Today's Marathi News Live: नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेवर नाशिक एसीबीची कारवाई

Tajya Marathi Batmya and Updates Live (24 April 2024) : देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...
Live Marathi News 24 April 2024 | Latest Updates on Nadurbar, Rahul Gandhi, Congress, Manoj Jarange Patil, Lok Sabha Election, PM Narendra Modi and overall Maharashtra
Live Marathi News 24 April 2024 | Latest Updates on Nadurbar, Rahul Gandhi, Congress, Manoj Jarange Patil, Lok Sabha Election, PM Narendra Modi and overall MaharashtraSaam TV

नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेवर नाशिक एसीबीची कारवाई

नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर नाशिक  एसीबीने कारवाई केलीय. गुजरात राज्यात एका आरोपीवर गुन्हा असल्याने या आरोपीला अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दीड लाखाची मागणी केली होती. एक लाख दिले गेले होते ५० हजार दिले जात असताना नाशिक एसीपी ने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे रंगेहात अटक केली.

एपीएमसी बाजारपेठ शौचालय घोटाळा, एपीएमसी संचालक संजय पानसरे यांना अटक

एपीएमसी संचालक संजय पानसरे यांना सौचालय घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने आज अटक केली.

उल्हासनगरमध्ये मंडपात घुसला टेम्पो, महिला, ८ वर्षांचा मुलगा जखमी

उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील कैलास कॉलनी भागात हनुमान मंदिर जवळ हनुमान जयंतीनिमित्त एक मंडप बांधला होता, या ठिकाणी ब्रेक फेल झाल्यामुळे एक टेम्पो मंडपात घुसला आणि या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून , तिचा आठ वर्षाचा मुलगा सुद्धा किरकोळ जखमी झाला आहे, सदर जखमी महिलेला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, घटनास्थळी हिल लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस पोहचले असून ते अपघाताचा पंचनामा करीत आहेत.

नंदुरबारमधील खांडबारा सब स्टेशनला भीषण आग

आगीत वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान...

जुन्या मीटर ढिगार्‍यात शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज...

खांडबारा परिसरातील 80 गावाचा विद्युत पुरवठा खंडित...

आग विझवण्यासाठी कुठलीही अग्निशामन यंत्रणा नाही...

नागरिक व स्थानिक ग्रामस्थांची आग विजवण्यासाठी प्रयत्न...

हवेचा जोर जास्त असल्याने आगीने तात्काळ रुद्ररूप धारण केले...

दोन किलोमीटर पर्यंत आगीचे लोट दिसू लागले...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज लातूरमध्ये मुक्काम

सोलापूर येथील प्रणिती शिंदे यांची प्रचार सभा आटोपल्यानंतर ते लातूरमध्ये मुक्कामी...

लातूर विमानतळावरून विमान उड्डानाची सोय नसल्याने ते लातूरच्या ग्रँड हॉटेल मध्ये मुक्कामी.

अचानक मुक्काम टाकल्याने जिल्हा प्रशासनांची तारांबळ...

स्वतः आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी उपस्थित...

लातूरच्या ग्रँड हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक सुरु....

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारात उद्या लातूरमध्ये रोड शो करतील अशा प्रकारची माहिती समोर येत आहे..

पुण्यातील गोल्डन ज्युबली इन्स्टिट्यूटला आगलेल्या आगीत मोठं नुकसान

भवानी पेठ कासेवाडी भागात

दुपारी दुपारी 4 च्या सुमारास घडली घटना

अग्निशमन दलाला नियंत्रण कक्षातून आग लागल्याची वर्दी मिळताच दलाच्या मुख्यालयातून एक फायरगाडी व एक वाॅटर टँकर मदतीने आग विझवण्यात आलीय. वीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवत पुढील धोका दूर केला.

या इन्स्टिट्यूट येथे मुलांचे वसतीगृह आहे. इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये असणाऱ्या वसतिगृहात दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 4 मध्ये आग लागली होती.

आगीमध्ये कोणीही जखमी नसून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीमध्ये गाद्या,बेंच, पंखे व इतर जीवनावश्यक वस्तु जळाल्याने नुकसान झाले.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मनोज जारंगे पाटील यांना आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना येरमाळा येथे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्याचबरोबर अशक्तपणा जाणवू लागला, त्यामुळे तातडीने त्यांना छत्रपती संभाजी नगरला आणण्यात आले. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज येरमाळा येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर पायी चालले असल्यानं त्यांना ऊन लागल्याने त्रास जाणवत होता असं त्यांच्या निकटर्तीयांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना सलाईन लावली आहे.

Maharashtra Loksabha : पूनम महाजन यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात

खासदार पूनम महाजन ह्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू केलाय. विशेष म्हणजे महायुतीकडून उत्तर मध्य मुंबईचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. तरी पूनम महाजन यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलीय. त्यांच्या प्रचाराचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. भाजपमधून उत्तर मध्य मुंबई आशिष शेलार, पराग आळवणी यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र असं असताना देखील खासदार पूनम महाजन यांना अद्याप उमेदवारी दिलेली नसली तरी मतदारसंघात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झालेली आहे.

Solapur Loksabha :  लोकसभा वंचित बहुजन आघाडीचा अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांना पाठिंबा

वंचितने जाहीर केलेले उमेदवार राहुल गायकवाड यांनी अर्ज मागे घेत नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. राहुल गायकवाड यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर वंचितकडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलाय.

कोयत्याने हल्ला झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे महावितरण कंपनी कार्यालयात एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती . एका अज्ञात दुचाकी वरून आलेल्या व्यक्तीने येथील महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता., त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक 15 मिनिटे उशिराने, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

टिटवाळा गाडी रद्द

वाहतूक उशिरा होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी

कोल्हापूर शहराला अवकाळी पावसाचा तडाखा

कोल्हापूर शहरासह उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात

जोरदार वाऱ्यामुळे संपूर्ण शहर परिसरात उडाला धुरळा

Maharashtra Lok Sabha : शिर्डीत वंचितचे जोरदार शक्तीप्रदर्शन, उत्कर्षा रूपवते यांनी भरला उमेदवारी अर्ज

शिर्डीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय.. काँग्रेसचा हात सोडून वंचितमध्ये दाखल झालेल्या उत्कर्षा रूपवते यांनी भव्य सभा आणि रोड शो घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. शक्ती प्रदर्शनातून रूपवते यांनी महायुतीआणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

Maharashtra Lok Sabha : दक्षिण मुंबईच्या तिढ्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्व हस्तक्षेप करण्याची शक्यता

दक्षिण मुंबई चा तिढा उदया सुटणार?

दक्षिण मुंबईच्या तिढ्या संदर्भात केंद्रीय नेतृत्व हस्तक्षेप करणार

दक्षिण मुंबईच्या तिढ्या संदर्भात लोकसभा भाजपा प्रभारी दिनेश शर्मा उदया सलग पाच तास बैठक घेणार

शिवडीत उदया सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत बैठक होणार

भाजपाचे दोन्हीही इच्छुक उमेदवार मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राहूल नार्वेकर आणि प्रमुख पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार

Rahul Gandhi Speech : अशी कोणती शक्ती नाही जी संविधानाला बदलू शकेल, राहुल गांधी

आज मी तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगायला आलोय

हे साधारण निवडणूक नाहीये

भाजचे लक्ष भारताच्या संविधानाला संपवायचे आहे आणि इंडिया आघाडीचे लक्ष लोकतंत्रला वाचावायचं आहे

दलित - आदिवासीना हक्क संविधानामुळे मिळाले आहे हे लोक संविधान संपावतील तर गरिबांसाठी कांही उरणार नाही

जगात अशी कोणती शक्ती नाहीये जीं भारताच्या संविधानाला बदलू शकेल

22 ते 25 लोकांना मोदींनी 16 लाख करोड रुपये सगळ्यात श्रीमंत लोकांना दिले आहेत

वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येची 75 लाख रुपयांची सुपारी

पुण्यातील शिवाजीनगर भागातील गोळीबार प्रकरण उघडकीस आणण्यास पोलिसांना यश

वडिलांसह ६ जणांना पोलिसांनी केली अटक

५० लाखांची सुपारी, २५ लाख दिले अन् २५ लाख काम झाल्यानंतर दिले जाणार होते

धीरज दिनेशचंद्र आरगडे या बांधकाम व्यवसायिकावर २ जणांनी गोळीबाराचा प्रयत्न केला होता

या घटनेचा सी.सी टिव्ही सुद्धा समोर आला होता

कर्नाटकातील मुस्लिमांना OBC मधून आरक्षण, ओबीसी आयोगाचा दावा

कर्नाटक राज्यातील मुस्लिमांना OBC मधून आरक्षण देण्यात येत असल्याचा ओबीसी आयोगाचा दावा

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने आकडे जाहीर करत केला दावा

कर्नाटक मधील सर्व जाती समुदाय यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये OBC मधून आरक्षण देण्यात येत आहे

श्रेणी B अंतर्गत सर्व मुस्लिमांना OBC मध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा राष्ट्रीय आयोगाचं म्हणणं

Lok Sabha Election : काँग्रेसने ७० वर्ष राममंदिर रखडवलं, अमित शहांचा आरोप

उद्धव ठाकेर राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत

काँग्रेसनेही राममंदिराच्या सोहळ्याकडे पाठ फिरवली

मोंदींनी आर्टीकल ३७० हटवून जम्मू काश्मीरच्या जनेतेला मोकळा श्वास घ्यायला दिलं

Lok Sabha Election : दक्षिण मुंबईच्या तिढ्यावर भाजपच्या मुंबई कार्यालयात बैठक

भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बोलावली बैठक

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह शेलार करणार चर्चा

आशिष शेलार व मंगल प्रभात लोढा मुंबईच्या वसंतस्मृती कार्यालयात दाखल

Maharashtra Politics 2024 : 15 वर्षांनंतर अजित पवार, दौंडचे भाजप आमदार राहुल कुल येणार एकाच व्यासपीठावर

पंधरा वर्षांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दौंड चे भाजप आमदार राहुल कुल येणार एका राजकीय व्यासपीठावर

भाजप कार्यकर्त्यांना अजित पवार करणार मार्गदर्शन

⁠⁠उद्या (गुरुवार )दुपारी तीन वाजता दौंड तालुक्यातील चौफुला येथे होणार भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

⁠मेळाव्यात अजित पवार आणि आमदार राहुल कुल पंधरा वर्षानंतर पहील्यांदाच राजकीय मंचावर एकत्र येणार

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी बीडमधून भरला उमेदवारी अर्ज, पहिली प्रतिक्रिया

बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला

अर्ज भरल्यानंतर माध्यमांना दिली पहिली प्रतिक्रिया

माझ्या कुटुंबात एक-दोन लोक नाहीत, ही जनताच माझं कुटुंब - पंकजा मुंडे

EVM आणि VVPAT बाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण, निकाल राखून

नवी दिल्ली -

EVM आणि VVPAT बाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण

सकाळी कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली

याचिकाकर्त्यांच्या वकिलांच्या सूचना देखील कोर्टाने ऐकून घेतल्या

कोर्टाने आधीच हा निकाल राखून ठेवला होता; मात्र कोर्टाला काही शंका असल्याने त्याची उत्तरे आज समजून घेतली

कोर्टाने निकाल ठेवला राखून

पुढच्या काही दिवसांत कोर्ट या प्रकरणाचा निकाल देणार

Sanjay Kshirsagar : मोहोळमध्ये भाजपला मोठा धक्का; संजय क्षीरसागर शरद पवार गटात प्रवेश

मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत मोहोळमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

Pravin Raut :  ED कडून प्रविण राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ७३.६२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त

पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे येथील भूखंड जप्त करण्यात आलाय. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडी ही कारवाई केलीय. आजच्या कारवाईनंतर या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची एकूण किंमत ११६.२७ कोटी रुपये आहे. प्रविण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत.

Pune Politics : पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांनी भरला उमेदवारी अर्ज

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार वसंत मोरे व शिरूर मतदारसंघातील आफताब अनवर शेख यांचाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभा घेतली.

Uddhav Thackeray Speech at Hingoli Rally :  त्या चोरांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

शिवसेना चोरली...पण त्या चोरांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.

निवडणूक आयोग त्यांचा घरगडी आहे.

सुप्रीम कोर्टाने सांगितलं की विधिमंडळ म्हणजे पक्ष नाही.

आपल्या सातबाऱ्यावर त्यांनी त्यांचं नाव टाकलं.

Maharashtra Politics : भाजप वरळीत करणार शक्तिप्रदर्शन करणार

भाजप वरळीत करणार शक्तिप्रदर्शन करणार आहे.

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली होणार सभा

आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला देणार आव्हान

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी करणार शक्तिप्रदर्शन

KJ

Jalgaon Politics : जळगावमध्ये शिंदे गटाने आदित्य ठाकरेंचा पुतळा जाळला

मुक्ताईनगरात शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांचा पुतळा जाळला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदित्य ठाकरे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांचा पुतळा जाळला

मुक्ताईनगर शिंदे गट आक्रमक होत मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकात आदित्य ठाकरे यांचा पुतळा जाळला.

यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी

Tamil Nadu Farmer : जंतर मंतरवर तामिळनाडूमधील शेतकऱ्यांच आंदोलन

जंतर मंतरवर तामिळनाडूमधील शेतकऱ्यांच आंदोलन

आंदोलन करताना शेतकरी झाडावर चढल्याने प्रशासनाची उडाली तारांबळ

झाडावर चढलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीत आंदोलन

केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकरी झाडावर चढल्याने अचानक सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली

सध्या ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना अज्ञातस्थळी हलवण्यात आल आहे.

Amaravati Politics : अमरावती जिल्हा प्रशासनाविरोधात बच्चू कडू समर्थक आक्रमक

अमरावतीच्या जिल्हा क्रीडा स्टेडियमवर बच्चू कडू यांचे हजारोंच्या संख्येने समर्थक जमायला सुरवात..

अमरावतीत बच्चू कडू करणार जोरदार शक्तिप्रदर्शन.

बच्चू कडू येतातच रॅलीला होणार सुरवात

रॅलीनंतर बच्चू कडू जिल्हा प्रशासनाविरोधात गनिमीकाव्याने आंदोलन करण्याची शक्यता

जिल्हा स्टेडीयमवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात

Jalna Politics : महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांचा उमेदवारी आज काँग्रेसचे नेते अमित देशमुख आणि राजेश टोपे यांच्या उपस्थितीत दाखल केला. यावेळी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अमित देशमुख जालना शहरातील जुना मोंढा भागात काळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. दरम्यान काळे यांचा या निवडणुकीत विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष असल्याचा दावा अमित देशमुख यांनी केला आहे.

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून ठिय्या आंदोलनाला सुरुवात

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होऊन निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी अर्ज केला होता. त्यांना दीड महिना उलटून गेल्यानंतरही फोटोकॉपी मिळालेली नाही, असा विद्यार्थ्यांचा आरोप

परीक्षा विभागात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी

इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

एडीआरकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिला आहे. त्या कंपन्यांची ईडी आणि आयटीकडून चौकशी सुरू असल्याचा याचिकेत उल्लेख आहे.

या कंपन्यांची एसआयटी स्थापन करून चौकशी केली जावी, अशी याचिकेत मागणी

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा

उद्या पुण्यात शरद पवार गटाच्या जाहीरनाम्याचे होणार प्रकाशन

राशपचे शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार जाहीरनामा प्रसिद्ध

उद्या सकाळी ९.३० वाजता पत्रकार परिषद घेत शरद पवार करणार प्रकाशन

लंकेंच्या पारनेर मतदारसंघात अजित पवार सभा घेणार

आमदार निलेश लंकेच्या पारनेर मतदारसंघात घेणार अजित पवार सभा

नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची घेतली अजित पवारांनी भेट

श्रीगोंदा आणि अहमदनगर, पारनेरमध्ये महायुतीचा धर्म सर्व पदाधिकारी पाळणार

पुण्यात आदित्य ठाकरेंचा होणार रोड शो

पुण्यात आदित्य ठाकरेंचा होणार रोड शो

मेच्या पहिल्या आठवड्यात होणार रोड शो...

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात...

काल काँग्रेसचे प्रचारप्रमुख मोहन जोशी यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट...

भेटीत रोड शो संदर्भात केली चर्चा...

शहराच्या मध्यवर्ती भागात होणार आदित्य ठाकरेंचा रोड शो...

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यासाठी २६ एप्रिलला होत आहे मतदान

१३ राज्यातील ८९ जागांसाठी होत आहे मतदान

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज महाराष्ट्रात अमित शाह, राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन

सायंकाळी ६ वाजता संपणार प्रचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ३ दिवसांत ७ सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ३ दिवसांत ७ सभा होणार आहेत.

महाराष्ट्राकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष लक्ष

२७, २९ व ३० एप्रिल रोजी मिळून ७ सभांचे नियोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींची २७ एप्रिलला कोल्हापूर येथे सभा

सोलापूर, सातारा व पुण्यात २८ एप्रिलला एकूण ३ सभांची मागणी

सोलापूर, धाराशिव व लातूर येथे ३० एप्रिलला ३ सभांचे नियोजन

धाराशिवमध्ये होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांची जाहीर सभा

महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी थेट नरेंद्र मोदी उतरणार मैदानात

30 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांची धाराशिव शहरात सभा होणार असल्याची अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांची माहीती

धाराशिव शहरात नरेंद्र मोदी यांची 30 एप्रिल सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार, अशी माहिती मल्हार पाटलांनी दिली.

तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठ भरणार

तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठ भरणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त उच्चशिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती विद्यापीठ निधीतून करण्यात येईल, अशी माहिती शैक्षणिक प्रवेश विभागाच्या वतीने देण्यात आला.या निर्णयामुळे तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.