बुलढाणा : चांडोळ येथील शेतातील विहिरीत एका 60 वर्षीय महिलेचे प्रेत आढळून आले. मृतक धनाबाई सुभाष गोमलाडू यांना त्यांच्या शेतात मारून राऊत यांच्या (Buldhana) शेतातील विहिरीत टाकण्यात आल्याची खळबळ जनक घटना चांडोळ शिवारात घडली. मृतक महिलेच्या कपाळावर एकाबाजूला जखम सुद्धा दिसून आली. तसेच अंगावरची साडी सुद्धा गायब होती. त्यामुळे सदरील घटनेत घातपात (Crime) झाल्याच्या शंकेला उधाण आले आहे. (Buldhana Crime News)
धाड पोलीस (Police) स्टेशन अंतर्गत असलेल्या बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील रहिवाशी मृतक धनाबाई सुभाष गोमलाडू (वय 60) या महिलेचे शेत पासोडी- चांडोळ रस्त्यावर मराठवाडा सिमेवर आहे. धनाबाई गोमलाडू ह्या 28 सप्टेंबरला शेतामध्ये गेल्या होत्या. परंतु त्या महिला सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा मुलगा व नातेवाईकांनी गावात तसेच आजु-बाजुच्या परिसरात शोध घेतला. तेव्हा शामराव राऊत यांच्या शेतातील विहिरीत त्या (Crime News) महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगताना निदर्शनास आले.
खून केल्याच्या होता संशय
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल पाटील हे पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी महिलेचे प्रेत विहिरीच्यावर काढल्यावर पंचनामा केला असता त्यावेळी मृतक धनाबाई गोमलाडू यांचे कपाळ चेपलेले तसेच अंगावरची साडी सुद्धा गायब होती. सदर घटमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलेचा कोणीतरी अज्ञातांनी खून केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
घटनेची फिर्याद गेंदुसिंग भाउलाल पाकळ यांनी धाड पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी मृतकाचा भाऊ हिरालाल रतनसिंग बलावणे, गोपीबाई हिरालाल बलावणे, संजय हिरालाल बलावणे व रंजीत हिरालाल बलावणे या चारही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास डीवायएसपी सचिन कदम आणि ठाणेदार अनिल पाटील, पो.उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपो.सचिन पाटील करीत आहे.
बदला काढण्यासाठी खून
भानामतीच्या संशयावरून महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तशी फिर्याद पोलिसात प्राप्त झाल्याने त्या दिशेने पोलीस तपास करित आहे. मृतक महिलेने आमच्या तरुण मुलास भानामती करून मारल्याचा आरोप मारेकरी करीत आहे. मुलाचा बदला काढण्यासाठी चक्क भावनेचं बहिणीचा खून केल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
डॉग स्कॉटने लावला तपास
चांडोळ शिवारात वृध्द महिलेस मारून ज्या विहिरीत फेकण्यात आले. त्या घटनास्थळी बुलढाणा डीवायएसपी सचिन कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथे डॉग स्कॉट पाचारण केले. घटनास्थळी ज्युली नावाच्या डॉग स्कॉटने झाडावरील पडलेल्या खुनाच्या डागावरून मृतक महिलेची मारेकऱ्यांनी लपवलेली साडी शोधून काढली. त्यावरून घटनेच्या तपासास गती मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.