Today's Marathi News Live: बच्चू कडू यांनी वर्ध्यातून निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची विनंती, भूमिकेकडे राज्याचं लक्ष

Maharashtra Latest News and Update in Marathi (28 March 2024): राज्यातील आणि देशातील महत्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
Today's Live News on Kejriwal, Mahavikas Aghadi Seat Sharing, Congress Candidate List, Loksabha Election 2024 and Overall Maharashtra by Saam TV News
Today's Live News on Kejriwal, Mahavikas Aghadi Seat Sharing, Congress Candidate List, Loksabha Election 2024 and Overall Maharashtra by Saam TV NewsSaam Tv

बच्चू कडू यांनी वर्ध्यातून निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची विनंती, भूमिकेकडे राज्याचं लक्ष

वर्धा लोकसभा मतदारसंघातील प्रहार चे प्रमुख पदाधिकारी आमदार बच्चू कडू यांच्या भेटीला..

आमदार बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची बच्चू कडू यांच्या कडे मागणी...

अमरावती जिल्ह्यातील दोन मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने निवडणूक लढवण्याची मागणी.

कालच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केले होते रक्तदान

अमरावतीत गौरी इन हॉटेल मध्ये प्रहारच्या बैठकीत बच्चू कडू यांची उपस्थिती

बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे लक्ष

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट, कुठे कुठे होणार लढत? कोण असणार उमेदवार?

दक्षिण मध्य मुंबई

अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे

शिर्डी

भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे

बुलढाणा

नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव

हिंगोली

नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील

मावळ

संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे

अजित पवार गटाला लक्षद्वीप लोकसभेसाठी घड्याळ चिन्ह मिळणार नाही

अजित पवारांच्या पक्षाला लक्षद्वीप लोकसभेसाठी घड्याळ चिन्ह मिळणार नाही

पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लक्षद्वीप मधील लोकसभा निवडणुकीसाठी घड्याळ चिन्हं वापरता येणार नाही

महाराष्ट्र आणि नागालँड मध्ये तूर्तास चिन्हं वापरायला परवानगी

लक्षद्वीप मध्ये पाहिल्या टप्प्यात होणार मतदान

लक्षद्वीप मध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युसूफ टी पी यांना दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार

निवडणूक आयोगा कडे राष्ट्रवादीचा अर्ज उशिरा दाखल झाल्यामुल आयोगाचा निर्णय

माढा मतदारसंघातून मराठा समाज देणार उमेदवार

माढा लोकसभा मतदार संघातून मराठा उमेदवार देणार असून विजयाचा गुलाल आमचाच असणार असा निर्धार सकल मराठा समाजाने आज केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरविण्यासाठी आज माळशिरस सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठक मराठा समाजाने एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलीवूड अभिनेते गोविंदा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

सगळ्यांचे लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांचं आज शिवसेनेत मनापासून स्वागत करतो. सगळ्यांना आवडणारे, सर्व समाजांत लोकप्रिय असलेले गोविंदा यांचे मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो.

जय महाराष्ट्र. मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. या दिवशी मी शिवसेनेत प्रवेश केला. मी २००४ ते २००९ मध्ये सुरुवातीला राजकारणात असताना, बाहेर पडल्यावर वाटलं होतं की मी पुन्हा कदाचित राजकारणात दिसणार नाही. परंतु, १४ वर्षांच्या वनवासानंतर मी पुन्हा सुरुवात करत आहे. एकनाथ शिंदेंच्या कृपेने मी पुन्हा या पक्षात आलो आहे. मी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन.

जर सन्मान मिळाला नाही तर वेगळा विचार, रामदास आठवलेंचा भाजपला इशारा

२ जागा आम्हाला हव्यात

शिर्डी मिळाली तर मी उत्सुक

सोलापूरही मिळावी ही इच्छा

आमच्या नेत्यांनी भाजपा सोबत चर्चा केली पण जागावाटपात आमचं नाव येत नाही

नव्यांचं नावं येतंय... जुन्यांचं येतं नाही

महायुती आरपीआयने पाठिंब्यामुळे झाली

रिप्लब्लिकन पक्षाकडे लक्ष दिलं जात नाही ही कार्यकर्त्यांची भावना आहे

सन्मान मिळावा ही अपेक्षा आहे

२ जागा द्यावा ही आमची आग्रही मागणी आहे

मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांचीभेट घेणार

केंद्रात १ मंत्रीपद मिळावं

राज्यात १ मंत्रीपद मिळावी

२ महामंडळ मिळावी

कार्यकर्त्यांना संधी मिळवी

१ विधानपरिषद मिळावी

विधानसभेच्या १०-१५ जागा मिळाव्यात

जर सन्मान मिळाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल

आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही

जागावाटपाबाबत bjp कडून चर्चा केली जात नाही

BJP अलायन्समधे निवडून येईल ही खात्री आहे

शिर्डीतल्या जनतेची माझ्यासाठी आग्रही मागणी आहे

मुंबईच्या दिंडोशी भागात गारमेंट दुकानाला आग

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरातील एका व्यापारी संकुलातील गारमेंट दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दप्तरी रोडवरील सेंट्रल प्लाझा या व्यापारी संकुलातील वर्धमान गारमेंट या दुकानाला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच फायर इंजिन दोन टँकर एक रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल झाली असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

नागपूरच्या चौदा मैल येथील एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भीषण आग

अमरावती रोडवरील १४ मैल येथील एल ॲण्ड टी लॉजिस्टीकपार्कला दुपारच्या सुमारास भिषण आग

लॉजिस्टीक पार्कमधून आगीचे प्रचंड लोट दिसतायत दूरवरून..

त्यामुळे आग चांगलीच पसरली आहे. अग्निशमन पथकाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू

आगीमुळे लॉजिस्टीक पार्कचे टीनाचे संपूर्ण शेड खाली बसल्याने अग्निशमनच्या पथकाला अडचण येत आहे.

अग्निशमन केंद्रातून तीन गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाले.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसेपाटीलांना गंभीर दुखापत

हात पाय आणि पाठीला दुखापत

रात्री अंधारात लाईट सुरु करायला जाताना पाय घसरुन पडले

दिलीप वळसेपाटलांवर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

प्रकृती स्थिर मात्र १२ ते १५ दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील असा अंदाज

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसेपाटलांवर निवडणूकीची मोठी जबाबदारी असताना दुखापत झाली

आढळरावपाटीलांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी दिलीप वळसेपाटलांवर आहे

अरविंद केजरीवाल यांच्यावरील सुनावणी पूर्ण, न्यायालयाने निर्णय राखून ठेवाला

अरविंद केजरीवाल यांचा न्यायालयात युक्तिवाद -

संपूर्ण खटल्यात माझं नाव फक्त चार वेळा आले आहे

कोणत्याही कोर्टाने आतापर्यंत मला दोषी करार दिलेला नाही

माझं नाव घेणाऱ्याला ED ने लगेच सोडून दिलं

बहुसंख्य आरोपींनी माझं नाव घेतलेलं नाही

शरद रेड्डी या आरोपीचा जबाब वारंवार बदलला आहे

अरविंद केजरीवाल युक्तीवाद -

अरविंद केजरीवाल यांचा न्यायालयात गौप्यस्फोट

55 करोड चे इलेक्टोरल बॉण्ड्स अरविंद फार्मा ने विकत घेतले

(अरविंद फार्माचा मालक या प्रकरणातील आरोपी होता)

आमच्याकडे बॉण्ड्सची कॉपी आहे

मी त्या कोर्टाला द्यायला तयार आहे

सुनावणी संपली

कोर्टाने निकाल राखून ठेवला

शिंदे गटाचे आ संजय गायकवाड यांचा नामांकन अर्ज दाखल

जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी किरण पाटील यांचेकडे नामानकन अर्ज दाखल.

राज्यभरात मार्च महिन्यात उष्माघाताची १३ प्रकरणे

सार्वजनिक आरोग्य विभागाने केली नोंद

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश

राज्यात १ ते २० मार्च या कालावधीत उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद

सर्वाधिक ४ जण बीड जिल्ह्यातील त्यानंतर रायगड जिल्ह्यातील दोन तर अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे, सातारा जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद

हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर लवकरच शिक्कामोर्तब

नाशिकचे सलग दोन वेळा खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लवकरच शिक्कामोर्तब केले जाईल, सूत्रांची माहिती

नाशिकमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला महाराष्ट्र भाजपमधून अंतर्गत विरोध

भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नाहीत, असा अहवाल दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला

त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता 

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्याभोवती एसीबी कठोर कारवाई करण्याची शक्यता

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्याभोवती एसीबी कठोर कारवाई करण्याची शक्यता

राजन साळवी यांचा दुसरा मुलगा अथर्व याची देखील एसीबीकडून चौकशी

रत्नागिरीमधील एसीबी कार्यालयात सुरु आहे चौकशी

यापूर्वी साळवी यांच्या पत्नी, मोठा मुलगा, भावजय, भाऊ, पुतण्या यांची देखील झालीय चौकशी

Latur Politics : डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा

Latur Politics : डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा

अर्चना पाटील चाकूरकर या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई

अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता लातूरमधून देखील अर्चना पाटील चाकूरकर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

रायगड लोकसभेवर भाजपचा दावा?, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या अडचणी वाढणार

रायगड लोकसभेवर भाजपचा दावा?

भाजपने रायगड लढण्यासाठी भाजप पदाधिकारी आक्रमक

खासदार सुनील तटकरेंच्या अडचणी वाढणार

शेकापमधून भाजपात आलेले धैर्यशील पाटीलही नाराज

भाजप पदाधिकारी धैर्यशील पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार

धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी

Today's Live News on Kejriwal, Mahavikas Aghadi Seat Sharing, Congress Candidate List, Loksabha Election 2024 and Overall Maharashtra by Saam TV News
lok Sabha : उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना नेत्यांना होतोय पश्चाताप? भाजपच्या भूमिकेमुळे शिंदे गटात अस्वस्थतेची चर्चा

नाशिकच्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेची पुन्हा तातडीची बैठक

नाशिकच्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेची पुन्हा तातडीची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळात होणार बैठक

पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, शहराध्यक्ष प्रवीण तिदमे ही कोअर कमिटी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

हेमंत गोडसे यांची समजूत काढण्यात अद्यापही यश नाही

नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास शिवसेनेत मोठ्या बंडखोरीची शक्यता

राज्यातील मराठा समाज महायुतीच्या विरोधात आक्रमक होऊ शकतो

असा अहवाल घेऊन ही कोअर कमिटी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेकडून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती

हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेकडून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा कंदील

आजच होणार माने यांच्या उमेदवारीची घोषणा

सूत्रांची माहिती

2019 प्रमाणे राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात होणार मुख्य लढत

Today's Live News on Kejriwal, Mahavikas Aghadi Seat Sharing, Congress Candidate List, Loksabha Election 2024 and Overall Maharashtra by Saam TV News
Pune News: पुणे जिल्ह्यावर पाणी संकट कायम; २६ धरणांमध्ये मिळून ५६.३१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी घेतली अभिनेता गोविंदा आहुजा यांची भेट

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी घेतली अभिनेता गोविंदा आहुजा यांची भेट

काही दिवसांपूर्वीच अभिनेता गोविंदा हा मुख्यमंत्र्याच्या भेटीला आला होता

गोविंदाला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे

लवकरच गोविंदा हा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना

कृष्णा हेगडेंनी गोविंदाची घेतलेल्या भेटीवरून ही शक्यता अधिक वाढली असल्याची चर्चा आहे

Govinda
Govinda

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये घराला भीषण आग

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये घराला भीषण आग

शॉर्ट सर्किट व सिलेंडरच्या स्फोटामुळे घराला भीषण आग

खेडमधील बहिरवेली नं. 1 येथे घराला रात्री 1.30 च्या सुमारास लागली भीषण आग

घराला लागलेल्या भीषण आगीत सर्व जळून खाक मोठ्या प्रमाणात नुकसान

सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही

बीडमध्ये धावत्या गाडीचा टायर निखळल्याने 2 कारचा भीषण अपघात

बीडमध्ये धावत्या गाडीचा टायर निखळल्याने 2 कारचा भीषण अपघात

अपघातात 5 जण गंभीर जखमी, बीडच्या मस्साजोग गावाजवळील घटना

बीड - लातूर राष्ट्रीय महामार्गावर चालत्या कारचे पाठीमागचे चाक रॉड तुटल्याने समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीवर आदळल्याने दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूला उलटल्या

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३.५२ कोटी रुपयांचं सोनं जप्त, कस्टम्स विभागाची कारवाई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३.५२ कोटी रुपयांचं सोनं जप्त

कस्टम्स विभागाची कारवाई

शरीरात लपवून तसेच कपड्यात आणि चेक-इन बॅगेतून केली जात होती सोन्याची तस्करी

वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ६.११ किलो सोन जप्त

सोन्यासह २०००० डॉलर्स आणि मोबाईल देखील करण्यात आले जप्त

विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात समेट?

विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात समेट?

महायुतीचा बारामतीचा मार्ग मोकळा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीला यश

विजय शिवतारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये मध्यरात्री चर्चा

मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा

शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात थोपटले होते दंड

आजची बैठक ही सकारात्मक झाल्याची माहिती.

शिवतारे एक पाऊल मागे येण्याच्या भूमिकेत

विजय शिवतारे उद्या पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार

विश्वसनीय सूत्रांची साम टीव्हीला माहिती

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा अखेर भाजपाच्या पारड्यात?

रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा अखेर भाजपाच्या पारड्यात?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे लढणार?

भाजप विरोधात शिवसेना उबाठा असा सामना रंगणार

नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होणार - सूत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com