25 April 2024 Latest Updates on Salman Khan, BJP, Nashik, Sangli, Elections, PM Narendra Modi and overall Maharashtra
25 April 2024 Latest Updates on Salman Khan, BJP, Nashik, Sangli, Elections, PM Narendra Modi and overall MaharashtraSaam TV

Today's Marathi News Live: गुजरातचा २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला सरकारची परवानगी

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (25 April 2024): देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...

गुजरातचा २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला सरकारची परवानगी

वाणिज्य मंत्रालयने परिपत्रक काढून दिली माहिती

८ डिसेंबरपासून केंद्र सरकारने लागू केलेली निर्यातबंदी हटवण्याची मागणी शेतकरी अनेक दिवसांपासून करत आहेत

मात्र त्याला अद्याप परवानगी न देता सरकारने फक्त गुजरातच्या पांढऱ्या कांद्या बाबत निर्णय घेतला

या कांद्याची निर्यात मुंद्रा पोर्ट, पिपापाव पोर्ट आणि नाव्हाशेव्हा म्हणजे जेएनपीटी पोर्टवरून केली जाणार

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता

बुलढाणा जिल्हाला अवकाळी पावसाचा तडाखा

लोकसभेचा प्रचार काल थांबला आज दिवसभर् उमेदवार घरोघरी जाऊन भेट घेत होते. दुपारच्या कडक उन्हात उमेदवार फिरताना दिसले मात्र सायंकाळी वातावरणात् अचानक गार्वा निर्माण झाला आणी विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तसेच बुलढाण्यासह इतर ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाली आहे . उद्या सकाळी जिल्ह्यात मतदानाला सुरुवात होणार आहे . उद्याचे वातावरण कसे राहील हे निसर्गच दाखवेल.

EVM आणि VVPAT बाबत उद्या सुप्रीम कोर्ट देणार निकाल

काल कोर्टाने सुनावणी नंतर हा निकाल ठेवला होता राखून

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांचं पीठ देणार निकाल

सकाळी १०.३० कोर्टात निकाल वाचन होणार

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या रणधुमाळीला उद्यापासून सुरुवात

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी उद्या २६ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार

दोन्ही लोकसभा मतदासंघांसाठी २६ एप्रिल ते ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत

तर ६ मे पर्यंत अर्ज माघारीची मुदत

दिंडोरी लोकसभेसाठी १९२२ मतदान केंद्र तर नाशिक लोकसभेसाठी असणार १९१० मतदान केंद्र

संवेदनशील मतदान केंद्रांवर असणार विशेष लक्ष

नाशिक जिल्हा बँकेत ठेवीदाराच आंदोलन, जिल्हा बँकेत उडाली धावपळ

भास्कर झाल्टे या ठेवीदाराने जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकासमोर काढले कपडे

जिल्हा बँकेत ठेवलेली फिक्स डिपॉझिट रक्कम परत मिळत नसल्याने केलं आंदोलन

बँकेतील कर्मचाऱ्यांना लज्जा उत्पन्न व्हावी म्हणून आपण कपडे काढण्याचा आंदोलनकर्त्याचा दावा

बँक अधिकाऱ्यांसमोर आंदोलन करताना अचानक कपडे काढल्याने जिल्हा बँकेत उडाली धावपळ

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयातील प्रकार

दिंडोरी लोकसभेत तिरंगी लढत, माकपचे जे.पी. गावीत उद्या भरणार उमेदवारी अर्ज

माकपचे जे.पी. गावीत उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत

जे.पी. गावीत यांची बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला अपयश

दिंडोरीत महा विकास आघाडीत बिघाडी

माकपच्या चिन्हावर गावीत निवडणूक लढवणार

भाजपने देखील शेतकऱ्यांना दिलेले वचन पाळले नाहीच; बच्चू कडू यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज जाहीरनामा प्रकाशित झाला, यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा जाहीरनामा नव्हे तर खंजरनामा अशी टीका केली यावर आमदार बच्चू कडू यांनी ,आज पर्यंत कोणताही पक्ष काँग्रेस असो की भाजप जाहीरनामा वचननामा नुसार वागत नाही , त्यामुळे त्या जाहीरनाम्याला काहीही अर्थ उरलेला नाही, अशी टीका केली.

TMC नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध दाखल केलेला मानहानीचा खटला घेतला मागे

वकील जय देहाद्राई यांनी TMC नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध दाखल केलेला मानहानीचा खटला घेतला मागे

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेला खटला घेतला मागे

शांततेसाठी हा निर्णय घेत आहे - जय देहाद्राई

खटला दाखल करताना जय देहाद्राई यांनी महुआंकडे 2 कोटी रुपयांची मागितली होती भरपाई

महुआंविरुद्ध आपण CBI कडे तक्रार केल्यापासून महुआ आपल्या विरोधात चुकीच्या, असभ्य आणि अपमानास्पद गोष्टी पसरवत असल्याच म्हणत त्यांनी हा खटला दाखल केला होता

देहाद्राई यांच्या आरोपानंतर महुआ यांच लोकसभेतून निलंबन करण्यात आल होत

Salman Khan News: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण;  आरोपींच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ

कोर्टात हजर केल असता विकी गुप्ता आणि सागर पाल यांना आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी

आरोपींना आर्थिक मदत कोण करत होत तसेच आरोपींकडे एकूण 40 राऊंड होते त्यातील पाच राऊंड त्यांनी सलमानच्या

घरावर चालवले तर 17 राऊंड पोलिसांनी तापी नदीतून जप्त केले मग उर्वरित राऊंड कुठे गेले याचा शोध लागणे बाकी

Lok Sabha Election : काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मोठ शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

जनता काँग्रेसच्या सोबत असून विजय आमच्या निश्चित होणार आहे.

लोकसभा निवडणुकीची धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे भाजपाने काँग्रेसचे बँक खाते बंद जरी केले असते तरी मतदार आमच्या बाजूने आहेत

जिल्ह्यातील प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनता मला निवडून देणार गोवाल पाडवी यांचं मत

Nashik News : मुलभूत सुविधा मिळत नसल्याने लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

नाशिकच्या नांदगाव तालूक्यातील जामदरीच्या खडके वस्तीवरील आदिवासी जनतेला गेल्या ३५ वर्षां पासून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने येथिल आदिवासी बांधवांनी दिंडोरी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा तहसिलदारांना निवेदन देऊन केला आहे.खडके वस्तीवर साधारण तीनशे ते चारशे आदिवासी राहतात मात्र वस्तीवर दळणवणासाठी रस्ता नाही,पिण्याचे पाणी मिळत नाही,शिक्षणाची सुविधा नाही त्यासाठी जंगलातून,पाण्यातून जीव मुठीत घेऊन जावे लागतं.

Maharashtra Election : नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं एकमत

नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, असं एकमत राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर झालाय. नाशिकच्या जागेचा तिढा लवकरात लवकर सुटावा, यासाठी वरिष्ठांना भेटून विनंती करणार करण्यात येणार आहे. उमेदवार कोण असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील.

Sangali Loksabha : सांगलीत काँग्रेसची सभा संपली; विशाल पाटलांचे समर्थक आक्रमक

बंडखोरी करणारे विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.

विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटलांचा प्रचार करणार अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडलीय. कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेमुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला.

सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्त्यांचा गोंधळ

- सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्त्यांचा गोंधळ

- वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घ्यावे यासाठी कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ

- स्टेज वरून खाली उतरून विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांच्या भावना घेतल्या समजून

Sharad Pawar News : ...तर तुतारी वाजवायला माणूसही पाहिजे - शरद पवार

शरद पवार नगरमध्ये काय म्हणाले?

घोटाळे करणारे फार हुशार...

काही लोकांना फक्त तुतारी चिन्ह दिलंय.

मात्र आपली निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे.

दिल्लीत नुसती तुतारी वाजणार नाही.. तर तुतारी वाजवायला माणूसही पाहिजे...

निलेश लंकेंना प्रचंड मतांनी निवडून द्या...

Arvind kejriwal: कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीकडून सुप्रीम कोर्टात तक्रार

ईडीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात तक्रार

अरविंद केजरीवाल यांनी तपासादरम्यान आपल्या मोबाईलचा पासवर्ड सांगायला नकार दिला

केजरीवाल तपासला सहकार्य करत नाहीत.

तपासात टाळाटाळ करणारी उत्तर केजरीवाल देत आहेत, त्यामुळं तपास करताना अडचणी येत आहेत.

ED ची कोर्टात प्रतिज्ञाप्राद्वारे माहिती

Nilesh Lanke : एकदा जोरात तुतारी वाजवा.. आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे - निलेश लंके

एकदा जोरात तुतारी वाजवा.. आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे, असे अहमदनगर-दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके असे म्हणाले.

Nashik : नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीला सुरुवात

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनार्थ शिवसेना कार्यालयात काकडे गटाचे बैठकीला सुरुवात झालीये. प्रचाराची दिशा नियोजन आणि विरोधकांचा समाचार घेण्यासाठी मार्गदर्शन पदाधिकारी करताहेत. 29 तारखेला वाजे आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याने महाविकास आघाडीतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही रॅली विक्रमी व्हावी यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रयत्न आहेत. माहितीचा उमेदवार अद्याप जाहीर न झाल्यामुळे सध्या ठाकरे गट उत्साहा मध्ये आहे वाजे यांच्या साध्या सोज्वळ प्रतिमेमुळे मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्ते उत्साहात आहे.

farmer News : साखर उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, मळीपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी 

शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारची परवानगी

6 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने बी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीला घातली होती बंदी

पण सरकारनं आता ही बंदी उठवल्यानं कारखानदारांसह शेतकऱ्यांना होणार फायदा

सरकारच्या या निर्णयामुळं बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली 700 कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास होणार मदत

सरकारच्या या निर्णयामुळं तब्बल 38 कोटी लिटरची निर्मिती वाढणार

या निर्णयामुळं इथेनॉल निर्मितीला मिळणार मोठी चालना

Sangli News: माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला 

माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला..

जत तालुक्यातल्या जिरग्याळ येथे तीन अज्ञातांकडून करण्यात आली दगडफेक.

काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ दौऱ्या दरम्यान सांयकाळी काल जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर घडला प्रकार.

विलासराव जगतापांकडून जत पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांच्या विरोधात

Raver Lok sabha : रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी भरला उमेदवारी अर्ज

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार यांनी आपला पहिला अर्ज दाखल केला आहे. आज जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी कार्यालयात रावेर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रक्षा खडसे यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना वेळ होणार आहे. अर्ज भरण्या वेळ झाला तर यासाठी आधीच एक अर्ज दाखल करणार आहे.

Supreme Court : सुप्रीम कोर्टातील वकीलांसाठी आनंदाची बातमी 

सुप्रीम कोर्टातील वकीलांसाठी आनंदाची बातमी

यापुढे केस संदर्भातील माहिती संबंधित वकिलांना व्हॉटसअप मेसेज द्वारे पाठवली जाणार

प्रकरणाची तारीख, मेंशनिग या गोष्टी व्हॉटसअप वर पाठवल्या जाणार

CJI धनंजय चंद्रचूड यांची घोषणा

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या आनंदात आपला छोटासा सहभाग असल्याची चंद्रचूड यांची प्रतिक्रिया

पुण्यात आज महायुती शक्तिप्रदर्शन करणार

पुण्यात महायुतीच शक्तिप्रदर्शन

मुरलीधर मोहोळ आज करणार उमेदवारी अर्ज दाखल

मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात महायुतीची प्रचार रॅली सुरू

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या रॅलीमध्ये होणार सहभागी

आरक्षणाची ५० टक्यांची अट बदलू - जयंत पाटील

जाहीरनामा प्रकाशित करताना जयंत पाटील काय म्हणाले?

- ⁠जात निहाय जनगणाना करु , त्यासाठी आग्रह धरु

- ⁠आरक्षणाची ५० टक्यांची अट बदलू

- ⁠खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण ठेवू

- ⁠ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणार

- ⁠अल्पसंख्यांकासाठी सच्चर आयोगाच्या शिफारशींसाठी अंमलबजावणी करु

- ⁠शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतुद ६ टक्यांपर्यत करू

- ⁠शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शुन्य टक्के जीएसटी ठेवणार

- ⁠अग्निवीर योजना रद्द करणार

lok Sabha : शरद पवार गटाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार जाहीरनाम्याचे आज प्रकाशन होत आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचा होणार जाहीरनामा प्रकाशित

जाहीरनाम्यात अनेक मुद्द्यांचा समावेश....

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला,तरुण,तसेच कामगार, जातनिहाय जनगणना,शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव, शाळांचा सेफ्टी ऑडिट यांच्यासह अनेक मुद्द्यांचा समावेश

Rahul Gandhi News : राहुल गांधी २ मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

राहुल गांधी २ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

प्रियंका गांधी देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार ?

राहुल गांधी अमेठी तर प्रियंका गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता

उद्या वायनाड मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर नावांची घोषणा होण्याची शक्यता

शिवसेना आमदार अपात्र प्रकरण : ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निर्यायाविरिधात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली.

१४ मे रोजी या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टाने यापूर्वी उद्याची म्हणजे २६ एप्रिल ही तारीख केली होती निश्चित

नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र केले नाही म्हणून ठाकरे गटाने दाखल केली आहे याचिका

या प्रकरणी शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे याचिका

या प्रकरणी सुप्रीम कोर्टात की मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार हे १४ मे रोजी स्पष्ट होणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.