Today's Marathi News Live : आचारसंहिता संपताच डोंबिवलीतील केमिकल कंपन्या स्थलांतर करणार: उदय सामंत यांची माहिती

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (24 may 2024) : राजकीय घडामोडी, डोंबिवली ब्लास्ट अपडेट्स, लोकसभा निवडणूक, देश-विदेश राज्यातील प्रत्येक घडामोडी, लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

आचारसंहिता संपताच डोंबिवलीतील केमिकल कंपन्या स्थलांतर करणार: उदय सामंत यांची माहिती

4 जून नंतर रेड झोन मध्ये असलेल्या कॅटेगिरी ए मध्ये असलेल्या डोंबिवली एमआयडीसी मधील केमिकल कंपन्यांचा स्थलांतर केले जाणार, मुख्यमंत्र्यांच्या घोषणांची अंमलबजावणी आचारसंहिता झाल्यानंतर केली जाणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

डोंबिवली स्फोटाच्या घटनेनंतर अमुदान कंपनीला एमपीसीबी क्लोजर नोटीस

डोंबिवली एमआयडीसीतील अमूदान कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना काल घडली होती. या घटनेत ८ जणांचा मृत्यू आणि ६४ जण जखमी झाले आहेत. उत्पादन प्रक्रिये दरम्यान रिएकटरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. ही आग पसरुन आजूबाजूच्या कंपन्यांचेही नुकसान झाले. त्या आगीच्या भक्ष्यस्थानी अन्य कंपन्याही पडल्या. या घटनेची गंभीर दखल घेत एमपीसीबीच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाने अमूदान कंपनीला क्लोजर नोटिस बजावली आहे.

प्रवरा नदी पात्रात आज पुन्हा दोन तरुणांचा बुडून मृत्यू

संगमनेर शहरातील नदी पात्रात घडली घटना.

अकोले येथील घटनेत सहा जणांच्या मृत्यूची घटना ताजी असताना पुन्हा एकदा दोन तरुणांचा मृत्यू.

संगमनेरच्या गंगामाई घाट परिसरात घडली घटना.

प्रवरा नदीपात्रात पोहायला गेले होते तरुण.

आदित्य रामनाथ मोरे वय 17 वर्ष रा. घुलेवाडी आणि श्रीपाद सुरेश काळे वय 17 वर्ष रा. कोळवाडे, अशी मयातांची नावे.

नदी पात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तरुण बुडाले.

अवैध वाळू उपशामुळे नदी पात्रात खड्डे पडल्याचा नागरिकांचा आरोप..

पुढच्या दोन अडीच वर्षात एकही खड्डा पडणार नाही: CM एकनाथ शिंदेंची हमी

पुढील दोन अडीच वर्षात एकही खड्डा सापडणार नाही.

पुढील २५-३० वर्ष मुंबई करांना खड्यांचा सामना करावा लागणार नाही.

हे रस्ते आधीच करायला पाहिजे होते.

मुंबई करांना पाणी काटकसरीने वापरावे हे आवाहन

छत्रपती संभाजीनगर :  वैजापूरमध्ये विनापरवाना आणि ज्यादा दराने कापसाचे बियाणे विकणाऱ्याला पकडले

छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरमध्ये विना परवाना आणि ज्यादा दराने कापसाचे बियाणे विकणाऱ्या पकडले. जिल्हा परिषद कृषी विभागाने ही कारवाई केलीय. विक्रेत्याच्या राहत्या घरातून २२ कापूस बियाणांचे पॉकेट ताब्यात घेण्यात आलेत.

२३ कापूस बियाणांची पॉकेट्स शेतकऱ्यांना विकल्याची विक्रेत्यांनी माहिती दिली. नामांकित बियाणे कंपनीचे लोगो आणि नाव असलेले बियाणे विनापरवाना विक्री करीत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी विक्री करणाऱ्यांवर वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात मेधा पाटकर दोषी

दिल्लीचे नायब राज्यपाल व्हि के सक्सेना यांनी दाखल केलेल मानहानी प्रकरण

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना साकेत कोर्टाने ठरवल दोषी

पाटकर यांच्या विरोधात व्हि के सक्सेना यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाटकर यांनी सक्सेना यांच्यावर केलेल्या आरोपानंतर त्यांनी पाटकर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता

अकोल्याचा पारा 45 अंशावर, रात्रीही तपमानात कमालीची वाढ

अकोल्यात आज दुसऱ्याशी 45 अंशावर तपमानाचा पारा कायम होता. आज शुक्रवारी अकोल्यात 45.8 अंश तापमानाची नोंद झाली. दरम्यान राज्यात अनेक भागात हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असताना काल गुरुवारी अकोल्यात सर्वाधिक 45.5 अंश तापमानाची नोंद झाली होती. गुरुवारी अकोल्यात सर्वाधिक 45.5 अंश तापमानाची नोंद झाली होती. तर अकोल्याचे रात्रीचे तापमानही 30 अंश सेल्सिअस होते.

डोंबिवली दुर्घटनेतील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी होणार डीएनए चाचणी

अमुदान कंपनीत ब्लास्ट मध्ये बेपत्ता असलेल्यांच्या नातेवाईकांची हॉस्पिटलमध्ये गर्दी

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी होणार डीएनए टेस्ट

आठ मधील दोन मृतदेहांची ओळख पटली, सहा मृतदेहांची ओळख पटेना

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात

नातेवाईकांची डीएनए टेस्ट साठी सॅम्पल घेण्याचे काम सुरू

सापडलेले मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी केली जात आहे डीएनए टेस्ट

अमुदान कंपनीमध्ये अकाउंटंट पदावर काम करणारा धवल वाघानी यांचे वडील जगदीश वाघानी यांची करण्यात आली डी एन ए टेस्ट

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, विभव कुमार यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

आप खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण

अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे PA विभव कुमार यांचा जामिनासाठी अर्ज

आजच कोर्टाने विभव यांना 4 दिवसाची न्यायालयिन कोठडी सुनावली आहे

कोर्टाने दिल्ली पोलिसांना उत्तर द्यायला सांगितलं असून यावर सोमवारी सुनावणी होणार

1 कोटींच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेला 6 दिवसाची पोलीस कोठडी

1 कोटींच्या लाच प्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेला 6 दिवसाची पोलीस कोठडी

29 में पर्यंत असणार पोलीस कोठडी

जिजाऊ मल्टीस्टेटच्या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी मागितली होती 1 कोटी रुपयांची लाच

5 लाख रुपयांची स्वीकारताना खासगी इसमाला केले होते अटक

कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजपला ८० टक्के जागा मिळतील: प्रवीण दरेकर यांचा दावा

बिहारला चांगलं यश मिळेल,

महाराष्ट्र यूपी नंतर सगळ्यात मोठं राज्य आहे

आम्हाला 40 च्या आसपास जागा मिळतील

गुजरातला 26 च्या 26 जागा मिळतील

कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश इथे शंभर टक्के यश मिळेल

मोठी जी राज्य आहेत तिथे भाजपला 80 टक्के यश मिळेल

त्यामुळे आमचा सत्तेचा मार्ग निर्विघ्नपणे इथूनच मोकळा होईल

शेकापचे नेते राहुल देशमुख यांना जामीन मंजूर

राहुल देशमुख यांना पोलिसांनी आज दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचा सबब देत अटक केली होती..

त्यानंतर राहुल देशमुख यांच्या समर्थकांनी काटोल पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येने एकत्र येत गर्दी केली होती..

यावेळी त्यांच्या समर्थनात अनिल देशमुख हे सुद्धा रस्त्यावर उतरल्याच पाहायला मिळाले...

काटोल पोलिसांनी कोर्टात या प्रकरणात अधिक तपासासाठी पाच दिवसाची राहुल देशमुख यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली...

यात न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळली, तेच राहुल देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

JDS खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ, परराष्ट्र मंत्रालयाकडून कारणे दाखवा नोटीस

JDS खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणी वाढल्या

प्रज्वल रेवण्णाला परराष्ट्र मंत्रालयाची कारणे दाखवा नोटीस 

प्रज्वल रेवण्णा यांना तत्काळ उत्तर देण्याच्या सूचना

केंद्र सरकारने प्रज्वल रेवण्णा चा पासपोर्ट रद्द करावा अशी मागणी कालच कर्नाटक सरकारने केली आहे

केमिकल कंपन्या नागरिकांना धोका नसेल अशा ठिकाणी उभारल्या पाहिजेत; रामदास आठवले 

केमिकल कंपन्या कुठेतरी लोकांना धोका नाही अशा ठिकाणी राहिला पाहिजे

सरकारकडून मुख्यमंत्री शिंदे आले होते त्यांनी आशा घातक कंपन्या स्थलांतरित करण्याचे मान्य केलंय

उद्योग मंत्रालयाने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे ,अशा पद्धतीच्या घटना घडनार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे

अनधिकृत बांधकाम करतात त्यांच्याबर कारवाई होणे गरजेचे आहे

केमिकल कंपन्या गावाबाहेर असल्या पाहिजेत

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, विभव कुमार यांना 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी

विभव कुमार यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

विभव यांना 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

डोंबिवली स्फोटातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

- डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्पोटातील मुख्य आरोपीला नाशिक मधून अटक

- काल रात्रीपासून नाशिक क्राइम ब्रांच युनिट एक आणि आणि ठाणे क्राइम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने केली कारवाई

- तांत्रिक विषलेशांच्या आधारे शोध घेत मुख्य आरोपी महिलेला घेतले ताब्यात

- सदोष मनुष्यवधाचा करण्यात आलाय गुन्हा दाखल

- स्पोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती प्रदीप मेहता नाशिक मध्ये आले

- नाशिक मध्ये दाखल होत नातेवाईकांच्या घेतला आश्रय

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, केजरीवाल यांचे PA विभव कुमार यांना कोर्टात केलं हजर

आप खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण

अरविंद केजरीवाल यांचे PA विभव कुमार यांना कोर्टात केलं हजर

आज विभव कुमार यांची पोलीस कोठडी संपली

मेडिकल तपासणीनंतर पोलिसांनी विभव यांना तीस हजारी कोर्टात केलं हजर

ठाणे घोडबंदर मार्गावरील फाउंटन हॉटेल ते गायमुख पर्यंतचा रास्ता बंद

ठाणे घोडबंदर मार्गावरील फाउंटन हॉटेल ते गायमुख पर्यंत रास्ता बंद

गायमुख जवळ रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

घोडबंदर मार्गावर २४ मे ते ७ जून पर्यंत जड वाहनांना पूर्णपणे बंदी

मुंबई गुजरात कडून ठाण्याकडे जाणाऱ्या जड वाहनांना पूर्णपणे बंदी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा असे आव्हान मिरा भाईंदर वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

माजी मंत्री सुबोध सावजी  यांच्यावर गुन्हा दाखल

जर निवडणूक आयोगाने इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला तर मी त्यांचा खून करेन, अशी धमकी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिली आहे. ही बातमी साम टीव्हीने दाखविली त्या बातमीची दाखल घेत पोलीस प्रशासन खडबडून जागा झाले असून माजीमंत्री सुबोध सावजी यांच्यावर डोणगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये कलम 506 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली स्फोटातील अमूदान कंपनीच्या फरार मालकाला नाशिकमधून घेतलं ताब्यात

डोंबिवली स्फोटातील अमूदान कंपनीचे मालक फरार होते. त्यांना नाशिकमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात आहे. भीषण स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.

दिल्लीच्या अलीपूर भागात बंदिस्त बँकवेट हॉलला भीषण आग

दिल्लीच्या अलीपुर भागात भीषण आग

अग्निशामक दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल

बंदिस्त बँकवेट हॉलला आग लागल्याची माहिती

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

वेंगुर्ला बंदरात बोट उलटली; तिघे बचावले, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शोधमोहीम सुरु

वेंगुर्ला बंदरात बोट उलटली

तिघांनी पोहत समुद्र किनारा गाठला

मध्यप्रदेशमधील ३ तर रत्नागिरी येथील १ खलाशी असे एकूण चार खलाशी बेपत्ता

वेंगुर्ला बंदर येथून माशांचा बर्फ घेऊन एकूण ७ खलाशी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मोठ्या बोटीच्या दिशेने निघाले होते.

सोसाट्याच्या वाऱ्याने आणि उधाणामुळे बोटीने आपला मार्ग बदलला आणि ती भरकटली

बोटीवरील सात खलाशी यावेळी समुद्रात फेकले गेले.

एका खलाशाचा मृतदेह आढळून आला

तीन खलाशांची शोधमोहीम सुरू आहे.

हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू

पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषदेची निवडणूक जाहीर

मुंबई पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरची निवडणूक पुढं ढकलली होती. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २६ जूनला मतदान होणार आहे. तर १ जुलैला मतमोजणी होणार आहे.

समाजवादी पक्षाचे आजम खान यांना मोठा दिलासा, हायकोर्टाकडून जामीन

समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांना प्रयागराज हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. आजम खान, पत्नी आणि मुलाला कोर्टाचा जामीन मिळाला आहे.

मुलाच्या बनावट प्रमाणपत्र प्रकरणात उच्च न्यायालयाकडून हा दिलासा मिळाला आहे. मात्र कोर्टाने प्रकरण रद्द करण्यास नकार दिला आहे.

मुलाच्या बनावट प्रमाणपत्र प्रकरणी 7 महिन्यांपूर्वी कोर्टाने तिघांनाही रामपूर स्पेशल कोर्टाने 7 वर्षाची शिक्षा सुनावली होती.

Sharad Pawar : ७३ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत : शरद पवार

शरद पवार पत्रकार परिषद मुद्दे

राज्यात पाण्याची स्थिती गंभीर आहे. १९ जिल्ह्यात परिणाम दिसत आहे. ७३ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत आहे. १५०० महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे.

Nashik News : नाशिकमधील काही सराफ व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या धाडी

नाशिक -

- नाशिकमधील काही सराफ व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या धाडी टाकण्यात आल्या आहेत. आयकर विभागाकडून दुकान तसंच घराची तपासणी सुरू आहे. सराफ व्यवहारांची माहिती लपवण्याचा संशय आहे. आयकर विभागाच्या दोन पथकांकडून शहरातील सराफ व्यावसायिकांची चौकशी सुरू आहे.

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

केदारनाथमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

हेलिकॉप्टर घिरट्या घालत खाली आलं.

केदारनाथमधील हेलिकॉप्टरचा थरारक व्हिडिओ व्हायरल व्हायरल होत आहे.

Nashik Political News : नाशिकमधील अवैध धंदे तत्काळ बंद करा; शांतिगिरी महाराज नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला

शांतिगिरी महाराज नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहेत. शांतिगिरी महाराजांकडून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेण्यात आली. पुण्यातील हिट अँड रनच्या घटनेबाबत शांतिगिरी महाराजांचं पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं. नाशिकमधील अवैध धंदे तत्काळ बंद करण्याची देखील शांतिगिरी महाराजांनी मागणी केली. धार्मिक शहर असलेल्या नाशिकमध्ये अवैध धंदे करता येणार नाही, अशी शांतिगिरी महाराजांची भूमिका आहे.

डोंबिवलीतील धोकादायक कंपन्या स्थलांतर करण्याविषयी बैठक सुरु

डोंबिवली एमआयडीसी येथे महत्त्वाची बैठक सुरू

एमआयडीसी अधीक्षक अभियंता भूषण हर्षे आणि सिद्धेश कदम तसेच इतर अधिकारी या बैठकीत उपस्थित आहेत.

डोंबिवली येथे असलेल्या धोकादायक कंपन्या दुसरीकडे स्थलांतरित आराखड्यावर चर्चा होत आहे.

आराखडा नंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठवला जाईल.

पाणीसंकटाची चाहूल, येलदरी धरणात फक्त 28 टक्के साठा

अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणात सद्य:स्थितीत केवळ 28टक्के जलसाठा

येलदरी धराणातून परभणी शहरासह जिंतूरला पाणीपुरवठा होतो

धरणात कमी पाणी असल्याने आणि सततच्या तांत्रिक बिघाडामुळे जिंतूर शहराला पंधरा ते वीस दिवसांनी पाणी तर याच धरणातून परभणी शहराला पाणी पुरवठा होतो.

मोटार बिघाडी आणि प्रशासनाचे ढिसाळ नियोजनामुळे धरणात पाणी असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

धाराशिवात फटाखा कारखान्यात स्फोट, एकजण गंभीर जखमी

धाराशिवच्या वाशी तालुक्यातील तेरखेडा फटाखा कारखान्यात स्फोट झाला आहे. या स्फोटात एकजण गंभीर जखमी झाला आहे. गावकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करत आगीवर ताबा मिळवला. यामुळे मोठा अनर्थ टळला.

वेंगुर्ले बंदरात बोट उलटली; तिघे वाचले, दोघे बेपत्ता, दोघांचा मृत्यू

वेंगुर्ले बंदरात बोट उलटून सात खलाशी बुडाले.

या खलाशीपैकी तिघांनी पोहून किनारा गाठला

चौघे होते बेपत्ता झाले होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले

काल रात्रीची ही घटना

वादळी वाऱ्यामुळे या खलाशांची बोट समुद्रात उलटली होती.

बेपत्ता खलाशांचा शोध जारी

प्रवरा नदीतील दुर्घटना, SDRFच्या 3 जवानांसह 3 तरुणांचा मृत्यू; शोधमोहीम संपली

अहमदनगर प्रवरा नदीतील दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला. 22 तारखेला बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला आहे. अकोले तालुक्यातील सुगाव येथे SDRF च्या 3 जवानांसह 3 तरुणांचा मृत्यू झाला आहे. प्रवरा नदीतील शोधमोहीम संपली आहे.

Nashik Fire : नाशिकमध्ये प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग; कोट्यवधींचे साहित्य जळून खाक

नाशिकच्या गौळाणे गावात प्लास्टिकच्या कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे कोट्यवधींचे साहित्य जळून खाक झाले आहे. तब्बल 5 तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

dombivli blast : अमुदान कंपनीत बॉयलर नव्हता, रिॲक्टरचा स्फोट झाला - धवन अंतापूरकर

कामगार विभागाच्या बॉयलर विभागाचे संचालक धवन अंतापूरकर यांनी महत्वाची माहिती दिली. 'अमुदान कंपनीत बॉयलर नव्हता. या कंपनीत बॉयलर नाही,बेकायदेशीर बॉयलर नाही. रिॲक्टरचा स्फोट झाला आहे. पाहणी केली, तेव्हा बॉयलर नव्हता. रिॲक्टरमध्ये दन केमिकल मिक्सिंग केलं जातं, अशी माहिती अंतापूरकर यांनी दिली.

CM शिंदेंच्या कार्यकाळात त्यावर काहीच निर्णय झाला नाही; ठाकरे गटाची टीका

डोंबिवली ब्लास्ट प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे यांची राज्य सरकारवर टीका

अंबादास दानवे काय म्हणाले?

डोंबिवलीतील घडलेली घटना दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना डोंबिवली एमआयडीसीमधील पाच धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला होता. मात्र आताच्या सरकारच्या काळात त्यावर काहीच निर्णय झाला नाही, अशा शब्दात अंबादास दानवे राज्य सरकावर टीका केली.

डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट प्रकरण : ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे पाहणीसाठी घटनास्थळी

डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट प्रकरण

ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे पाहणीसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.

दानव यांच्यासोबत वैशाली दरेकर देखील आहेत.

Akola News : विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट, पारा पोहोचला 45.5 अंशांवर

यंदाचा उन्हाळ्यातील अकोल्यात गुरुवारी उच्चांक तापमानाची नोंद आहे. तर यवतमाळ 43.05, अमरावती 43.02, चंद्रपूर 43.02, वर्धा 43.02 आणि नागपुरात 41.09 अंश सेल्सियस तापमानाची नोंद समोर आली आहे. पुढील काही दिवसासाठी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा दिला आहे. पूर्व विदर्भातही हळूहळू तापमानात वाढ होत आहे.

Kolhapur News  : कोल्हापुरात १० लाखांचे विदेशी मद्य जप्त; भरारी पथकाची कारवाई

कोल्हापुरात १० लाखांचा साठा आणि ६ लाखांच्या वाहनांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा छापा

दारूचा साठा करणारा संशयित अनिरुद्ध अरुण राऊत याला पथकाने ताब्यात

गुन्ह्यातील त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू

dombivli blast fire update :  डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट अपडेट; 18 तासानंतरही अग्निशमन विभागाकडून कुलींगचं काम सुरु

डोंबिवली एमआयडीसी फेस टू मधील अमुदान या कंपनीत ब्लास्ट

दुर्घटनेत पाच ते सहा कंपन्यांचा नुकसान

आतापर्यंत 64 जण जखमी तर आठ जणांचा मृत्यू

सकाळपासूनच एनडीआरएफ अग्निशमन विभाग व पोलिसांकडून बेपत्ता असलेल्या कामगारांचा शोध सुरू

१८ तासानंतरही या परिसरात धूर

सकाळपासून अग्निशमन विभागाकडून कुलींगचं काम सुरू

सकाळपासून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात या पथकांना यश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com