देशात लोकशाहीची हत्या...
मात्र सर्वसामाण्यांची ताकत मोठी...
इंग्रज पळून गेले मात्र तुम्ही कुठे पळून जाणार?
बदली आदेशासाठी उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड आणि बनावट सहीचाही वापर...
गृह विभागानेच परीपत्रक काढुन दिली माहीती...
बनावट ईमेल, लेटरहेड आणि सहीच्या वापरानंतर राज्य सरकार खडबडुन जागे...
सर्व विभागांना अधिकृत ईमेल वापरणे बंधनकारक...
Gmail, आणि इतर खाजगी मेलचा वापर शासकीय विभागांना आता करता येणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अपात्र प्रकरणी उद्या राहुल नार्वेकर निर्णय येणाची शक्यता
इंडिगो एरलाईन्सच्या चेन्नई वरून मुंबईला येणाऱ्या विमानात सापडली धमकीची चिठ्ठी
विमानाच्या स्वच्छतागृहात सापडली चिठ्ठी
"मुंबईला याल तर सगळे मरतील अशा आशयाचा होता मजकूर"
टिशू पेपरवर लिहिण्यात आला होता धमकीचा मजकूर
विमान मुंबईला लँड करण्याच्या काही मिनिटापूर्वी सापडली धमकीची चिठ्ठी
येत्या आठवड्यात दोन आमदार राजीनामा देण्याची शक्यता
विश्वसनीय सुत्रांची माहिती
देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर राजीनामा देण्याची शक्यता
नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता
पुणे शहर पोलिस दलातील ५ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
कर्तव्यात कसूरी केल्याचा ठपका ठेवत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन
कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ वेगवेगळ्या प्रकरणातील पोलीस कर्मचारी निलंबित
ससून रुग्णालयातून स्वाती मोहोळ धमकी दिल्याप्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता
याप्रकरणी पोलिस शिपाई निखिल पासलकर आणि पोलीस शिपाई पोपट खाडे हे दोघे ही सायबर पोलीस विभागात कार्यरत होते
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेला उद्या विश्रांती
यात्रा उद्या एक दिवस सुरू राहणार नाही
उद्या सोनिया गांधी राज्यसभेचा अर्ज भरणार आसल्याची माहिती
त्यावेळी स्वतः राहुल गांधी हजर असतील म्हणून यात्रा उद्या नसेल
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील अर्ज भरण्यासाठी उपस्थित असतील
मी सर्व डेपोची साफसफाई करा नाही तर मी तुमची सफाई करणार मी स्वतः डेपोची पाहणी करणार
बस गाड्या आणि डेपो कॅन्टीन पदार्थ चांगले असल्या पाहिजे
मुख्यमंत्र्यांनी एसटी च्या अधिकार्यकार्यची हजेरी घेतली
एसटी महामंडळात बदल दाखवा अन्यथा कारवाईला सामोरे जा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा रद्द
१५ फेब्रुवारीला होणारा महाराष्ट्र दौरा रद्द
तांत्रिक कारणांमुळे दौरा रद्द केल्याची माहिती
अकोला, जळगाव व छत्रपती संभाजी नगर याठिकाणी शाह यांचा होता दौरा
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण
मॉरिस नरोन्हाचा सुरक्षा रक्षक अमरिंदर मिश्राची रवानगी न्यायालयीन कोठडीत
मिश्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अमरिंदर मिश्राच्या परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळी झाडून मॉरिस नरोन्हाने केली होती अभिषेक घोसाळकरांची हत्या
शंभू बॉर्डरवर प्रचंड गोंधळ; आंदोलकांकडून दगडफेक, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचा लाल किल्ला तात्पुरता बंद
अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
पुण्यात तरुणाने पोलीस चौकीसमोर स्वत:ला पेटवून घेतले
मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला
मात्र त्यांच्यावर कारवाई केली नसल्याने रोहिदास अशोक जाधव या 28 वर्षीय तरुणाने आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेतले
यामध्ये तो ९० टक्के भाजला आहे, त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले
छत्रपती संभाजीनगरमध्ये धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील झालटा फाटा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. पीक विमा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यानी एकत्र येऊन हा रास्ता रोको केला. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय. जिल्हा कृषी अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. दरम्यान कोणतीही दखल प्रशासनाने आमची घेतली नाही तर आम्ही पुन्हा एकदा संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा आक्रमक इशारा शेतकरी बांधवांनी यावेळी दिला.
मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशीही उपचारास नकार दिलाय. मनोज जरांगे यांची प्रकृती आज अधिक खालावत चालली आहे. आज जालन्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांचं पथक जरांगे यांच्या तपासणीसाठी आलं होतं. या डॉक्टरांच्या पथकाने जरांगे यांच्याकडे तपासणीसाठी आग्रह केला. मात्र आधी "सगे सोयरे कायदा करा" अशी मागणी जरांगे यांनी डॉक्टरांच्या पथकाकडे केली. त्यानंतर हे डॉक्टरांचं पथक माघारी फिरलं.
लोकसभेसोबतच राज्यात विधानसभा निवडणूक घ्यायची का? याची चाचपणी सुरू
एकत्र निवडणूक घेतल्यास काय चित्र असेल याचे सर्वेक्षण भाजपकडून सुरू
काही खासगी कंपन्यांकडून सर्वेक्षण केले जात असल्याची सूत्रांची माहिती
एकत्र निवडणुक घेतल्यास त्याचा लोकसभेला फटका तर बसणार नाही ना? याचेही केले जातेय सर्वेक्षण
सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक घ्यायची का? यावर होणार निर्णय
कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेल्या दोन वकिलांसह सात आरोपींना १७ फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे.
- या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे व विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व आरोपी आता मोक्का कोठडीत असून,त्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.
- मोहोळच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
- या आरोपींना काल प्रथम मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले.
सांगली, कोल्हापूरचे पुराचे पाणी धाराशिव जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न
जागतिक बँकेचे पथक १४ फेब्रुवारीला पाहणीसाठी धाराशिव जिल्ह्यात येणार
भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहीती
शेतकरी नेत्यांसोबत रात्री उशीरापर्यंत 5 तासापेक्षा अधिक चाललेल्या बैठकीत तोडगा नाहीच
शेतकरी दिल्लीकडे निघण्यावर ठाम, सकाळी 10 वाजता दिल्लीकडे करणार कुच
बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाची घोषणा
शेतकऱ्यांनी पंजाब, हरियाणाच्या शंभू, खनोरी आणि डबवली बॉर्डरवर एकत्र जमण्याचं शेतकरी नेत्यांनी केलं आवाहन
सर्व सीमांवर पोलिसांकडून बॅरकेटिंग केलं असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला
मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दत्ता गोंडे, विमल गोंडे अशी या आरोपींची नावे असून हे दोघेही मालेगाव बुद्रुक पुणे येथील रहिवाशी आहेत
मालेगावमधील समाजाच्या जागेवर नागेश्वर सोसायटीच्या जागेवर राहू देत नसल्याने तेथील सचिवाच्या त्रासाला कंटाळून मंत्रालया समोर विष प्राशन करण्याचा केला प्रयत्न
वेळीच गस्तीवरील पोलिसांनी दोघाना रोखत ताब्यात घेतले. दोघांवर मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात कलम ३०९, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.