Buldhana Crime: घरात कुणी नसल्याचे पाहून घुसला, १२ वर्षांच्या मुलीचा विनयभंग, आरडाओरडा करताच...

Buldhana Police: बुलडाण्यामध्ये १२ वर्षीय मुलीचा ६० वर्षांच्या व्यक्तीने विनयभंग केला. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने हे धक्कादायक कृत्य केले. आरोपीला महिलांनी पकडून चोपून काढलं.
Vashi Hospital Staff Caught on Camera Extorting Money from Grieving Family
Navi Mumbai Crimesamm tv
Published On

बुलडाण्यामध्ये १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक समोर आली. बुलडाण्याच्या मलकापूर येथे ही घटना घडली. मुलगी घरामध्ये एकटी असल्याचे पाहून ६० वर्षीय व्यक्ती घुसला. त्याने या मुलीचा विनयभंग करण्यास सुरूवात केली. मुलीने आरडाओरडा केल्यामुळे या व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गावातील महिलांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.

Vashi Hospital Staff Caught on Camera Extorting Money from Grieving Family
Nagpur Crime: मूल होत नसल्याने सासरच्यांकडून छळ, विवाहितेला मारहाण अन्...; लग्नानंतर १४ महिन्यातच संपवलं आयुष्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूरमध्ये राहणाऱ्या ६३ वर्षीय व्यवसायिक सुनील बुरडने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्याने बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात गैरव्यवहारातून शेती आपल्या नावाने करून घेतलेली आहे. या व्यवहाराला सावकारकीची किनार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी सुनील बुरड हा त्या गावात पोहोचला आणि ज्याच्याशी व्यवहार झालेला आहे त्याच्या घरी धडकला. त्यावेळी घरात १२ वर्षीय मुलगी एकटीच होती.

Vashi Hospital Staff Caught on Camera Extorting Money from Grieving Family
Crime: संभाजीनगरमध्ये रक्तरंजित थरार, तरुणाकडून तिघांवर कोयत्याने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू

बुरडने मुलीला तिचे आई-वडील कुठे आहे, अशी विचारणा केली आणि घरात घुसून तिला जवळ ओढून विनयभंग केला. पिडीत मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोपी सुनील बुरड लगेच बाहेर आला आणि मोटरसायकल घेऊन तिथून पळून गेला. पीडित मुलीने सदर घटना आपली आजी आणि वडील यांना सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात सदर घटनेबाबत फिर्याद दिली.

Vashi Hospital Staff Caught on Camera Extorting Money from Grieving Family
Akola Crime: ऑटो रिक्षाचा दुचाकीला धक्का अन् रात्रीच राडा, धारदार शस्त्राने वार करत एकाला संपवलं

पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोकुळसिंग राठोड करत आहेत. गावामध्ये सुनील बुरडचे हे निंदनीय कृत्य पसरताच त्याचा शोध घेऊन महिलांनी त्याला चपलेने बदडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vashi Hospital Staff Caught on Camera Extorting Money from Grieving Family
Pune Crime: वाट अडवली अन् कोयत्याने सपासप वार, तिघांकडून तरूणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यावर रक्ताचा पाट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com