Buldhana Dhule Rain
Buldhana Dhule RainSaam tv

Buldhana Dhule Rain : बुलढाणा, धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस; उकाड्यापासून दिलासा

Buldhana dhule News : राज्यात उन्हाची तीव्रता अजूनही कायम आहे. अजूनही ४० अंशाच्या वर पॅरा आहे. यामुळे उन्हाचे चटके व उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
Published on

बुलढाणा/ धुळे : मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असून काही दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र या पूर्वी राज्यातील काही भागात अजूनही बेमोसमी पाऊस होत असून आज दुपारच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर धुळे जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. 

Buldhana Dhule Rain
Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये भाजपा कार्यकर्ताला शिंदे गटाकडून बेदम मारहाण; विकास कामाच्या श्रेय वादातून भांडण

राज्यात उन्हाची तीव्रता अजूनही कायम आहे. अजूनही ४० अंशाच्या वर पॅरा आहे. यामुळे उन्हाचे चटके व उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. (Buldhana) बुलढाणा जिल्ह्यात देखील सकाळपासुन कडक ऊन होते. वाढलेल्या उन्हामुळे नागरिक हैरान झाले होते. मात्र दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वारा व पावसाने (Rain) नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना आज दुपारी अचानक आलेल्या पावसाने दिलासा मिळाला. 

Buldhana Dhule Rain
Accident News : भरधाव ट्रक घुसला सलून दुकानात; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

धुळ्यात मुसळधार 

धुळे (Dhule) शहरासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून धुळे शहरांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात गारवा पसरल्यामुळे गर्मीपासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर मान्सून पूर्व कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com