नाशिक मधील त्रिरश्मी बुद्ध लेणीची प्रतिकृती अंबरनाथ येथील महाराष्ट्र बुद्ध लेणी संवर्धन व संशोधन या संस्थेचे प्रभाकर जोगदंड यांनी हुबेहूब साकारली आहे. बदलापूर परिसरात विश्वजीत पॅराडाईजमध्ये राहणारे प्रभाकर जोगदंड यांना एका संस्थेने बुद्ध लेणी प्रतिकृती बनवण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जोगदंड यांनी देखील सहभाग घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात जोगदंड यांनी नाशिकच्या प्रसिद्ध असलेली त्रिरश्मी बुद्ध लेणीची निवड केली आणि त्यानी घरीच ही लेणी बनवण्याचं काम सुरू केलं होतं.
जोगदंड हे मुंबई या भागात कार्यरत आहेत. आपल्या कामामधून वेळात वेळ काढून प्रतिकृती बनवली रोज संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर साधारणपणे सहा ते सात तास बसून ते या लेणीचे काम करत तर शनिवार रविवार त्यांना सुट्टी असल्याने ते दिवसभर या लेणीचे काम करत लॉकडाऊन मध्ये अनेकदा त्यांना साहित्य मिळण्यास खूप सार्या अडचणी त्यावेळी त्यांच्या मित्रांनी साहित्य उपलब्ध करून दिले आहेत.
ह्या लेणीचे वैशिष्ट म्हणजे त्रिरश्मी लेणीची हुबेहूब लेणी जोगदंड यांनी घरी साकारली आहे. या लेणी मध्ये चैत्र गृहा पासून एक इंच उंच जाडीचा थर करून त्यात अष्टकोणी स्तंभाचे संख्ये इतकी समोरा समोर सहा सहा आणि स्तूपाच्या मागे तीन अशी रचना आहे. लेणीची उंची स्तंभाची उंची आणि स्तूपाची उंची आणि इतर भागांवर काम केले आहेत. लेणी ची उंची पाच फूट लांब आणि तीन फूट उंचच अशी आहे. ही प्रतिकृती बनवण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून प्रभाकर जोगदंड यांनी साकारली आहे. यामध्ये सिमेंट रेती दगड माती रिकामे बॉक्सेस कापड सनबोर्ड एमसील फेविकॉल आणि घरात असलेले लाकडी पट्ट्या पुठ्ठा रंग असे अनेक गोष्टी या प्रतिकृती बनवण्यासाठी लागल्या असून ही संपूर्ण लेणी तयार करण्यासाठी दीड महिना त्याना लागला आहे.
ही लेणी बनवण्यासाठी जोगदंड यांच्या कुटुंबातील मुलगी ऋतुजा आणि मुलगा ऋषभ यांचा देखील मोलाचा सहभाग आहे तर ही लेणी पाहण्यासाठी आता जोगदंड यांच्या घरी नागरिकांनची गर्दी होत आहेत ज्या नागरिकांना नाशिक मधील त्रिरश्मी लेणी पाहू नाही शकत त्यांनी याठिकाणी येऊन ती पाहण्याचा आनंद घेऊ शकतात असे जोगदंड यांच्या पत्नीने सांगितलं.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.