Buldhana Bus Accident: रस्त्याचं काम आलं प्रवाशांच्या जिवाशी; भरावावरून बस उलटली, १२ प्रवाशी जखमी

Buldhana Bus Accident: गेल्या काही दिवसात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू असून अनेक वाहने रस्त्याच्या कडेला पलटी होत आहेत.
Bus Accident
Buldhana Bus Accident
Published On

संजय जाधव, साम प्रतिनिधी

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव ते पिंपळगाव राजमार्गावर प्रवाशांनी भरलेली एसटी बस रात्रीच्या वेळी पलटी झाली. या अपघातात १२ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना लागेच उपचारार्थ खामगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले.

घाटपुरी ते पिंपळगाव राजा रस्त्याचे काम सुरू आहे. त्या कामासाठी रस्त्याच्या बाजूला वाळू आणि खडीचा भराव टाकण्यात आलाय. या भरावावर बस चढली त्यानंतर बस पलटी झाली. गेल्या काही दिवसात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू असून अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उलटत आहेत.

कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात

अक्कलकोट तुळजापूर महामार्गावर कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर ४ ते ५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गावाजवळील घटना. तुळजापूरवरून अक्कलकोटच्या दिशेने भाविक देवदर्शनासाठी येत होते, त्यावेळीच काळाने घाला घातला.

चपळगाव येथे आल्यानंतर कंटेनर अनियंत्रित झाला त्यानंतर कंटेनरची दोन चारचाकी वाहनांना धडक दिली. या चारचाकी वाहनातील एक जण ठार झाला. तर चार ते पाच जण जखमी झालेत.

Bus Accident
Solapur Accident : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारवर कंटेनर पलटी, एकाचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी

सदर चारचाकी वाहन पुणे आणि लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळालीय. चपळगाव येथे मार्गावर झालेल्या अपघातात कंटेनर झाला पलटी तर चार चाकी वाहनाचं मोठं नुकसान झालं. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघात झाल्यानंतर उत्तर अक्कलकोट पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

पेट्रोल पंपावर थांबलेल्या स्कॉर्पिओ कारला लागली आग

सोलापुरातील पेट्रोल पंपावर थांबलेल्या स्कॉर्पिओ गाडीला अचानक लागली आग लागल्याची घटना घडली. आगीत स्कॉर्पिओ गाडी संपूर्ण जळून खाक झालीय. कार पेट घेतल्याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली मात्र अग्निशामक दलाची यंत्रणा घटनास्थळी दाखल नाही. कार पेट्रोल पंपच्या परिसरात होती, पण सुदैवाने अनर्थ टळला. दरम्यान स्कॉर्पिओला नेमकी कशामुळे आग लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com