Buldhana News: भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू, ६ जखमी

Buldhana Accident News: बुलढाण्यात भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडलं; या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू, ६ जखमी झाले आहेत.
Buldhana Accident News truck crushes sleeping laborers four dead six injured
Buldhana Accident News truck crushes sleeping laborers four dead six injured Saam TV

संजय जाधव, साम टीव्ही

Budhana Truck Accident News

बुलढाण्यात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडलं. या घटनेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना आज म्हणजेच सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली. (Latest Marathi News)

Buldhana Accident News truck crushes sleeping laborers four dead six injured
Buldhana News: खामगावात अचानक प्रगटले गजानन महाराज? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मजुरांना तातडीने उपचारासाठी मलकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृतांची नावे अद्याप समोर आली नाही. मात्र, प्राथामिक माहितीनुसार, सर्व मृत कामगार अमरावती जिल्ह्यातील असल्याची प्राथामिक माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा तालुक्यातील (Buldhana News) वडनेर भोलजी या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे.

या कामासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथून काही कामगार आले होते. रविवारी दिवसभर काम केल्यानंतर मजूर रस्त्याच्या कडेला असलेल्या टीनशेडमध्ये झोपले होते. दरम्यान, गाढ झोपेत असताना सोमवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एक भरधाव ट्रक आला आणि थेट टीनशेडमध्ये घुसला.

या घटनेत टीनशेडमध्ये झोपलेले मजूर चिरडले गेले. यातील ४ मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ६ मजुर गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

Buldhana Accident News truck crushes sleeping laborers four dead six injured
Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील ४८ तासांत पाऊस धुमाकूळ घालणार; 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com