दिलीपकुमार सानंदांनी घातली अवैध रेती साठ्यांवर धाड
दिलीपकुमार सानंदांनी घातली अवैध रेती साठ्यांवर धाड- Sanjay Jadhav

माजी आमदार सानंदांनी घातली अवैध रेती साठ्यांवर धाड

बुलडाणा : जिल्ह्यात Buldana Districtअवैध गौण खनिज उत्खनन वाढीस लागले असतानाच, गौण खनिज उत्खननाची परवानगी असलेल्या रेतीसाठ्यातून Sand क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाचे उत्खनन आणि साठवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार माजी आमदार दिलीपकुमार सानंदा Dilipkumar Sananda यानी पूर्णा नदीतील रेती घाटांवरील रेती साठ्यांवर धाडी घालीत उजेडात आणला. Ex MLA Dilip Sananda Raided illegal Sand Storage

यावेळी शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात वाहनारी सर्वात मोठी पूर्णा नदी मध्ये असंख्य अवैध रेती साठे वाळू माफियांनी तयार करुन ठेवलेले होते. याची माहिती माजी आमदार सानंदा यांना मिळताच त्यांनी तात्काळ महसूल मंत्र्यांना याची माहिती दिली. त्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातिल सर्व अधिकारी व माजी आमदार सानंदा यांनीरेती साठयावर अचानक धाडी टाकल्या असता साठवणूक केलेले हजारो ब्रास रेतीचे साठे आढळून आले.

हे देखिल पहा -

अधिकाऱ्यांनी ४ रेती साठे असलेल्या ९ ठिकाणांचे नव्याने स्थळनिरिक्षण आणि पंचनामे केले. त्यामुळे वाळू माफीया आणि महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील रेती घाटातून क्षमतेपेक्षा वाळू उपसा केल्या जात असल्याची तक्रार माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने थोरात यांनी जिल्हाधिकांयांना तात्काळ स्थळ निरिक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला रेती घाट, रेती साठवणुकीचे ठिय्ये यांचे नव्याने स्थळ निरिक्षण आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले.

दिलीपकुमार सानंदांनी घातली अवैध रेती साठ्यांवर धाड
व्हिडीओ अल्बमच्या शूटिंग दरम्यान मॉडेलचा विनयभंग करुन बदनामी

या ऑपरेशनची माहिती लीक न होऊ देता खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी शासकीय अधिकारी यांना सोबत घेत रेती घाटांवरील रेती साठ्यांवर धाडी घातल्या. यामध्ये शेगाव तालुक्यातील बोंडगाव रेती घाट, सोगोडा रेती घाट, संग्रामपूर तालुक्यातील ईटखेड रेती घाट आणि जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ रेती घाटातून परवानगी पेक्षा अधिक रेतीची उचल करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने विविध रेती साठे आणि रेती घाटांचा पंचनामा तसेच जीपीएस यंत्रणेद्वारे तांत्रिक तपासणी केली.

जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईत खामगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, जळगावजामोद येथील उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, शेगाव तहसीलदार शिल्पा बोबडे, संग्रामपूर येथील उपविभागीय अधिकारी तथा परिविक्षाधिन अधिकारी तेजश्री कोरे, संग्रामपूरचे तहसीलदार विजय चव्हाण, यांच्यासह बांधकाम विभाग, महसूल विभाग वनविभाग आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना सानंदा म्हणाले, "यावेळी करण्यात आलेल्या पाहणीत जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ रेती घाटातून रेती उपसासाठी खामगाव येथील समीर दुष्यंत दलाल यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच भास्तन येथे १२०० ब्रास रेतीसाठा साठवणुकीची परवानगी देण्यात आली. मात्र, या रेतीच्या ठिय्यावर प्रत्यक्षात १९०० ब्रास रेतीचा साठा आढळून आला. त्यामुळे याठिकाणी चक्क ७१० ब्रास रेतीसाठा अधिक आढळला. तर शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून क्षमतेपेक्षा अधिक रेतीची उचल करण्यात आली. नियमावलीनुसार एक मीटरपर्यंत उत्खन्नाची परवानगी असताना प्रत्यक्षात साडेसहा फुटापर्यंत रेतीचे उत्खनन करण्यात आले. महसूल आणि वन जमिनीवर देखील मोठ्याप्रमाणात उत्खनन करण्यात आले तर शासनाने जप्त केलेले रेतीचे साठेही चोरीला गेल्याचे स्थळ निरिक्षणात समोर आले,''

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com