बुलढाणा - हेरगिरीच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बुलढाणा (Buldhana) आणि गुजरात मधील गोधरा येथे छापे मारल्याची माहिती आहे. रात्री उशिरा हे छापे मारण्यात आले आहेत. जानेवारी 2020 मध्ये आंध्रप्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात हे छापे असल्याचं NIA ने म्हटलं आहे. दहशतवादी हल्ले करण्यासाठी संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
हे देखील पहा -
पाकिस्तानी हेरांची या कृत्यात सहभाग असल्याचा संशय NIA ला आहे. गुजरात मधील गोधरा व बुलढाणा येथे एकाच वेळी छापे मारण्यात आले असून यात काही संशयास्पद सिम कार्ड, संशयास्पद कागदपत्रे व काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले असून पुढील कारवाई सुरु आहे. अशी माहिती जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.