महाराष्ट्र, उत्तर प्रदेशने मोदींच्या हिदुंत्वाचा पराभव केला. कारण त्यांचं ढोंगी हिदुत्व होतं,असं संजय राऊत म्हणाले.
वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला कॅबिनेटची मंजुरी दिली. कॅबिनेटनंतर अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिलीय.
अतिरिक्त पोलीस महासंचालक नवल बजाज यांची नवे एटीएस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नवल बजाज यांची एटीएसच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूकीत निवडून आलेल्या ७ खासदारांचा सत्कार समारंभ होईल.शिवसेना वर्धापन दिनाला ३ प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत.
दिल्लीत काल झालेल्या बैठकीनंतर राज्यातील नेत्यांना केंद्रीय नेतृत्वाने वन टू वन भेट न दिल्यामुळे भाजपचे काही नेते नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या पराभवाची कारणे नेत्यांना व्यक्तिगत स्तरावर वरिष्टांसमोर मांडायची होतीमात्र ती करणे सांगता न आल्यामुळे काही नेते नाराज झालेत.
NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय.NEET परीक्षेमधील दोषीवर कठोर आणि तात्काळ कारवाई करण्याची मागणी आप पक्षाच्या वतीने केली गेली. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना NEET ची परीक्षा देणे अनिवार्य असते.
- नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात
- मोठ्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी
- दुपारच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची काहीशी तारांबळ
- जोरदार पावसाला सुरुवात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
- शहरातील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू झालीय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्यांनी धुतल्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. रायगड जिल्ह्यात भाजप महिला आघाडीने या प्रकरणी नाना पटोले यांचा निषेध केला असून माणगाव एस टी स्थानकाबाहेर भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला.
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये आज दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. तसेच दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. रफियाबाद भागातील वॉटरगाम हदीपोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा झालाय.
आज केंद्र सरकारची कॅबिनेट बैठकीत वाढवण बंदराला मंजूरी मिळणार देण्यात आली. पालघर जिल्ह्यात हे वाढवण बंदर आहे. 25 फेब्रुवारी रोजी मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालं होत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई रिक्त पदांची प्रवर्गनिहाय भरती प्रक्रिया आज पासून सुरु होणार होती. मात्र कालपासून पडत असलेल्या पावसामुळे मैदान चाचणी घेण्यायोग्य नसल्याने सदर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेय. आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची चाचणी 23 जून रोजी होणार आहे. तर 21 जून आणि 22 जून रोजी जे उमेदवार येणार होते त्यांची मैदानी चाचणी आता 27 जून रोजी घेतली जाणार आहे.
राऊज अवेन्यु कोर्टाने 3 जुलैपर्यंत अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडी वाढ केलीय. न्यायालयाने दिलासा दिला नसल्याने केजरीवाल यांना तिहार तुरुंगातच राहावे लागणार आहे.
कल्याण-शीळ रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीत काही शाळांच्या बसेस देखील अडकल्याने शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
कल्याण शीळ रोड मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. मेट्रोचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या नियोजन नसल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडालाय .
राज्य सरकारने लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची दखल घेतल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे. येत्या २ दिवसांत सरकारचं शिष्टमंडळ हाके यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करेल, असं महाजन यांनी म्हटलं आहे.
आपापल्या पक्षातील अदृश्य नाराज शक्तींवर वाचक ठेवायला हवा.
शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा अजित पवार यांना टोला
नरहरी झिरवळ आणि छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून शिवसेनेचा टोला
रत्नागिरी
अपघातग्रस्त वाहने धडकून संरक्षक भिंत झाली कमकुवत, मुसळधार पावसात भिंत खचण्याची भीती
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते घाट हे अपघातप्रवण क्षेत्र, भोस्ते घाटात आतापर्यंत ५० हून अधिक अपघात
पावसाचा जोर वाढल्यास भेगा आणखी वाढून संरक्षण भिंतीसह महामार्गाचा भाग दरीत कोसळण्याची भीती
मुंबई उच्च न्यायालयाने दिली 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी
चित्रपटात काही बदल करण्यास निर्मात्यांनी सहमती दर्शवल्यानंतर प्रदर्शनाला मंजुरी
बदल केल्यानंतर प्रदर्शनास हरकत न घेण्याचे याचिकाकर्त्यांकडून मान्य
आज दुपारी दीड वाजता न्यायालय आदेश देणार
ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून, जालन्यामध्ये रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखली. जालन्यात धुळे - सोलापूर महामार्गावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता.
भाजप युवा मोर्चाकडून वरळीतील जांबोरी मैदानात नाना पटोले यांच्याविरोधात आंदोलन
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक
राज्यभर नाना पटोले यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चा आंदोलन करत आहे
नाना पटोले याचा फोटो जबोरी मैदान चिखलात टाकणार
दिलीप कांबळे, मावळ
लोणावळा शहरामधून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सर्व जड आणि अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेमध्ये कायमस्वरूपी बंदीचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले. १४ जून रोजी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. लोणावळा शहरामध्ये सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी व अपघाताच्या घटना लक्षात घेता हा आदेश लागू करण्यात आला आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीमध्ये सर्व प्रकारची जड-अवजड वाहने ही मनशक्ती येथून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वळवण्यात येणार आहेत. तसेच खंडाळ्याच्या दिशेने येणारी सर्व जड-अवजड वाहने यांना देखील प्रवेशबंदी आहे.
शिक्रापूर :
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या सणसवाडी येथे एका कंपनीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत एक जण ठार, तर पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच दोन कार, आणि सात ते आठ दुचाकींचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच आमदार अशोक पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.
सुप्रिया सुळे यांना तुम्ही मताधिक्यानं जिंकून दिलं. एक जागरूक खासदार म्हणून त्यांचे नावलौकिक आहे. त्यांच्या कामाला तुम्ही प्रोत्साहन दिलं. तुमच्या पाठिंब्यामुळं हे यश मिळालं, अशा शब्दांत शरद पवार यांनी मतदारांचे आभार मानले. आता विधानसभा निवडणुकीचाही विचार करावा लागेल, असं सांगतानाच राज्य हातात घ्यायचं असेल तर, येत्या दोन ते तीन महिन्यांत आपल्याला काम करावं लागेल, असंही पवार म्हणाले.
नवी दिल्ली
हरियाणातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि आमदार किरण चौधरी आणि त्यांची मुलगी श्रुती चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश
भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत प्रवेश
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे काल चौधरी यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका पहाता चौधरी यांचा भाजप प्रवेश महत्वाचा
- नाशिकमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन
- नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात भाजपचं आंदोलन
- नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्याला हीन दर्जाची वागणूक दिल्याचा भाजपचा आरोप
- नाना पटोले यांच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन
- नाना पटोले यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीजवळ ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग अडवला होता. यावेळी काहींनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी ३७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
हिंगोलीच्या वसमत शहरात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बुडेवार यांच्या सहा ते सात जणांनी आपापसात रस्त्यावर हाणामारी करत धुडगूस घातल्याची घटना घडली आहे, या घटनेनंतर वसमत पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यासह ७ ते ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांची धरपकड सुरू केली आहे. दरम्यान रस्त्यावर आपापसात हाणामारी करण्याचं कारण अद्याप पुढे आलं नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
सांगली जिल्हा पोलीस दलात 40 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी तब्बल 1750 अर्ज पोलीस दलाकडे प्राप्त झाले आहेत. पुढील तीन दिवस ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. ही पोलीस भरती पारदर्शी पार पडणार असून खुद्द पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे स्वतः या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत.
सांगलीत 40 जागांसाठी पोलीस भरती होत असून 1750 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. आज पहाटे 6 वाजलेपासून सांगलीत पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आज दिवसभरात 746 पोलीस शिपाई आणि 67 पोलीस शिपाई चालक करिता असे एकूण 813 उमेदवार पोलीस भरती करिता आले आहेत.
धाराशिव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पोलीस दलातील 44 चालकाच्या पदासाठी 4503 तर 99 पोलीस शिपाई पदासाठी 3497 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. इनकॅमेरा उमेदवारांची शारीरीक चाचणीच्या प्रक्रिया सुरू करण्यात आली.
कार्यकर्त्याकडून चिखलाने माखलेले पाय धुवून घेतल्यामुळे विरोधकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. आज नागपुरातील भाजप महिला पदाधिकारी पटोले यांच्या निषेध व्यक्त करत आंदोलन करणार आहे.
वर्धा रोडवरील नाना पटोले यांच्या अपार्टमेंट खाली भाजपच्या महिला पदाधिकारी आंदोलन करणार असल्याचा माहिती पोलिसांकडून मिळत आहे. कुठलाही अनूचित प्रकार घडून नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज पोलीस भरतीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 149 पोलिस शिपाई आणि 21 चालकपदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी तब्बल 8 हजार 713 अर्ज उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, पोलीस भरतीची मैदानाची चाचणी सुरु असताना अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली.
एखाद्या दिवशी जास्त पाऊस असेल, तर त्या दिवशीच्या उमेदवारांना इतर दिवशी चाचणीची व्यवस्था केली जाईल, अशी माहिई पोलीस अधीक्षकांनी दिली.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यांचा आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. आज विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवर हाके यांची भेट घेणार आहे. तर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील भेट घेणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील लक्ष्मण हाके यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान लक्ष्मण हाके यांची तब्येत खालावल्याने काल ओबीसी बांधव चांगलेच आक्रमक झालेले होते. आज प्रशासनाच्या वतीने जालन्याचे जिल्हाधिकारी देखील आंदोलकांची भेट घेणार आहे.
जालन्यातील मंठा तालुक्यातील हेलस शिवारात खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.. वेदांत गणेश खराबे (वय १३), प्रणव भाऊसाहेब खराबे (वय १३, दोघे रा. हेलस, ता. मंठा) अशी मयतांची नावे आहेत.
गेल्या आठवड्यापासून मंठा आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागातील खदानींमध्ये पाणीसाठा झाला आहे. हेलस येथील जिल्हा परिषदेच्या आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारे वेदांत खराबे व प्रणव खराबे हैे दोन मुलं गंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास गावच्या शिवारातील खदानीत पोहण्यासाठी गेले होते.
जालन्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून लक्ष्मण हाके उपोषणला बसले आहेत. सरकारकडून उपोषणाची दखल न घेतल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली आहे. त्यामुळे ओबीसी बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत.
दरम्यान काल रात्री धुळे-सोलापूर महामार्गावर जामखेड फाटा येथे ओबीसी आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केले. टायर जाळून यावेळी शासनाचा निषेध देखील करण्यात आला. यामुळे बऱ्याच वेळ रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.
मुंबईतील जवळपास ५० हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी दिल्यानंतर आता पालिका मुख्यालय, कॉलेज आणि विमानतळावर देखील बॉम्बची असल्याची धमकी मिळाली आहे. ई-मेलवर मिळालेल्या या धमकीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
सलग आलेल्या धमक्यांमुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. आत्तापर्यंत काहीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती मुंबई पोलिसांची दिली आहे. सध्या धमकीचे मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.