Buldhana Accident : भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक, नंतर दुचाकी धडकली, तिघांचा जागीच अंत; बुलढाण्यात विचित्र अपघात

Buldhana Accident : बुलढाण्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीन वाहनांचा हा विचित्र अपघात झाला आहे.
Buldhana Accident
Buldhana AccidentSaam Tv News
Published On

संजय जाधव, साम टिव्ही

बुलढाणा : राज्यात दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यात अनेक जणांचा मृत्यू देखील झाल्याचं समोर येतं. याचदरम्यान, बुलढाण्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीन वाहनांचा हा विचित्र अपघात झाला आहे. चिखली ते मेहकर रोडवर ट्रक, कार आणि दुचाकीमध्ये हा अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने कारला धडक दिली अन् त्यानंतर दुचाकीची ट्रक आणि कारला धडक बसली. या विचित्र अपघातात तीन निष्पापांचा मृत्यू झाला आहेय. चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं

दरम्यान, पुण्यात देखील एक भीषण अपघात झाला आहे. पुणे -अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रकने महिलेसह दोन लहान मुलांना चिरडले. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिची दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना कोरेगाव येथे घडली. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.

Buldhana Accident
Stampede in RCB Victory parade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीला गालबोट; चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- अहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव येथे ही अपघाताची घटना घडली. महिला आपल्या दोन मुलांना घेऊन दुचाकीवरून शिरुरकडे जात होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या टेम्पोने महिलेसह तिच्या मुलांना चिरडले. अपघातानंतर चालक टेम्पो घेऊन फरार झाला.

या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिची दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने तात्काळ जखमी मुलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. आरती सावंत असं मृत महिलेचे नाव आहे. तर स्वराज आणि स्वराली अशी गंभीर जखमी बहीण-भावाचे नाव आहे. या अपघाताचा तपास शिरूर पोलिस करत आहेत.

Buldhana Accident
Nagpur Crime: २ लाखांसाठी सासरच्यांकडून जाच, नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; लग्नानंतर ३५ व्या दिवशी आत्महत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com