Shirpur News: शेतातून पावणेपाच क्विंटल गांजा जप्‍त

शेतातून पावणेपाच क्विंटल गांजा जप्‍त
Dhule Shirpur News
Dhule Shirpur NewsSaam tv
Published On

शिरपूर (धुळे) : गांजाच्या लागवडी विरोधात सुरु केलेली मोहीम सलग दुसऱ्या दिवशी कायम ठेवून सांगवी पोलिसांनी फत्तेपूर (ता.शिरपूर) शिवारातील सोंज्यापाडा येथे शेतातून तब्बल पावणेपाच क्विंटल ओला गांजा जप्त केला. (Dhule Shirpur News)

Dhule Shirpur News
Bhandara: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; आठ दिवसात दुसरा बळी

फत्तेपूरजवळ सोंज्यापाडा (Dhule News) येथील जामसिंह जसमल पावरा (रा. सोंज्यापाडा) याने अतिक्रमित वन जमिनीवरील शेतात गांजाची लागवड केली होती. पीक कापून गांजाची विक्री होणार असल्याची माहिती सांगवीचे (Police) सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली. त्यांनी बुधवारी (28 सप्‍टेंबर) दुपारी सहकाऱ्यांसह छापा टाकला. शेतात सहा फूट उंचीची बहरलेली गांजाची झाडी पोलिसांनी उपटून काढली. या मुद्देमालाचे वजन चार क्विंटल 82 किलो 20 ग्रॅम भरले. त्याची बाजारभावानुसार किंमत 14 लाख 46 हजार 600 रुपये आहे. संशयित जामसिंह पावरा (वय 70) याला अटक करण्यात आली.

लागोपाठ कारवाई

सांगवी पोलिस ठाण्यांतर्गत अंमली पदार्थांविरोधात उघडलेल्या मोहिमेत सहायक निरीक्षक शिरसाट यांनी सलग दुसरी कारवाई केली. 27 सप्टेंबरला वकवाड येथे छापा टाकून त्यांनी 34 किलो गांजा जप्त केला होता. त्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली. पाठोपाठ सोंज्यापाडा येथे कारवाई करुन त्यांनी संशयिताला जेरबंद केले. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी दिनेश आहेर यांनी समाधान व्यक्त केले. अतिक्रमित वनजमिनीत खुलेआम गांजाची शेती सुरु असतांना वनविभाग मात्र अद्याप कारवाईपासून दूर राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com