Marathi News Live Updates: काँग्रेस प्रज्ञा सातव यांना 27 ते 28 मतांचा कोटा देण्याची शक्यता

Maharashtra Breaking LIVE Marathi Updates 11th july : मुंबईसह महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट, महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन, राजकीय घडामोडी घडामोडी, वरळी हिट अँड रन प्रकरण, मनोज जरांगे पाटील
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Vidhan Parishad Election : काँग्रेस प्रज्ञा सातव यांना 27 ते 28 मतांचा कोटा देण्याची शक्यता

काँग्रेस प्रज्ञा सातव यांना 27 ते 28 मतांचा कोटा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित मतांचा कोटा नार्वेकरांना द्यावा, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. याशिवाय काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मतं ही नार्वेकरांना द्यावी अशी देखील ठाकरे गटाची मागणी आहे.

Congress: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून आमदारांना व्हीप जारी

उद्या विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या मतदानासाठी काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांना व्हीप जारी आदेश प्रमाणे मतदान करण्याचा व्हीप जारी करण्यात आला

Nashik : नाशिक श्रमिक सेनेचा वतीने पुकारण्यात आलेला रिक्षा टॅक्सीचा संप मागे

नाशिक श्रमिक सेनेचा 12 जुलै रोजी गोल्फ क्लब मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत भव्य रिक्षा चालकांचा मोर्चा होता. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी योग्यता करीता प्रमाणपत्रासाठी आरटीओ प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारत होते. तो पन्नास रुपये दंड आकारणी मुख्यमंत्री यांनी विधानसभेत रद्द केले आहे.

Manoj Jarange-Patil : : जरांगे पाटील यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतुकीत बदल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 13 जुलै रोजी होणाऱ्या जन जागृती शांती रॅली कार्यालयाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झाला असून योग्य ती खबरदारी आता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्य नेतृत्वात संपूर्ण मराठवाड्यात ही रॅली काढण्यात येत असून या रॅलीचा समारोप हा संभाजीनगर मध्ये होणार आहे. यासाठी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून मराठा समाज बांधव यार आलेला मोठ्या संख्येने येणार असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Neet Exam Paper : नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधरला पुन्हा 4 दिवसाची सीबीआय कोठडी

नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधर याला आज लातूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान यावेळी न्यायालयासमोर दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. यावर कोर्टाने नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधर याला 4 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

Worli Hit And Run Case: आमदार रवींद्र धांगेकरांनी घेतली नाखवा कुटुंबीयांची भेट

वरळी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात कारच्या धडकेत कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील रवींद्र धंगेकर यांनी पीडित नखवा कुटुंबीयांची भेट घेतलीय. धंगेकरांनी नाखवा कुटुंबाच सांत्वन केलं. धंगेकर यांनी पुण्यातील पोर्शे अपघाताचं प्रकरण चांगलेच उचलून धरलं होत.

Pooja Khedkar:  पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्या घरच्यांना पाठवणार कायदेशीर नोटीस

पुणे पोलीस खेडकर यांना देणार कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. नोटीस दिल्यानंतर ई चलन करून दंड करण्यात येणार आहे. गेले दोन तासाहून अधिक काळ खेडकर यांच्या नातेवाईकांनी आतून गेटला कुलूप लावल्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाहीये, त्यामुळे आता वाहतूक पोलीस नोटीस बजावणार आहे. खेडकर यांनी वापरलेली त्या ऑडी कारवर वाहतूक नियमाचे पालन केल्याप्रमाणे 21 हजार रुपयाचा दंड आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरण; कार चालक राजऋषी बिडावतची न्यायालयीन कोठडीत रवानगी

BMW चा चालक राजऋषी बिडावतची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलीय. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे. मिहिर शहा यांने जुहू येथील बारमध्ये मद्य प्राशन केल्यानंतर त्याने आणि चालकाने मालाडवरून बिअरचे चार टिन विकत घेतल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली.

Manoj Jarange Patil:  मनोज जरांगे पाटील यांची रॅली बीड शहरातील जालना रोडवर दाखल

मनोज जरांगे पाटील यांची रॅली बीड शहरातील जालना रोडवर दाखल झालेत. काही वेळात छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार दाखल होतील. शिवरायांना अभिवादन करून मनोज जरांगे पाटील करणार जाहीर भाषण करणार आहेत. बीडमधून काय बोलणार मनोज जरांगे पाटील ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Naxalites Surrender:  गडचिरोलीत दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसर्पण

16 लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन महिला जहाल नक्षलवाद्यांनी आज गुरुवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई, अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला असे आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षलवाद्यांची नावे आहे. प्रमिला ही 2005 मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2011 पर्यंत कार्यरत होती. त्यांनतर वैरागड, कोरची दलममध्ये काम केल्यानंतर 2018 मध्ये कंपनी नं. 04 मध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) म्हणून बढती झाली. तिच्यावर आजपर्यंत 40 गुन्हे दाखल असून 20 चकमक, दोन जाळफोळ आणि 18 इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

Pooja Khedkar: पूजा खेडकर यांच्यावर होणार कारवाई, पुणे पोलिस निवासस्थानी दाखल 

पुणे पोलिसांचे पथक आयएएस पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. पूजा खेडकर यांनी चालवलेल्या गाडीवर बेकायदेशीरपणे दिवा लावणे या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे. पुणे पोलिसांचे पथक पाषाण येथील पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.

Beed News: बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती रॅलीला सुरूवात

बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीला सुरुवात झाली. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली आहे. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष रोड, माळीवेस चौक, अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल होणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार आहे

Vasai News: दगड खाणीत डंपर कोसळला, दोघांचा मृत्यू 

वसईमध्ये दगड खाणीत ३५० फूट दरीत डंपर कोसळला. दुर्घटनेत चालक आणि १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. खदानीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे भूस्खलन झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. समद शेख (२३ वर्षे) आणि नरेश पवार (१३ वर्षे ) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai News: काँग्रेस अदानी स्मार्टविरोधात आक्रमक, बीकेसीतील डीसीपी कार्यालयावर आंदोलन

काँग्रेसचे बीकेसीतील डीसीपी कार्यालयावर आंदोलन सुरू आहे. अदानी स्मार्टविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस अदानीच्या विरोधात आंदोलन करणार होतो. मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी अचानक नाकारली. जोपर्यंत परवानगी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही, अशा पवित्रा काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.

Mumbai News दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात भाजप नेते नितेश राणे यांची होणार चौकशी

दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती. दिशा सालियनची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी नागपूर अधिवेशनात केली होती. यानंतर सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचाही नितेश राणे यांनी दावा केला होता. मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली आहे.

 Maharashtra Politics : ग्रामीण आणि शहरी भागासाठी भाजप वेगळी रणनिती आखणार

भाजपच्या सोशल मीडिया टीमचे विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगळी व्यूहरचना आखण्यावर चर्चा झाली. विरोधकांचा खोटा प्रचार तात्काळ खोडून काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Vijay Wadettiwar : निवडणुकीच्या तोंडावर सरकार विरोधकांचा आवाज दाबणांरं विधेयक मंजूर करण्याच्या प्रयत्नात, विजय वडेट्टीवार

सरकारच्या विरुद्ध सार्वजनिक व्यवस्थेच्या विरुद्ध बोलला तर त्यामध्ये सुद्धा त्याला कारवाईसाठी आणि संस्थेवर सुद्धा बंदी घालता येईल, अशा प्रकारचं बिल मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशा प्रकारची व्यवस्था या देशात दिसतं आहे, म्हणजे इतर कोणत्याही संस्था सरकार विरुद्ध शासकीय व्यवस्थेविरुद्ध उद्या उभ्याच राहता कामा नये आणि त्याला लगेच बंदी घालून थांबवता येईल. देशांमध्ये केवळ एकमेव संस्था शिल्लक राहील अशा प्रकारची स्थिती मला दिसते आहे.

Bhandara Rain: भंडारा जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन

भंडारा जिल्ह्यात अखेर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात पाऊस पडत नसल्यामुळे धान रोवन्या खोळंबल्या होत्या. शेतकरी चिंतातुर झाला असुन दुबार पेरणीचे संकट येते की काय? या विवंचनेत शेतकरी राजा सापडला होता. अखेर आज जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला असुन धान रोवणीला वेग येणार आहे.

Raigad Accident: कंटेनर आणि ST बसचा भीषण अपघात,  चालकासह 6 प्रवासी जखमी

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर ST बस आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. 30 प्रवासी असलेल्या या बसमधील चालकासह सहा प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. शहापुरहून पंढरपुरला निघालेल्या या बसला जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खालापूर तालुका हद्दीत हा अपघात झालाय.

Dharashiv Breaking: तृतीयपंथीयाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, धाराशिवमध्ये खळबळ 

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर नाईचाकुर येथील तृतीयपंथीयाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. गावकऱ्यांकडून त्रास होत असल्याने वारंवार पोलीस प्रशासनाला विनंती करूनही कारवाई होत नसल्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय.

Sharad Pawar:  येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 225 जागा निवडून येतील; शरद पवार

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 288 पैकी विरोधकांच्या (मविआ) 225 जागा निवडून येतील, असं शरद पवारांनी आज सांगितलं आहे. निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Maharashtra Politics: शेतकऱ्यांची लूट करण्यात कृषिमंत्र्यांचा हात; माजी आमदार नांदेकर यांचा आरोप

यवतमाळच्या झरी जामणी शहरांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. दरम्यान पीक विमा कंपन्यांच्या बीड येथील एजंटांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लूट केली, यात कृषीमंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला आहे.

Beed Breaking: मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल झाले आहेत. बीडमध्ये सुरू असणाऱ्या धनगर समाजाच्या उपोषणाला जरांगे पाटलांनी भेट दिली. बीडमध्ये मराठा समाजाची मोठी गर्दी दिसत आहे.

Manoj Jarange:  मनोज जरांगे यांची शांतता रॅली उद्या जालन्यात, तयारी पूर्ण

उद्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात शांतता रॅली आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहेत. जवळपास 400 पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहेत. शांतता रॅली मार्गावर ड्रोनसह ,सीसीटीव्हीव्दारे पोलिसांचे लक्ष असणार आहे.अशी महिती जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिलीय.

Pandharpur News: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आपत्कालीन व्यवस्था तयार

हाथरस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आपत्कालीन व्यवस्था तयार करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळी हा परिसर आपत्कालीन व्यवस्थेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. येत्या 17 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे

Sangali News: विलंब शुल्क विरोधात रिक्षाचालक आक्रमक, सांगलीत बेमुदत ठिय्या आंदोलन 

केंद्र सरकारकडून रिक्षा आणि टॅक्सी वाहनांना लागू करण्यात आलेल्या विलंब शुल्क विरोधात सांगलीमध्ये रिक्षा, टॅक्सी आणि व्हॅन चालक-मालक संघटनेकडून बेमुदत संप करण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून सांगली शहरासह जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी रिक्षा व्यवसाय बंद ठेवत सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Neet Exam: नीट संदर्भात आजची सुप्रीम कोर्टातील सुनावणी टळली

नीट संदर्भात आजची सुप्रीम कोर्टातील सुनावणी टळली. नीटबाबत आज सुनावणी होणार नाही. १८ जुलैला होणार पुढची सुनावणी होणार आहे.

Dhule News:  गर्भवती महिलांची पोषण आहाराची रिकामी पाकीट पांझरा नदीत आढळली, धुळ्यात खळबळ 

गर्भवती महिलांना पोषण आहारासाठी शासनातर्फे दिली जाणारी पोषण आहाराची रिकामी पाकीट धुळ्यातील पांझरा नदी पत्रात आढळून आली आहेत. पांझरा नदीपात्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रिकामी पाकीट आली कुठून? ही पाकीट कोणी टाकली हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित ही पोषण आहाराची रिकामी पाकीट आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Pune Breaking: पूजा खेडकर प्रकरणी अपडेट, पंतप्रधान कार्यालयाकडून मागवला अहवाल

पूजा खेडकर प्रकरणी अपडेट आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवला गेला. आय ए एस होण्यासाठी आपण अंशतः अंध असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. पूजा खेडकर यांची वाशिमला प्रोबेशनरी आयएएस म्हणून बदली झालीय.

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अपघातातील मुख्य आरोपी मिहिर शाहला पुन्हा घटनेचे रिक्रिएशन केले. 

Mumbai News: नवीन पर्यटन धोरणास आज मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता

राज्याच्या नवीन पर्यटन धोरणास आज मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे.   तसेच महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक होण्यासाठी हे नवीन पर्यटन धोरण असेल. फाईव्ह स्टार हॉटेल, टुरिस्ट कंपन्या, ट्रॅव्हल एजंट यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे. सर्व राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करून हे धोरण केले असून यामुळे सुमारे १ लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे.

Manoj jarange Patil Rally Beed: बीडमध्ये जरांगे पाटलांची शांतता रॅली; मराठा बांधवांची गर्दी 

बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होत आहे. शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल होत आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होणाऱ्या या रॅलीसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी आता गर्दी केली आहे. 

Kolhapur News: विशाळगडावरील आंदोलन टाळण्यासाठी प्रशानाच्या हालचाली; छत्रपती संभाजीराजेंना बैठकीचे निमंत्रण

 येत्या 14 जुलैला संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वात विशाळगडावर होणाऱ्या आंदोलनाची कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने  दखल घेतली आहे.  विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात बैठकीला जिल्हा प्रशासनाने संभाजी राजे छत्रपती यांना निमंत्रण दिले आहे.  संभाजी राजे छत्रपती प्रशासनाने बोलवल्या बैठकीला जाणार का? याची  उत्सुकता आहे.   वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून विशाळगडावरील परिस्थितीची माहिती घेतली  14 जुलैला विशाळगडावर आंदोलन होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती  कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी दिली आहे. 

Pune News: पुणे पालिकेची कारवाई; अनधिकृत दुकानांवर बुलडोझर 

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. कोरेगाव पार्क भागातील अनधिकृत दुकानांवर पालिकेने धडक कारवाई करत ९० पेक्षा अधिक छोट्या आणि मोठ्या दुकानांवर बुलडोझर चालवला आहे.

Mira Bhayandar Crime: मीरा भाईंदर पोलिसांची कारवाई! दोन अट्टल गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार 

मीरा भाईंदरमधील सराईत गुन्हेगार लारा पालनाथ नाडार आणि गणेश मोहन शेट्टी या दोन गुन्हेगारांना मीरा भाईंदर परिमंडळ 1 पोलिसानी गंबीर दुखापत, गर्दी करून मारामारी करणे, दुखापत करून जबरी चोरी करणे या सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक केली होती. कोर्टाने 6 महिन्यासाठी हद्दपार करूनही त्याचे गुन्हेगारीरुतीत बदल न होता त्यांच्यावर 2024 ला खंडणी मागणे, महिला अत्याचार, अपंग व्यक्तीशी गैरवर्तन केल्याबाबतचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. एकूण 10 गुन्हे त्याच्यावर दाखल असून मीरा भाईंदर वसई विरार अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक उप आयुक्त प्रकाश गायकवाड परिमंडळ 1, आयुक्तालय यांनी ठाणे, पालघर, ब्रहन्मुंबई मुंबई, उपनगर या जिल्हायातून 2 वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

Maharashtra Politics: भाजपला धक्का! माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा शरद पवार गटात प्रवेश 

भाजपाचे उदगीर मतदार संघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे. शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होत आहे. राज्याचे क्रीडामंत्री, अजितदादा गटाचे आमदार संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव हे शरदचंद्र पवार पक्षातून अर्थात महाविकास आघाडीतून उदगीर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session: 'ससूनचा रिव्ह्यू ऑडिट होणार', फडणवीसांचे आश्वासन

राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पोर्शे अपघात अन् ससून रुग्णालयातील गैरप्रकारावरुन पुन्हा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ⁠ससूनच्या संदर्भात अनेक घोटाळे समोर आले आहेत. ससून हॅास्पिटलचे ओव्हर ॲाल रिव्हीव ॲाडिट करणे गरजेचे आहे, ते केले जाईल.. असे आश्वासन दिले.

Kalyan Dombivli Rain: कल्याण डोंबिवलीत पावसाची रिपरिप; चाकरमान्यांची पळापळ

गेल्या आठवड्याभरापासून पावसाने कल्याण डोंबिवलीत विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने नागरिकांची मात्र तारांबळ उडतेय. आज सकाळपासून कल्याण डोंबिवली ढगाळ वातावरण होतं. अकरा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. पावसाला जोर नसला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत तर काही वेळात पुन्हा पाऊस विश्रांती घेत आहे.

Manoj Jarange Patil Rally Beed: मनोज जरांगेंची बीडमध्ये शांतता रॅली; मराठा बांधवांकडून जय्यत तयारी!

बीडमध्ये थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. याच दरम्यान लाखोंच्या संख्येने मराठा समाज रॅलीत सहभागी होणार आहे. आणि याच समाज बांधवांना जेवणासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी समाज बांधवांनी पुढाकार घेतलेला आहे. तब्बल अडीच हजार किलो खिचडी बनवली जात असून 50 हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या इथे ठेवण्यात आलेल्या आहे. तर सुभाष रोड परिसरात दीड क्विंटल फुलाच्या हाराने स्वागत होणार आहे. बीड हे मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलं होतं. त्यामुळेच याच बीडमध्ये लाखोंच्या संख्येने आपली एकजूट दाखविण्याकरिता मराठा समाज शांतता रॅलीत सहभागी होणार आहे.

Solapur News: सोलापुरातील खड्ड्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक; वृक्षारोपन करत केला निषेध 

सोलापूर शहरातील रस्त्यांविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून महापालिका उपायुक्तांना चपलीने मारण्याचा दिला इशारा दिला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करत अधिकाऱ्यांच्या कोऱ्या प्रतिमा ठेवत ठाकरे गटाने निषेध केला. शहरातील निराळे वस्ती ते अरविंद धाम परिसरातील रस्ता ड्रेनेज करण्यासाठी 6 महिन्यापासून खोदून ठेवल्याने ठाकरे गट आक्रमक झाला असून ड्रेनेजच्या कामासाठी खोदण्यात आलेला रस्ता पूर्ववत न केल्याने गेल्या सहा महिन्यांपासून नागरिक त्रस्त आहेत.

Vidhan Parishad Election 2024: निकालाआधीच विजयाचा विश्वास; भाजप उमेदवारांचे बॅनर्स झळकले 

पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपने विधान परिषदेची उमेदवारी अमित गोरखे यांना जाहीर केली आहे. या विधान परिषद निवडणुकीत अमित गोरखे हे भाजपकडून विजय होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या काही सहकारी कार्यकर्त्यांनी विजय घोषणा होण्याआधीच अमित गोरखे यांना शुभेच्छा देणारे बॅनर पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात लावले आहेत.

तसेच भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांच्याकडूनही विजयाचे व्हॉट्सॲप स्टेटस झळकवण्यात आले आहेत. "चलो मुंबई, चलो मुंबई योगेशअण्णा टिळेकर यांची विधान परिषद महाराष्ट्र आमदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी चलो मुंबई" अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai Rain News: मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस; नागरिकांची तारांबळ 

मुंबई उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पश्चिम उपनगरात मागील पंधरा ते वीस मिनिटांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रे अंधेरी गोरेगाव जोगेश्वरी कांदिवली बोरिवली परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सकाळपासूनच मुंबई सह उपनगरात ढगाळ वातावरण असल्यामुळे जोरदार पाऊस पडण्याची चिन्ह होती अशातच वीस ते पंचवीस मिनिटांपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून सखल भागात पाणी साचाण्यास सुरुवात देखील झाली आहे

Pimpari Chinchwad Fire News: भोसरी एमआयडीसीमधील कंपनीला आग; कारण अस्पष्ट 

डी वाय पाटील मेडिकल कॉलेज जवळ असलेल्या सुवर्णा फायबर कंपनीच्या दुसऱ्या आणि तिसरा मंजल्यावर काल रात्री साडेअकरा वाजता दरम्यान अचानक आग लागली होती. ज्या वेळी कंपनीत आग लागली त्यावेळी त्या ठिकाणी कंपनीच्या किचनमध्ये काही गॅस सिलेंडर देखील होते तसेच कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर मटेरियल आणि केमिकल ड्रम साठवून ठेवले होते. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटनेचा टळली आहे. सुवर्णा फायबर कंपनीला आग नेमक कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

Nagpur News: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू 

 उमरेड नागपूर नॅशनल हायवेवर चांपा उपवन क्षेत्रातील VIT कॉलेज चक्री घाट परिसरात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.  ही घटन मध्यरात्री रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. बिबट्याच्या मृत्यूची माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाची टीम पोहचली असून उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.   आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जंगल परिसर असून स्त्यांवर ओलांडताना अपघात होतो, आणि अनेकदा काही जनावराचा मृत्यू झाल्याची घटना आहे. नॅशनल हायवे असताना कुठलाही वन्य प्राण्यांसाठी अंडरपास नसल्यानं घटना घडत असतात..

Thane Rain News: ठाण्यात पावसाला सुरुवात; नागरिक, विद्यार्थ्यांची तारांबळ

ठाण्यामध्ये आज सकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळ- सकाळी पावसाच्या सरी बरसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असतानाच शहरात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी आणि नागरिक यांची चांगलीच त्रेधतिरपीट उडाली आहे. सदरची रिपरिप दिवसभर सुरू राहणार आहे.

Nagpur Rain News: नागपूरात पावसाच्या सरींना सुरवात!

नागपूर शहरातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागकडून पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे..विदर्भात भंडारा गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली, जिल्ह्यात पुढील दोन तास पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: विधानपरिषदेची मोर्चेबांंधणी! आज शिंदे गटाच्या आमदारांची रंगीत तालीम

उद्या होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत  शिवसेना आमदारांना आज मतांचा कोटा ठरवून दिला जाणार आहे. मतदान कसे करावे? आकडे कसे लिहावे? याबाबत काल शिवसेना आमदारांना बैठकित सूचना करण्यात आल्या होत्या. काल काही आमदार बैठकीला नव्हते मात्र आज सर्वांना वांद्रेच्या ताज हाॅटेलला येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज रात्री विधान परिषदेच्या मतदानाची रंगीत तालीम वांद्रे ताज लॅड हाॅटेलमध्ये होणार आहे. कुठल्या आमदाराने कुठल्या उमेदवारांना मते द्यायची, याचे मार्गदर्शन आज होणार देण्यात येणार आहे.

Raigad Fort News: पर्यटकांसाठी गुड न्यूज! किल्ले रायगडावरील 'रोप वे' पुन्हा सुरू

रायगडावर जाणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. किल्ले रायगडावरील रोप वे सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.  रविवारी संध्याकाळी ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग आणि रोप वे बंद ठेवण्यात आले होते.  जिल्हाधिकारी रायगड आणि पुरातत्व विभागाने रोप वे बंद ठेवण्याची सुचना दिली होती. त्यानंतर  पावसाची परिस्थिती सामान्य झाल्याने आज पासून रोप वे ची सेवा पुन्हा सरू करण्यात आली आहे.

Kolhapur:  कोल्हापुरात पोलीस ऍक्शन मोडमध्ये! दारुच्या भट्ट्या उध्वस्त 

कोल्हापुरात पोलीस ऍक्शन मोडमध्ये!  माणगाववाडीत गावठी दारूच्या हातभट्ट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून उध्वस्त. पोलिसांनी माणगावात छापेमारी करत  तयार दारूसह लाखाचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला. याप्रकरणी दोघांवर हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाची कारवाई

Ashadhi Wari 2024: संत तुकोबारायांच्या पादुकांचा मुक्काम नव्या मंदिरात 

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम यंदा नव्या मंदिरात होणार आहे. प्रदक्षिणा मार्गावरील संभाजी चौकात नवीन संत तुकाराम महाराज मंदिर उभारले आहे. या नव्या कोऱ्या मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा पंढरपुरात मुक्काम असणार आहे. देहू संस्थानच्या वतीने पंढरपुरात नवीन पादुका मंदिराची इमारत बांधण्यात आली आहे. पाच मजली भव्य इमारत उभारण्यात आली आहे. पूर्वी कालिका देवी मंदिरा नजीकच्या जुन्या मंदिरात पदुकांचा मुक्काम असायचा. आता मात्र देहू संस्थानच्या नव्या इमारतीत मुक्काम असणार आहे

BJP Social Media Team Meeting: विधानसभेची मोर्चेबांधणी! भाजपच्या सोशल मीडिया टीमची आज बैठक

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या सोशल मीडिया व्यूहरचनेत मोठा  बदल  होणार आहे. विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियासाठी विशेष रणनीती आखण्यात येणार आहे.   केंद्रीय निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आज याबाबत आढावा घेणार आहेत. भाजप सोशल मीडिया सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसहित महत्त्वाच्या नेत्यांना करणार आज मार्गदर्शन करणार असून भाजप प्रदेश कार्यालयात आज सकाळी १० वाजता महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

Nanded News: दिलासादायक!  विष्णुपुरी धरणातील पाणी साठ्यात वाढ.

नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नसला तरी विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. विष्णुपुरी धरणाने तळ गाठला होता. धरणातील पाणी साठा 13 टक्क्यांवर येऊन ठेपला होता. महिनाभर पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याने नांदेडकरांची चिंता वाढली होती. परंतु मागील आठ दिवसापासून विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाणी साठा 42 पूर्णांक 82 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे नांदेडकरांची या वाढलेल्या पाणी साठ्यामुळे चिंता मिटली आहे.

 Sindhudurg News:  धारगळ ते मोपा विमानतळ लिंक रोडचे आज उद्घाटन

देशातील सर्वात उंच असा लिंक रोड गोव्यातील धारगळ ते मोपा विमानतळ असा बनविण्यात आला असून त्यांचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सायंकाळी ६ वाजता करणार आहेत. सहा किलोमीटर अंतर असलेल्या या देशातील सर्वात उंच लिंक रोड हा सहा लेन असलेला रस्ता आहे. या लिंक रोड वर टोल देखील आहे. मात्र देशातील सर्वात उंच लिंक रोड म्हणुन गोव्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

Nanded News: श्री. सत्य गणपती चरणी लाखोंचे दान

नांदेड जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान म्हणून अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील श्री सत्य गणपती देवस्थानची ओळख आहे.दर्शनासाठी भाविकांची येथे नेहमी मोठी गर्दी असते. मागील सहा महिन्यात श्री सत्य गणपती चरणी भाविकांनी भरभरून दान अर्पण केले आहे.साडेसोळा लाख रोख, तर 67 ग्राम सोने आणि 10 किलो चांदी भाविकांनी श्री सत्य गणपती चरणी अर्पण केली.

Pune Zika Virus : पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे.

एरंडवणे भागात काल आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे

शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या आता 16 पर्यंत गेली आहे.

Reservation Issue : आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक, ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता

आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सभापती नेमणूक आणि महामंडळ वाटप यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घेणार शरद पवारांची भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शरद पवारांची भेट घेणार आहेत.

मुंबईतील सिल्व्हर ओक येथील पवारांच्या निवासस्थानी भेट होणार आहे.

उद्या (१२ जुलै) सायंकाळी ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

संसदेच्या अधिवेशनाला येत्या २२ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

एनडीए सरकारचा अर्थसंकल्प हा २३ जुलैला सादर होणार आहे, त्यापूर्वी होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे.

Samruddhi Mahamarg : मोठी बातमी! समृद्धी महामार्गाला मोठ्या भेगा

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले आहे. एक वर्ष झाले नाही, तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरपासून जवळ असलेल्या माळीवाडा इंटरचेंजनजीक ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत.

Maharashtra FYJC admission : अकरावीच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीतही चढाओढ

अकरावीच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीतही चढाओढ पाहायला मिळत आहे.

नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ नव्वदीपार गेला आहे.

प्रवेश निश्चित करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अकरावीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीतील अंतिम गुणवत्ता यादीमधील ४९ हजार ८४८ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ७२६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आहेत.

Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटाचा पुणे शहरातील तीन जागांवर दावा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने पुणे शहरातील तीन जागांवर दावा ठोकला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी या मतदारसंघांवर सेनेने दावा ठोकला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आतापर्यंत दोन वेळा विजय मिळवला आहे.

MLC Election :  विधानपरिषद निवडणुकीची चुरस वाढली; सर्व राजकीय पक्ष अलर्ट 

विधानपरिषद निवडणुकीची चुरस वाढली आहे. उद्या,शुक्रवारी विधानपरिषद निवडणुका होणार आहेत.

सर्व राजकीय पक्षाची धाकधूक वाढली आहे. आमदार फुटू नयेत म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी खबरदारी घेतली आहे.

भाजपचं संख्याबळ पुरेसं असूनही भाजप चिंतेत असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या सर्व आमदारांना आज रात्री कुलाबा येथील ताज प्रेसिडेंट येथे ठेवण्यात येणार आहे.

NEET पेपरफुटी झालीच नाही, केंद्र सरकारचा सुप्रीम कोर्टात दावा

NEET पेपरफुटी झालीच नाही, असा दावा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केला आहे.

केंद्राने प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले. विद्यार्थ्यांच्या गुणांमधील तफावत ही अभ्यासक्रम कमी केल्यामुळे असल्याचते केंद्राने म्हटलं आहे.

२५ टक्के अभ्यासक्रम कमी केला म्हणून मार्क वाढल्याचा दावा केंद्राने केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.