Marathi News Live Updates: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण, SIT तपासाच्या मागणीचा निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखून

Maharashtra Breaking LIVE Marathi Updates 10th july : मुंबईसह महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट, महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन, राजकीय घडामोडी घडामोडी, पुणे झिका रुग्ण, बिहार रोड अपघात, तेजस ठाकरे
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Abhishek Ghosalkar Assassination case : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण, SIT तपासाच्या मागणीचा निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखून

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. एसआयटी तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारने घेतला पेट 

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कारने पेट घेतला. खालापूर टोल प्लाझा जवळ पुणे लेनवर ही घटना घडली असून सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. महामार्ग पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग टिम, देवदूत यंत्रणा आणि खालापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मदत पथकाला आग अटोक्यात आणण्यात यश आलं मात्र आगीत कार जळून खाक झाली आहे.

Konkan Railway : रत्नागिरी- कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू, ट्रॅकवर आलेली माती बाजूला करण्यात यश

पेडणे बोगद्यातील पाणी आणि ट्रॅकवर आलेली माती बाजूला करण्यात यश आलं आहे. त्यामुळे तब्बल 16 तासानंतर रत्नागिरी- कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू झाली आहे. पेडणे बोगद्यातून पहिली मालगाडी सोडून चाचणी केली गेली. आता बोगद्यातून एकेक गाडी सोडली जाणार आहे.

BJP Meeting : भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची उद्या बैठक, विधान परिषद, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा

भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची उद्या सकाळी 10 वाजता प्रदेश कार्यालयात सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीयसह संघटन मंत्री शिवप्रकाश, महाराष्ट्र भाजपाप्रमाणे भूपेंद्र यादव या बैठकीला उपस्थित असतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार असून विधान परिषदेच्या निवडणूकीवर देखील चर्चा होणार

Maharashtra Politics : मुंबईतील सर्व ३६ जागा निवडून आणण्यासाठी आढावा बैठक, आशिष शेलार यांची माहिती

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बैठक पार पडली आहे. मुंबईतील सर्व ३६ जागा निवडून येण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. जुलै-ऑगस्ट मध्ये २२७ वॉर्ड मध्ये १०० पदाधिकाऱ्यांची फौज २२७ वॉर्डमध्ये तीनदा प्रवास करणार आहे. आवश्यक त्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल आणि जास्तीत जास्त यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. १३ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात देखील चर्चा झाली, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

Vidhan Parishad Election Update: ठाकरे गटाच्या आमदारांना विधान परिषद निवडणूक होईपर्यंत हॉटेलमध्येच ठेवणार, आज स्नेहभोजन 

विधानपरिषद निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटातील आमदारांचे परेल येथील ITC ग्रँड हॉटेलमध्ये स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 12 तारखेला विधान परिषदेची निवडणूक असल्याने आमदारांना हॉटेलमधेच ठेवणार असल्याची माहिती आहे.

Vidhan Parishad Election:  विधान परिषदेची रणनीती ठरवण्यासाठी मुंबई भाजपची आज बैठक

आज संध्याकाळी मुंबई भाजपची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधान परिषदेची रणनीती ठरवली जाणार आहे. मुंबईतील सर्व आमदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी विधीमंडळात बैठक, सरकार चर्चेला तयार

धनगर आरक्षणासाठी विधीमंडळात बैठक होत आहे. सरकार धनगर आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यास तयार आहे. मंत्री गिरीश महाजन व मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे.

Raigad Warandha Ghat: रायगडमधील वरंध घाटावरील वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद

रायगड आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा वरंध घाट 31 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वहातुकीसाठी बंद करण्याची अधिसुचना रायगड जिल्हाधिकारी यांनी जारी केली आहे. नुकत्याच झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीदरम्यान दरड कोसळून रस्ता खचला असून त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतूकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झालाय.

Ambernath Municipality: अंबरनाथमध्ये अनधिकृत ढाबे आणि टपऱ्यांवर पालिकेची कारवाई

अंबरनाथमधील अनधिकृत ढाबे आणि टपऱ्यांवर आज पालिकेनं कारवाई केली. पालेगाव चौकातील चार अनधिकृत ढाबे आणि ८ ते १० टपऱ्यांवर नगरपालिकेने आज कारवाई केली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अनधिकृत ढाबे, बार, हॉटेल यांच्यावर राज्यभर धडक कारवाई सुरू आहे.

Manoj Jarange-Patil:  बीडमध्ये शांतता रॅलीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त, शाळांना सुट्टी 

मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बीडमध्ये शांतता रॅली आणि जन संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बीड शहरात होणारी गर्दी लक्षात घेता, शहरातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आलीय. याबाबतचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले असून सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना दिल्यात.

Worli Hit And Run Case:  वरळी हिट अँड रन प्रकरण; मिहीर शहाला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

वरळी येथे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोप मिहीर शहाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलीय. काल पोलिसांनी शहापूर येथून मिहीरला अटक केली होती.

Pune Police:  पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; दारू पिऊन गाडी चालवली तर लायसन्स होणार रद्द

पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात झालीय. पुण्यात गेल्या ६ महिन्यात १६८४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. मात्र यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिने रद्द केले जाईल. त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर ६ महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार मात्र तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

Amravati Rain: अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात साचले पाणी

अमरावती शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विनच्या परिसरात पाणी साचले. काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे आपत्कालीन विभागात पाणी शिरले होते.

Pune News: सव्वा कोटींची अवैध दारू जप्त, पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे युनिटने तब्बल सव्वा कोटींची अवैध दारू जप्त केली. उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या सुमारे 84 हजार बॉटल्स जप्त केल्या आहेत. हा माल एका ट्रकमधून अवैध मार्गाने महाराष्ट्रात दाखल झाला होता. जालन्याच्या दिशेने निघालेला हा ट्रक खेड शिवापूर टोल नाक्यावर पकडण्यात आला. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Pune News: पुण्यात आपचे आंदोलन, भाजपविरोधात घोषणाबाजी

पुण्यात आपचे आंदोलन सुरू आहे. मोबाईल कम्युनिकेशन कंपन्याच्या २५ टक्के दरवाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. बालगंधर्व चौकात आंदोलन केले जात आहे. यावेळी भाजप विरोधात आपने घोषणाबाजी केली.

Solapur News: सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाचा रस्तारोको आंदोलन

राज्य सरकारच्या विरोधात सोलापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे ठाकरे गटाने तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केलं. गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 तर म्हशीच्या दुधाला 70 रुपतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ठाकरे गटाच्यवतीने आंदोलन करण्यात आले.

Narayan Rane: मी उपद्रव देण्यासाठी खासदार झालो नाही - नारायण राणे 

'जातीचे राजकारण करू नये ही बाळासाहेबांची शिकवण आहे. मी उपद्रव देण्यासाठी खासदार झालो नाही. कारखान्यात नको म्हणणारा उद्धव ठाकरे येतो. चला म्हण रोजगार दे उद्धव ठाकरेंना सांगा ते चिऊ चिऊ चिऊ चिऊ करणारे शिवसैनिक. शिवसेना शिकवायला आता पिल्ल आली आहे. कारखाने बंद करायला आला तर घरी जाणार. तुम्ही मागे असले पाहिजे.

Nashik Hit And Run Case : नाशकात पुन्हा घडली हिट अँड रनची घटना, शाळकरी मुलीला बसने चिरडलं

नाशकात पुन्हा हिट अँड रनची घटना घडलीय. सिटी लिंक बस खाली शाळकरी मुलीला चिरडलंय. ही घटना नाशिकरोड परिसरातील घडलीय. बस चालक अपघातानंतर फरार झालाय. बस चालक दारू पिल्याचा आरोप जमावाने केलाय. दरम्यान गेल्या तीन दिवसात ही चौथी घटना आहे.

Mumbai Cricket Association: मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक; विहंग सरनाईकांनी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. येत्या २३ जुलैला निवडणूक होणार आहे. माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिकामी अजिंक्य नाईक एमसीएचे विद्यमान सचिव आहेत. आता विहंग सरनाईक यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. विहंग सरनाईक हे सध्या मुंबई प्रीमियरचे अध्यक्ष आहेत.

Nanded News: अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाचं आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज रस्त्यावर उतरत आहे. या मागणीसाठी प्राध्यापक रामचंद्र भराडे यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील आठ दिवसांपासून भराडे हे उपोषण करत आहेत. त्यांची तब्बेत खालावली असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज रस्त्यावर उतरत आहे. आज नांदेड ते भोकर या महामार्गावर मातंग बांधवानी रास्ता रोको आंदोलन केले आहे.

Nashik News: नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

नाशिकच्या संदर्भ रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. संदर्भ रुग्णालयातील औषधांचा तुटवडा आणि जिल्हा रुग्णालयातील नादुरुस्त शवागराविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शवागारातील यंत्रणा बंद असल्याने पसरणारी दुर्गंधी तसंच नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Worli Hit And Run Case: शिवसेना शिंदे गटातून राजेश शहा यांची हकालपट्टी 

हिट अँड रन प्रकरणांमध्ये आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Pune News: कश्मिर सहली बंद करा, कश्मिरवर आर्थिक बहिष्कार टाका; हिंदू महासंघाची मागणी

कश्मिर सहली बंद करा आणि कश्मिरवर आर्थिक बहिष्कार टाका अशी मागणी हिंदू महासंघाने केली आहे. 'जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासंघाने ही अजब मागणी केली आहे. हिंदूंच्याच पैशावर तेथील अर्थकारण आणि स्पष्ट सांगायचं तर जिहाद पोसला जात आहे आणि वर केंद्र परत कोटींची भीख त्यांना देत आहे.', असा आरोप हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे.

Kolhapur Breaking: हद्दवाढ झाल्यास सामूहिक आत्मदहन करणार, कोल्हापूरात 19 गावे आक्रमक

कोल्हापूरच्या हद्दवाढी विरोधात 19 गावे आक्रमक झालेत. हद्दवाढ झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न होणार आहे. येत्या रविवारी 19 गावं कडकडीत बंद पाळणार. शासनाने कोल्हापूरच्या हद्दवाढीचा निर्णय घेऊ नये, यासाठी 19 ग्रामपंचायतींचा एल्गार समोर आलाय.

Worli Hit And Run: वरळी हिट अँड रन प्रकरणात महापालिका ॲक्शन मोडवर, बारवर पालिकेकडून तोडक कारवाई

वरळी हिट अँड रन प्रकरणात आता महापालिका देखील ॲक्शन मोडवर आलीय. आरोपी मिहीर शहा आणि त्याच्या मित्रांनी ज्या बारमध्ये बसून दारू पिली होती, त्या बारवर आता पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईदरम्यान जुहू पोलिसांकडून या ठिकाणी संरक्षण देखील पुरवण्यात आलंय. पालिकेचा बुलडोजर देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे.

Solapur Breaking: सोलापुरात नीट परीक्षेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एसएफआय आक्रमक 

सोलापुरात नीट परीक्षेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एसएफआय आक्रमक झाली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट बाहेर मोठ्या संख्येने एसएफआयचे कार्यकर्ते जमा झालेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट बाहेर विद्यार्थी आक्रमक पवित्र्यात आहेत. आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Amol Kolhe: मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडीवर टीका करण्यापेक्षा तोडगा काढा, अमोल कोल्हे

मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडीवर टीका करुन संभ्रम निर्माण करण्यापेक्षा सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल, असा सक्षम तोडगा काढा असा टोमणा खासदार अमोल कोल्हेंनी सरकारला लगावला. आज मंचर येथे जनता दरबार भरलाय. यावेळी कोल्हे बोलत होते.

Kolhapur News: आंबेओहोळ धरण प्रकल्पग्रस्तांचं आज जलसमाधी आंदोलन

कोल्हापूरच्या उत्तूरमधील आंबेओहोळ धरण प्रकल्पग्रस्तांचं आज जलसमाधी आंदोलन आहे. नुकसाभरपाईचा प्रश्न मार्गी न लावल्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत. ३०० हून अधिक आक्रमक प्रकल्पग्रस्त आज आंबेओहोळ धरणात उड्या घेणार आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंबेओहोळ धरण परिसरात मोठा पोलीस बदोबंस्त आहे.

Nashik News:  नाशिकमध्ये पुन्हा भीषण अपघात, कारच्या धडकेत युवक ठार 

नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरीजवळ रात्रीच्या सुमारास घटना घडली. रस्त्यावर उभा असलेल्या एका युवकाला एका कारने जोरदार धडक दिली. अपघातानंतर युवकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले, दाखल मात्र उपचारापूर्वीच युवकाचा मृत्यू झाला होता.

Pune News: पुणे शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच,  महर्षीनगरमध्ये १० वाहने फोडली

पुण्यातील महर्षीनगर येथील क्रिसेंट हायस्कूल समोर वाहनांची तोडफोड झालीय. या घटनेत दहा वाहने फोडण्याची माहिती मिळतेय. यामध्ये टेम्पो आणि चार चाकी गाड्यांचा समावेश आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली असून एका अल्पवयीन तरुणाला या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

Kalyan News: कल्याण-नगर महामार्गवरील शहाड पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहनचालक त्रस्त

कल्याण नगर महामार्गावरील शहाड पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अखत्यारीत हा पूल येत असून संबंधित विभागाकडून या पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जातं असल्याचे दिसून येत आहे. पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहन चालक त्रस्त झालेत. दुसरीकडे या खड्ड्यात पाणी साचत असल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेकदा अपघात होत आहेत. .

Chandrapur Accident: चंद्रपूरमध्ये भीषण अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर खरबी-माहेर फाट्यावर कारचा भीषण अपघात झालाय. अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू तर ३ जण जखमी झाले. जखमींवर ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे ४:३० च्या दरम्यान कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. कारमधील लोक नागपूर येथून गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे लग्न सोहळ्यासाठी निघाले होते. चालकाचा डोळा लागल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Monsoon Session: विधानपरिषदेच्या आमदारांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

विधान परिषदेचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. काही शिक्षक आमदार विधानभवनाच्या पायऱ्यावर विविध मागण्यासाठी बॅनर घेऊन आंदोलन करत आहेत.

Konkan Railway: कोकण रेल्वे सेवा ठप्प, अनेक गाड्या रद्द

गोवा येथील पेडणे बोगद्यात रेल्वे रूळावर पाणी येत असल्याने कोकण रेल्वे सेवा ठप्प झालीय. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस, कोच्चिवली एक्स्प्रेस तसेच नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी व सिंधुदुर्ग या रेल्वे स्थानकावरून परतीच्या प्रवासाला म्हणजे मुंबईच्या दिशेने निघाल्या आहेत. तसेच मुंबईवरून येणाऱ्या कोकणकन्या व तुतारी ह्या गाड्या सावंतवाडी स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघतील. काल पासून गोवा पेडणे बोगद्यात भूगर्भातून पाणी व माती रूळावर येत असल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहे.

Maharashtra Government : कृषी क्षेत्रात महाराष्ट्र सर्वोत्तम, राज्याला मिळणार प्रतिष्ठित कृषी नेतृत्व पुरस्कार

कृषी क्षेत्रात महाराष्ट्र सर्वोत्तम ठरला आहे. महाराष्ट्राला मिळणार 15 वा प्रतिष्ठित कृषी नेतृत्व पुरस्कार मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पुरस्कार स्वीकारणार आहे.

Mumbai Water storage : मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम

मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम आहे,

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सुमारे 20% पाणीसाठा झाल्याची माहिती समोर आली आहे.

यवतमाळमध्ये शेतकरी आक्रमक; शासन-प्रशासनाला दिला तीन तासांचा अल्टिमेटम

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन

कुणाल जतकर या युवा शेतकऱ्यांच्या नेतृत्वात नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मगरूळ मोबाईल टॉवर चढून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन सुरू

तीन तासांत शासन आणि प्रशासनाने दखल न घेतल्यास मोबाईल टाॅवरच कीटकनाशक औषधी प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे

Jalna Rain : जालन्यात दमदार पाऊस, बळीराजा सुखावला

जालना जिल्ह्यात काल रात्री सर्वदूर पावसाने दमदार हजेरी

काही भागात शेतात देखील पाणी साचलंय.

दहा ते बारा दिवसानंतर आलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.

पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळालाय

Ratnagiri news : रत्नागिरीतील मंडणगाड तुळशी घाटात दरड कोसळण्याच्या घटना सुरुच

रत्नागिरीत अति मुसळधार पावसामुळे मंडणगड बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

तुळशी घाटात वारंवार दरड कोसळून वाहतूक ठप्प होत आहे.

CM Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांना देशातील यंदाचा १५ वा एग्रीकल्चरल टुडे ग्रुपचा पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देशातील यंदाचा १५ वा एग्रीकल्चरल टुडे ग्रुपचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अग्रीकल्चर इंडीया ग्रुपचा पुरस्कार सोहळा हा उद्या गुरुवारी सांयकाळी ६ वाजता दिल्लीला हॉटेल येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री स्वतः हजर राहणार आहेत. केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चव्हाण यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिला जाणार आहे.

Pune Zika Virus : पुण्यात झिकाची रुग्णसंख्या १५ वर

पुणे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या १५ वर पोहोचली आहे. झिकाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली आहे. पुणे शहरात झिकाचे नव्याने तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दोन गर्भवती महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.