Maharashtra Live News Updates : सोलापुरात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

Maharashtra Breaking LIVE Marathi Updates 4th july : राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट, महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन, टीम इंडिया, राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी , हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटना
ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण : एटीएसच्या तपासावर पानसरे कुटुंबीयांची नाराजी
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Solapur Breaking : सोलापुरात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

सोलापुरात विजेचा शॉक लागून 24 म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. गावातील ओढ्यावरून जाणारी महावितरणची तार तुटून पाण्यात पडल्याने 28 पैकी 24 म्हशींना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.

Congress : पुण्यात भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही दिली भाजप शहराध्यक्षांविरोधात तक्रार

पुण्यात भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही दिली भाजपच्या शहराध्यक्षाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या शहर अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास करून काँग्रेसची बदनामी होईल, असं वक्तव्य केल्याचा काँग्रेसचा आरोप केला आहे.

Pune News : L 3 बारमधील पार्टीनंतर PMC ची अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरूच

पुणे महापालिका अतिक्रमण विभागाची अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरूच आहे. पुण्यामध्ये जे एम रोडवरील चौपाटी महापालिकेच्या बांधकाम विभागाने उध्वस्त केली. L 3 बारमधील पार्टीनंतर महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेकडून आज सलग ११ व्या दिवशी कारवाई सुरु.

Vasant More : वसंत मोरे यांच्या कात्रजमधील कार्यालयाबाहेर पोलीसांचा कडक बंदोबस्त

पुण्यातील वसंत मोरे यांच्या कात्रजमधील कार्यालयाबाहेर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन 9 जुलैला पक्ष प्रवेश करणार असल्याबाबत वक्तव्य केल्यानंतर,वंचितकडून वसंत मोरे यांच्या कार्यालयावर आंदोलन करत कार्यालयाची तोडफोड करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Nashik News : नाशिक जिल्हा ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नाशिक जिल्हा ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला.ट्रक बंद ठेवून एक दिवस कामबंद आंदोलन करण्यात आलं. शहरातील वाहतुकीचा जटील प्रश्न, शहरात ट्रक टर्मिनस नाहीशहराबाहेरील ट्रक टर्मिनसवर पालिकेकडून बस चार्जिंग डेपोची उभारणी, वाहतूकदारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधांविरोधात मोर्चा काढण्यात आला.

Mira Bhayandar News : बलात्कार प्रकरणातील आरोपीला तब्बल २२ वर्षांनंतर अटक

२२ वर्षे फरार आरोपीला मीरा भाईंदर मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. २२ वर्षा पूर्वी नालासोपारा भागात एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली होती.यामध्ये हा आरोपी मागील २२ वर्षे पोलिसांना चकवा देत होता.

Bus Accident : मनमाड-मालेगाव राज्यमार्गावर पुणे-दोंडाई बसला अपघात

मनमाड-मालेगाव राज्यमार्गावर पुणे-दोंडाई या बसचा अपघात झाला आहे. बस चालकाने ब्रेक दाबल्याने बस रस्त्यावरून घसरल्याने बस झाली पलटी झाली. बसमध्ये एकूण 26 प्रवाशी होते.

Maharashtra Monsoon Session : उद्धव ठाकरे, नितेश राणे विधानभावनात आमने सामने

उद्धव ठाकरे आणि नितेश राणे आज विधानभावनात आमने सामने आल्याचं पहायला मिळालं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या सिक्युरिटीचा नितेश राणेंना धक्का लागला. यावेळी नितेश राणे यांनी काय करता काय असा सवाल केला.

 Team India : टीम इंडियाच्या स्वागताचे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुंबई विमानतळाच्या बाहेर शेकडो बॅनर्स

विश्वविजेता भारतीय संघाचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. मुंबई विमानतळाच्या बाहेर मोठ्या संख्येने भारतीय संघाचे अभिनंदन आणि स्वागत करणारे बॅनर लागले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुंबई विमानतळाच्या बाहेर शेकडो हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.तसेच विमानतळाच्या बाहेर ही मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Chandrapur News : चंद्रपूरमध्ये झालेल्या गोळीबारात मनसेचे जिल्हाप्रमुख जखमी 

चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या गोळीबारात अमन अंधेवार हे जखमी झाले आहेत. अमन हे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख असल्याची माहिती समोर येत असून याच संकुलात त्याचे कार्यालय आहे.

Jitendra Avhad : MH ही ओळख त्यांना पुसायची आहे; गुजरात बसवरून जितेंद्र आव्हाडांचा आरोप 

आदित्य ठाकरेंनंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी गुजरातच्या बसवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. मराठी माणसाची ओळख पुसू नका, एमएच ही ओळख त्यांना पुसायची आहे. टीम इंडियाच्या मिरवणुकीच्या बसवरुन बीसीसीआयवर घणाघात टीका केली आहे.

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 21 धरणं 100 टक्के भरली

रत्नागिरी जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 21 धरणं 100 टक्के भरली आहेत. चिंचोली, सोंडघर, पंचनदी, मुचकुंडी, इंदवटी, कडवई अशी 21 धरण 100 टक्के भरली आहेत. आजपर्यंत 892 मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पावसाचं जिल्ह्यातील प्रमाण दुप्पट आहे.

Beed News: भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यात चोरीचा प्रयत्न; 4 चोरट्यांना रंगेहाथ पकडलं

भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यात चोरीच्या प्रयत्न झालाय. वैद्यनाथ कारखान्यातील भंगार चोरताना 4 चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात यश आलं आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या स्टोअरमधील सामान चोरुन घेवुन जात असताना, सुरक्षा रक्षकांना ही बाब लक्षात आली अन सुरक्षा रक्षकासह संचालकांनी सापळा लावून त्यांना पकडलं आहे.

Raigad Breaking: नवी मुंबईचे पाणी बंद करण्यासाठी मोरबे धरणग्रस्त आक्रमक

नवी मुंबईचे पाणी बंद करण्यासाठी मोरबे धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या रायगडमधील खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाच्या फ्लॅब गेटवर चढून पाणी करण्यासाठी प्रकल्प ग्रस्त आक्रमक झालेत. धारणावर रायगड पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.

Akola Crime: अकोल्यात प्लास्टिक बंदीचा धडाका, प्रशासनाकडून 32 जणांवर कारवाई

अकोल्यात प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असली तरी अकोल्यात अकोला महापालिका मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. अकोल्यात छोट्या मोठ्या विक्रेत्या व्यापाऱ्यांवर प्लास्टिक पिशव्या जप्त करून तब्बल 32 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. मनपानं कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकांनी दिवसभरात 32 ठिकाणी छापे मारून 38 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दु

Chhatrapati Sambhajinagar: गावगुंडांची क्रुरता! वृद्ध व्यक्तीला पेटवून दिले

छत्रपती संभाजीनगर शहरातील शहाणूर मिया दर्गा परिसरात असणाऱ्या त्रिशरण चौकात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 3 तरुणांनी एका 57 वर्षीय भिकारी व्यक्तीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली. यामध्ये महिपालसिंग रणधीरसिंग गौर हे 35 टक्के भाजले असून त्यांच्यावर सध्या घाटीत उपचार सुरू आहे. दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

vasant More: वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार, तारीख ठरली!

९ तारखेला होणार वसंत मोरे यांचा शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश होणार आहे. खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून ते लढण्यास इच्छुक आहेत.   उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वसंत मोरे यांना आमदारकी चे तिकीट मिळणार का?

Team India Meet PM Narenra Modi: चॅम्पियन टीम इंडिया PM मोदींच्या भेटीला; खेळाडूंचे कौतुक

विश्वचषक जिंकून भारतात आल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. आज भारतात आल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. 

Nashik News: ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नाशिक जिल्हा ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.  ट्रक बंद करून ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आज एक दिवस कामबंद आंदोलन केले आहे. शहरातील वाहतुकीचा जटील प्रश्न, शहरात ट्रक टर्मिनस नाही, शहराबाहेरील ट्रक टर्मिनसवर पालिकेकडून बस चार्जिंग डेपोची उभारणी, वाहतूकदारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधांविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.

Vasant More Meet Uddhav Thackeray: वंचितचे नेते वसंत मोरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची भेट घेणार 

वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे हे आज शिवसेनारप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले आहेत. विधानसभेआधी वसंत तात्या शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आजची भेट महत्वाची आहे. 

Kolhapur Crime: कॉलेजबाहेर टवाळखोरी करणाऱ्यांना दणका; पोलिसांनी पाठलाग करुन पकडलं

कोल्हापुरमध्ये एका महाविद्यालयाच्या बाहेर टवाळखोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. दसरा चौक परिसरातील शहाजी कॉलेजसमोर पोलिसांनी ही कारवाई केली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी टवाळखोरांना पाठलाग करून ताब्यात घेतले.

Team India Welcome:  जल्लोष स्वप्नपूर्तीचा! टीम इंडियाच्या विजयी मिरवणूकीची खास तयारी

विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागताची बीसीसीआयकडून मुंबईत जोरदार तयारी करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या मिरवणूकीसाठी खास गुजरातहून ओपन डेक बस मागवण्यात आली आहे. बोरीवलीत या बसला सजवण्यात आले आहे. विश्वविजेती टीम इंडियाची याच बसमधून संध्याकाळी मरिन ड्राईव्हवर विजयी मिरवणूक निघणार आहे.

Nandurbar News: लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या नारीशक्ती ॲप चालत नसल्याच्या तक्रारी

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते. त्यातच शासनाने दिलेल्या नारीशक्ती एप्लीकेशन हे प्ले स्टोअर वरनं डाउनलोड केल्यानंतर त्यात माहिती भरण्यात येत आहे मात्र त्यात मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येत नसल्याने नागरिकांच्या समस्येत वाढ झालीये फॉर्म नेमका भरायचा कसा याबाबत अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत.

Dharashiv News: 'आमची शाळा सुरू करा', पालक- विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकरी व विद्यार्थी आक्रमक झाले असून संतप्त विद्यार्थी -पालकांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत येऊन शाळा सुरू करेपर्यंत - चौकशीसाठी आलेल्या संबधित शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना जावु न देण्याचा गावकऱ्यांचा पविञा आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर "आमची शाळा सुरू करा अशी मागणी करत विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Dombivli News: डोंबिवलीत महिलांचे पाण्यासाठी आंदोलन

डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात महिलांनी पाण्यासाठी ठिय्या आंदोलन केले आहे. डोंबिवली निवासी भागात दोन महिन्यांपासून पाणी समस्या भेडसावत असून पावसाचे पाणी भरून दिवस काढायची नागरिकांवर वेळ आली आहे. एक आय डी सी ,आमदार, खासदारांकडे तक्रार करूनही कोणी लक्ष देत नसल्याचा महिलांचा आरोप करत महिलांनी आंदोलन सुरू केले आहे.

Manoj jarange Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ

मनोज जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी ड्रोन फिरल्याच्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करत राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यापुढे यांच्यासोबत चार पोलीस आणि एक पोलीस वाहन जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत‌ तैनात राहिलं. शंभूराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Pune News: संत तुकाराम महाराज पालखीची अडवल्याप्रकरणी उरुळी कांचन ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

 जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीची वाट अडवल्याप्रकरणी उरुळी कांचनच्या सरपंचासहित 15 ते 20 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. उरुळी कांचन येथील विसाव्याच्या पालखी नियोजनावरून सोहळ्याचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यात वादावादी होऊन पालखी सोहळ्यातील नगारा बैलगाडा अडवण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला होता. पालखी सोहळ्याला अडथळा निर्माण करणाऱ्या ग्रामस्थांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dhangar Reservation: लातूरमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको; आरक्षणासाठी आक्रमक

धनगर समाजाची ST आरक्षणात तात्काळ अंमलबजावणी करा' या मागणीसाठी मागच्या 7 दिवसापासून लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आमरण उपोषण सुरू आहे.  उपोषणकर्ते अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे या 2 धनगर बांधवांनी मागच्या 7 दिवसापासून हा लढा उभारला आहे.  दिवसेंदिवस उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली जात आहे. मात्र या उपोषणाकडे प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज धनगर समाज आक्रमक होत, रस्त्यावर उतरला आहे. आज लातूर जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून जाणारी वाहतूक धनगर समाजाने अडवून धरली आहे.

Pune News: पुण्यात एसटी कामगारांचं आंदोलन सुरू,  सदावर्ते पती-पत्नीला अटक करण्याची मागणी 

गुणरत्न सदावर्ते आणि आणि जयश्री पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनेने आज पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. पुण्यातल्या सहकार आयुक्त कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा निघाला आहे. एसटी को-ऑप बँकेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटकेची मागणी करण्यात आली आहे. संचालक पद रद्द करूनही सदावर्ते पती-पत्नीचा बँकेत हस्तक्षेप असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Kolhapur Accident: हातकणंगलेमध्ये दुचाकी एसटीला धडकली, २ तरूण जखमी 

हातकणंगलेमध्ये पेट्रोल पंपासमोर टू व्हीलर आणि एसटीचा अपघात झाला आहे. अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झालेत. सोलापूरहून कणकवलीला जाणाऱ्या एसटीला दुचाकी धडकली. जखमींवर तातडीने उपचार सुरू आहेत.

Pandharpur News: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद  आंदोलन

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन केले. मंदिर समितीचे कर्मचारी आनंता रोपळकर यांना मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी शिवीगाळ आणि दमदाटी केली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी मंदिरात आंदोलन केले. समितीचे सुमारे 225 कर्मचारी आंदोलानत सहभागी झाले आहेत.

Satara News: सज्जनगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

किल्ले सज्जनगड मार्गावर सज्जनगड फाटा ते सज्जनगड या वळणावर दरड पडल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. ठोसेघर सज्जनगड परिसरात पावसाची उघडझाप सुरू असली तरी पावसाचा जोर कायम आहे. या परिसरात रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहे. आज पहाटे सज्जनगड रस्त्यावर मोठे दगड आल्यामुळे चार चाकी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. अद्यापही कोणतीही शासकीय यंत्रणा येथे पोहचली नसल्याने येथील चारचाकी वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे.

Maharashtra Monsoon Session: विधानपरिषद कामकाज 15 मिनिटांसाठी तहकुब

विधानपरिषद कामकाज सकाळी 10.45 ठेवण्यात आले होते. मात्र, सदस्य सभागृहामध्ये उपस्थित नसल्यामुळे सभागृह 15 मिनिटांसाठी तहकुब करण्यात आलेले आहे.

Team India Celebration : दिल्लीतील आयटीसी हॉटेलमध्ये टीम इंडियाचं सेलिब्रेशन

दिल्लीतील आयटीसी हॉटेलमध्ये टीम इंडियाने सेलिब्रेशन सुरु केलं आहे. टीम इंडिया काही वेळात पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. त्यानंतर मुंबईला रवाना होणार आहे.

Vasant More : वसंत मोरे घेणार उद्धव ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. आज गुरुवारी दुपारी १२.३० वाजता मातोश्रीवर भेट घेणार आहे.

Pm Narendra Modi Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर असणार आहे. लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगांव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन होणार आहे.

हजारो कोटींच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातून महायुती फुंकणार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग असणार आहे.

Nagpur Rain :  नागपुरातील 'या' भागात उद्या पाणीपुरवठा बंद असणार

नागपुरातील पूर्व मध्य आणि दक्षिण नागपूरात 5 जुलैला म्हणजेच उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे. कन्हान जल शुद्धीकरण केंद्रात अमृत जलवाहिनी जोडणीसह तांत्रिक कामासाठी 30 तासांचा शटडाऊन करण्यात आला आहे. महानगरपालिका ओसीडब्ल्यू जलशुद्धीकरण केंद्रातून 5 जुलै सकाळी 10 वाजतापासून 6 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत 30 तासांचा शटडाऊन असणार आहे.

Maharashtra assembly session : जादुटोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर लागू करा; 'अंनिस'ची मागणी

जादुटोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर लागू करा, हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर 'अंनिस'ने मागणी केली आहे. हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत सुमारे ११६ हून अधिक लोकांना जीव गमावावा लागला.

zika virus in maharashtra : झिकाचे राज्यात ८ रुग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क

राज्यात झिकाचे ८ रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. राज्यांना गरोदर मातांची झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून सतत दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Smriti vishwas Death : ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं वयाच्या १०१ व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं नाशिकरोडच्या निवासस्थानी निधन झालं. स्मृती विश्वास यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी रात्री राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com