघालं बैलगाडीतून
PM Modi Speech: संसदेत मोदींनी वाचला 'आज काँग्रेस नसती तर..." चा पाढा!

अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील शंकरराव बारसे यांचा मुलगा चि. सुशिल आणि एमशेटवाडी शिवकन्या भालेराव यांच्याशी पार पडला. यावेळी दोन्ही कुटूंबांनी जुनीपरंपरा जपत सहा बैलगाडीतून दहा किलोमीटर चा प्रवास करत वऱ्हाडी मंडळींची पाठवणी केली. यावेळी बैल जोडी आणि बैलगाडींची सजावट करत सनी चौघडां या पारंपारिक वाद्याचा वापर करत ही पाठवणी केलीय. अनोख्या सरप्राईज मुळे नव्या पिढीतले वर आणि वधुच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

पुर्वीच्या काळात दळनवनाचं साधन म्हणून बैलगाडी शिवाय पर्याय नव्हता आता बस, जिप, कार, रेल्वे विमान आणि हेलिकॉप्टर ची सुविधांचा वापर करत लग्न समारंभावर लाखोंची उधळपट्टी केली जाते मात्र, याला फाटा देत शेतकरी कुटूंबाने बैलगाडीतून वधु आणि संपुर्ण वऱ्हाडी मंडळीची पाठवणी करत पर्यावरणवादी विचार जपलाय.. या अनोख्या लग्नाची चर्चा तर होतच आहे त्याचबरोबर खर्चाचा अपव्यय आणि सामाजिक परंपरा जपणारी जपणारे बारसे आणि भालेराव कुटूंब इतरांसाठी आदर्शच ठरणारे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com