Today Marathi News : पळून जाऊ नका, पराभवाचा सामना करा; अमित शहांचा काँग्रेसला टोला

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (31 may 2024) : राज्यातील घडामोडी, देश आणि विदेशातील राजकीय घडामोडी, लोकसभा निवडणुका, राज्यातील लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा.
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

पळून जाऊ नका, पराभवाचा सामना करा; अमित शहांचा काँग्रेसला टोला

उद्या होणाऱ्या एक्झिट पोलवरील चर्चेत चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही त्यावर अमित शाह यांचा काँग्रेसला टोला

तुम्ही पळून जाऊ नका, पराभवाचा सामना करत आत्मचिंतन करा

काँग्रेसला त्यांच्या पराभवाची माहिती झाली आहे... अस असताना ते कोणत्या तोंडाने मीडिया आणि जनतेला तोंड देतील ?

ताडदेव परिसरात इंडस्ट्रिअल इस्टेटला लागली आग

ताडदेव परिसरात इंडस्ट्रिअल इस्टेट ला लागली आग

ताडदेव येथील ताल्मिकी वाडीतील इंडस्ट्रिअल इस्टेटला भीषण आग लागली आहे

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

६ अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

अकोल्यात एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात

अकोला-पातूर मार्गावरील चांदूर फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अपघातात म्हैसपुर गावातील मनोहर इंगळे हे पती-पत्नी दुचाकी जात असताना एसटी बसच्या धडकेत त्यांचा भीषण अपघात झाला आहे. मनोहर कांताराम इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पत्नी गंभीर स्वरुपात जखमी झाले आहे. 15 दिवसांपुर्वीच मनोहर इंगळे यांचे लग्न होते. दरम्यान अकोला -नाशिक बसच्या चाकाखाली आल्याने या नव्या जोड़प्यातील पतीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबई महापालिका आयुक्तांनी केली कोस्टल रोडची पाहणी

मुंबई महापालिका आयुक्तांनी केली कोस्टल रोडची पाहणी

बोगद्याच्या दोन सांध्यांमधून झिरपणारे पाणी रोखण्यात येत आहे.

तीन सांध्यांच्या ठिकाणी असणारा ओलावा आटोक्यात आला आहे

महापालिकेचा दावा

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व दुरुस्तीच्या कामांची स्वत: खात्री केली

मुंबई विमानतळ, ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला अटक

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला अटक

अरविंद राजपूत नावाच्या आरोपीला उत्तर प्रदेशवरून अटक

गर्लफ्रेंड शी झालेल्या भांडणातून केला होता धमकीचा फोन

धमकी दिल्यानंतर गर्लफ्रेंडचा नंबर पोलिसांना देऊन झाला होता मोकळा

आरोपीला घेऊन मुंबई पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेने रवाना

सोमवारी आला होता मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल उडवून देण्याची दिली होती धमकी

पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीतही टोल वसुली

पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे मुलुंड टोल नाका येथे सुरू असलेली टोल वसुली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली असतानाही टोल वसुली मात्र सुरू आहे. कॅमेरा पाहून काही क्षणांसाठी टोल वसुली बंद करण्यात आली. मात्र पुन्हा टोल वसुली सुरूच आहे. यामुळे अगदी भांडुप पर्यंत वाहतूक कोंडीला वाहनचालकांना सामोरं जावं लागत आहे.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, पुणे पोलीस करणार अल्पवयीन तरुणाची चौकशी

पुणे पोलीस करणार अल्पवयीन तरुणाची चौकशी

बालहक्क न्याय मंडळाकडून अल्पवयीन आरोपीची चौकशी

करण्याची पुणे पोलिसांना मिळाली परवानगी

उद्या दोन तास चौकशी करण्याची मिळाली परवानगी

पालक उपलब्ध नसल्याने बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत होणार चौकशी

मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा फटका संध्याकाळी बसण्याची शक्यता

मध्य रेल्वेच्या वतीने घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकचा फटका संध्याकाळच्या वेळेस बसण्याची शक्यता आहे. ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणार्‍या ट्रेन 10 मिनिटे तर मुंबईच्या दिशेने जाणार्‍या ट्रेन 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, ३ महिलांचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे अपघात

रिक्षा आणि आयशर टेंपोमध्ये झालेल्या अपघातात तीन महिलांचा मृत्यू, दोन जण जखमी

जखमींमध्ये दीड वर्षांची मुलगी आणि रिक्षा चालकाचा समावेश

माणगावमधून इंदापूरकडे जाणारी रिक्षा आणि मुंबईकडून माणगावकडे येणाऱ्या आयशर टेंपोची धडक

निवडणूक निकलापूर्वी काँग्रेसची रणनीती, एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस प्रवक्ते सहभागी होणार नाहीत

निवडणूक निकलापूर्वी काँग्रेसची रणनीती

उद्या होणाऱ्या एक्झिट पोल चर्चेत काँग्रेस प्रवक्ते सहभागी होणार नाहीत

उद्या सायंकाळी ६ नंतर अनेक वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल दाखवले जाणार

त्यात सहभागी न होण्याचा काँग्रेसचा निर्णय

४ जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीच्या वेळी मात्र काँग्रेस प्रवक्ते चर्चेला जाणार

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरण, भाजपच्या शिष्ट मंडळाने घेतली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरण

पुणे शहर भाजपच्या शिष्ट मंडळाने घेतली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

भाजप ने दिले पोलीस आयुक्त यांना निवेदन

अपघात प्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करावं, भाजप ची मागणी

अपघात प्रकरणी सगळ्या आरोपींवर लवकर अरोपपत्र दाखल करावे, भाजप ची पोलिसांना मागणी

काही पब आणि हॉटेल मुळे नागरिकांना त्रासाची दखल घेत त्यांच्यावर सुद्धा कडक करावी करावी, भाजप चे पोलिसांना निवेदन

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, इगो मीडियाच्या संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना

इगो मीडियाची माजी संचालक जान्हवी मराठेचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

डिसेंबर २०२३ पर्यंत होती इगो मिडियाची संचालक

तिच्याच काळात घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेल होर्डिंग बांधण्यात आल होत

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांचा झाला होता मृत्यू तर ७४ लोक झाली होती जखमी

Maharashtra Politics : शरद पवार गटाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जायच्या तयारीत, सुनील तटकरे यांचा दावा

शरद पवार गटाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जायच्या तयारीत

सुनील तटकरे यांचा अनौपचारिक चर्चेत दावा

पवार गटाच्या अनेक आमदारांनी सोनिया गांधींची वेळ मागितली

पुण्यातील मतमोजणी किती वाजता सुरू होणार? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

पोस्टल मतदान आठ वाजता सुरू होणार

ईव्हीएम साडे आठ वाजता मतमोजणी सुरू होणार

आरो हॉलमध्ये पोस्टल मत मोजणी होणार

पुणे 21 टेबल फेऱ्यात मतदान संपवण्याचा प्रयत्न

बारामती 24 फेऱ्या होतील

मावळ मधे 25 फेऱ्या होतील

शिरूर मधे 28 फेऱ्या होतील मतमोजणीच्या

फेरी प्रमाणे मतमोजणी कळेल

दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री, कृषीमंत्री नॉट रिचेबल: नाना पटोले यांनी व्यक्त केली खंत

शेतकऱ्यांची पिकं वाळलेली आहेत आणि मुख्यमंत्र्यांना फोन लावायचा तर मुख्यमंत्री नॉट रिचेबल, कृषीमंत्री ही नॉट रिचेबल आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये जनता बेजार आणि सरकार आरामात अशी, टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, दुसऱ्या आरोपीलाही 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दुसऱ्या अटक आरोपीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

गुन्हे शाखेने या प्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर आज रिमांडसाठी किल्ला कोर्टात केलं होतं हजर

मनोज संघु नावाच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला कोर्टाने 5 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला आहे

मनोज संघू पालिकेने मान्यता दिलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर असून त्याने दुर्घटना ग्रस्त झालेल्या होर्डिंगला दिल होत स्टेबिलिटी सर्टिफिकेट

घाटकोपर दुर्घटनेत झाला होता १७ लोकांचा मृत्यू तर ७४ लोक झाली होती जखमी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच पुणे विद्यापीठातआंदोलन

पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच पुणे विद्यापीठातआंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थी वसतीगृहामध्ये गांजा सापडला होता

यापूर्वी देखील विद्यापीठ आवारातील हत्ती तलाव येथे मद्यपी सापडण्याची घटना घडली होती.

अभाविपने वेळोवेळी विद्यापीठ प्रशासनाला सांगून देखील विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ आवारातील वाढत्या व्यसनाधीनतेवर ठोस पावले उचलली नसल्याचा हा दुष्परिणाम आहे.

या घटनेच्या निषेधार्थ अभाविप आंदोलन करत आहे.

विवाहिता गर्भपात मृत्यू प्रकरण,  सांगली पोलिसांनी ७ जणांना घेतलं ताब्यात

विवाहिता गर्भपात मृत्यू प्रकरण, सांगली पोलिसांची मोठी कारवाई

गर्भलींग निदान आणि गर्भपात करणाऱ्या मृत महिलेच्या कुटुंबीयांसह, कर्नाटक, सांगली आणि जयसिंगपूर मधील डॉक्टर, डॉक्टरांचे सहकारी अशा सात जणांना घेतले ताब्यात

सांगली पोलिसांनी पुढील चौकशीसाठी कर्नाटकातील महालिंगपुर पोलिसांच्या दिले ताब्यात

महलिंगपुरा येथे अवैध गर्भपात वेळी महिलेचा झाला होता मृत्यू

दिल्लीहून काश्मीरकडे जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा

दिल्लीहून काश्मीरकडे जाणाऱ्या विस्तारा फ्लाइट मधे बॉम्ब असल्याची धमकी देणारा विमानतळ प्रशासनाला कॉल

एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमला आला होता कॉल श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाने तत्काळ फोनची घेतली दखल

हा फोन खोटा असल्याचं चौकशीतून समोर पुन्हा विमान सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली

Manoj Jarange Patil : "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटाचा जरांगेंच्या हसते ट्रेलर लाँच

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर तयार झालेला 14 जून 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला शिवाजी दोलताडे दिग्दर्शित व गोवर्धन दोलताडे निर्मित "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राच्या भेटीला आलेला आहे , आज अंतरवाली सराठी येथे स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते हा ट्रेलर लाँच केला आहे , लाठीचार्जे आणि गोळीबार चा आदेश कोणी दिला अश्या अनेक डायलॉग ने भरलेला हा ट्रेलर दिसत आहे , त्यामुळे प्रेक्षकांन मध्ये अजून आतुरता वाढली आहे.

विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या दोघांना १४ न्यायालयीन कोठडी

Maharashtra weather today : मुंबईसह कोकणाला उष्णेतच्या लाटेचा इशारा

मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील चारही जिल्ह्यात आजपासून सलग तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट आहे. तसेच वातावरण हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज आहे, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

मंत्र्यांच्या बंगल्याची वीज गुल; अर्ध्या तासापासून वीजपुरवठा ठप्प

बेस्टच्या कामामुळं मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीजपुरवठा अर्ध्या तासांपासून ठप्प झाला आहे. बेस्टच्या तांत्रिक कामामुळं मंत्र्यांचे बंगल्याची वीज गुल झाली आहे. बंगल्यांचा वीज पुरवठा अजून काही काळ खंडित राहणार आहे.

दिल्लीवर जलसंकट; दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांचं केंद्र सरकारला पत्र

दिल्ली सरकरमधील मंत्री आतिशी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. दिल्लीतील पाणी समस्याबाबत मंत्री आतिशी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. मंत्री आतिशी यांनी केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र लिहिलं आहे.

पत्रातील मुद्दे -

दिल्लीसाठी पाण्याची काहीही तरतूद करावी. हरियाणा असो किंवा उत्तर प्रदेश किंवा इतर कोणत्यातून राज्यातून पाण्याची तरतूद करावी.दिल्लीतील लोकांना कोणताही त्रास होऊ नये, ही आमची भावना आहे. हरियाणा राज्याने दिल्लीच्या वाट्याचे पाणी यमुना नदीत त्वरित सोडणे आवश्यक आहे. जेणेकरून पाण्याची पातळी सामान्य पातळीवर येईल, असे मुद्दे मंत्री आतिशी यांनी अधोरेखित केलं आहे.

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी, १-२ दिवसांत अहवाल

बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी येत्या दोन दिवसात संपणार

महिला व बालविकास आयुक्तांना येत्या १ ते २ दिवसांत मिळणार अहवाल

महिला व बालविकास आयुक्तांच्या अभिप्रायानुसार हा अहवाल राज्य सरकारला पुढील आठवड्यात सादर केला जाणार

आतापर्यंतच्या चौकशीत समितीने नोंदवला आहे सदस्याचा जबाब

विठ्ठल मंदिरात भुयार आढळलं, सात ते आठ फूट खोली असण्याची शक्यता

विठ्ठल मंदिरात भुयार आढळले आहे. सात ते आठ फूट खोलीचे भुयार असण्याची शक्यता आहे. भुयारात मूर्ती असण्याची शक्यता आहे. कानोपात्रा मंदिराजवळ भुयार आढळलं. पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदीरात पोहोचले आहेत. मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली.

मी दोन दिवसांनी पुन्हा तुरुंगात जाणार - अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत तुरुंगात जाण्यापूर्वी लोकांशी संवाद साधला.

अरविंद केजरीवाल म्हणाले?

मी 2 दिवसांनी पुन्हा जेलमध्ये जाणार आहे. आम्ही दिल्लीत लोकांना मोफत औषध दिली आहेत. पण मला जेलमध्ये औषध दिली नाहीत. मी एवढे दिवस तुमच्या सर्वांसाठी लढलो. आज आपल्या कुटुंबासाठी काहीतरी मागणार आहे.माझे आई वडील आजारी असतात. मी जेलमध्ये असताना त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे ते म्हणाले.

डोंबिवलीत शेकडो कारखानदारांचा मोर्चा

डोंबिवली एमआयडीसीमधील शेकडो कारखानदारांचा डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही कंपन्यांना क्लोजर नोटीस दिल्याने कारखानदार आक्रमक झाले आहेत. डोंबिवली औद्योगिक परिसरातील कंपनी स्थलांतरित करण्याचा एकतर्फी निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे घेण्यात आल्याने त्यांनी निषेध नोंदवला आहे.

मनोज जरांगे यांची पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी

मनोज जरांगे पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अटक वॉरंट रद्द करण्यासाठी हजर झाले. 'मी न्यायालयाचा आदर करतो. न्याय सर्वांसाठी समान आहे, असे जरांगे यावेळी म्हणाले.

डोंबिवलीतल्या कंपनीतल्या स्फोटानंतर राज्य सरकारला जाग

डोंबिवलीतल्या कंपनीतल्या स्फोटानंतर राज्य सरकारला जाग आली आहे.

डोंबिवलीतल्या कंपन्या हलवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

उद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती स्थापना करण्यात आली आहे.

धोकादायक कारखाने तातडीने हलवले जाणार आहे. समितीला तीन आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीचा पाणी प्रश्न सुप्रीम कोर्टात पोहोचला

दिल्लीतील वाढत्या पाणी समस्येवर दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांकडून एक महिनाभर अतिरिक्त पाणी देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

नागपुरातील मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू

नागपुरातील उमरेड तालुक्यात मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या वाठोडा परिसरातील तीन कुटुंब मटकाझरी तलावावर डबा पार्टी करण्यासाठी गेले होते. या मृतामध्ये एका लहान मुलांचा तर दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Water Stock : नागरिकांची चिंता वाढली; राज्यातील पाणीसाठा २२ टक्क्यांवर

राज्यातला आजचा पाणीसाठा २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा ९ टक्क्यांनी कमी आहे. मराठवाड्यात सर्वात कमी ८.९२ टक्के पाणीसाठा आहे. पुणे भागात १३.८९ टक्के पाणीसाठा आहे.

Maharashtra Politics : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; ठाकरेंचा विधानपरिषदेचा आमदार शिंदेंच्या संपर्कात?

ठाकरेंचा विधानपरिषदेचा आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Eastern Express Highway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा फटका; ईस्टर्न एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी

मध्य रेल्वे वरील जम्बोब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पूर्ववृत्तगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. खाजगी वाहनाने मुंबईकर हे कामाच्या दिशेने निघालेले आहेत. त्यामुळे मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान ईस्टर्न एक्स्प्रेसवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

Dombivli News : पुण्यानंतर डोंबिवलीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; बार आणि रेस्टॉरंटला ठोकले सील

पुणे हिट अँड रन केसच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई केली आहे. डोंबिवलीतील चार बार आणि रेस्टॉरंटला सील ठोकण्यात आले आहेत. यामध्ये इंडिगो स्पाईस ड्रंक यार्ड बार अँड रेस्टॉरंट, गिरीश रेस्टॉरंट बॉम्बे वेलवेट रेस्टॉरंट, मयूर बार अँड रेस्टॉरंट, सिद्धी बार अँड रेस्टॉरंटचा समावेश आहे.

PSI परीक्षेचा निकाल जाहीर

PSI परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पुण्यातील अजय कळसकर मुलांमध्ये पहिला आला आहे. तर मयुरी सावंतने मुलींमध्ये बाजी मारली आहे.

पुण्यातील पबवरील कारवाईचा धडाका सुरू राहणार; आणखी ६६ पबवर कारवाई होणार

पुण्यातील पबवरील कारवाईचा धडाका सुरू राहणार आहे. यामुळे आणखी ६६ पबवर कारवाई होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना आज प्रस्ताव दिला जाणार आहे. या आधी ६६ पब आणि बारवर कारवाई करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवर ६३ तासांचा मेगाब्लॉक; अनेक प्रवाशांनी निवडला सुट्ट्यांचा पर्याय

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक असल्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात गर्दी कमी पाहायला मिळाली. मेगाब्लॉकमुळे अनेक रेल्वे प्रवाशांनी सुट्ट्यांचा पर्याय निवडला आहे. रेल्वे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला लोकल प्रवाशांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com