NEET परीक्षेतील गोंधळानंतर सरकारच मोठी कारवाई केलीय. NTA महासंचालक (DG) सुबोध कुमार सिंह यांना सरकारने पदावरुन हटवलं आहे. माजी केंद्रीय सचिव प्रदीप सिंह खरोला यांच्याकडे राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून झालेल पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा रद्द प्रकरण सुबोध कुमार यांना भोवलं आहे.
गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार यांनी आपण भाजपची साथ का सोडली याचा खुलासा केलाय. माजी आमदार तसेच विद्यमान भाजप नेते रमेश कुथे यांची काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी १५ जून च्या मध्यरात्री कुथे कुटुंबियांची घरी जात भेट घेतली होती. दरम्यान ते लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
खेड तालुक्यातील रानमळा येथे एका भावकीतील जमिनीचा ताब्या घेण्यासाठी निवृत्त पोलीस आधिका-याने पिस्तुलातून ४ राऊड हवेत फायर केले. पिस्तूलची दहशत दाखवत जमिनीचा ताबा घेत जेसीबीच्या साह्याने झाडे झुडपे तोडली.
NEET, UGC-NET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या पेपर लीकच्या बाबतीत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या उच्च अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आलीय. काल बीड दौऱ्यावर गेल्यापासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं जात आहे.
वडीगोद्रीनंतर ओबीसी शिष्टमंडळ पुण्यातील आंदोलनाला भेट देणार आहेत. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे ९ दिवसांपासून उपोषण करत आहेत. छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ थोड्याच वेळात पुण्यात दाखल होणार आहेत.
भंडारदरा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झालाय. तीन तरुण पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले होते. त्यावेळी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय.
ठाण्यातील फर्निचर गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. आग शमवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुसऱ्या एका काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केली. मुकेश धिवार नावाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस भवनाच्या आवारात धिवार हे फ्लेक्स घेऊन उभे होते. फ्लेक्सवर शहरातील काँग्रेस नेते खुर्च्या आडवून बसले होते. दरम्यान नाना पटोलेंनी मारहाण झालेल्या कार्यकर्त्याची विचारपूस केली.
लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यात अवैध मटका चालकाच्या जमावाने कारवाईसाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. दरम्यान रेणापूर तालुक्यातल्या कुंभारी पाटी जवळ अवैध मटका चालकानी कारवाईसाठी गेलेल्या हनुमंत घुले या उपनिरीक्षकास रस्त्यात अडवत जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला.
NEET परीक्षेतील गोंधळानंतर सरकारने मोठा निर्णय घेतलाय. NEET परीक्षेत सुधारणा सुचविण्यासाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलीय. इस्त्रोचे माजी प्रुमख डॉ. के राधाकृष्णन समितीचे चेअरमन, AIMS चे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांच्यासह इतर 6 तज्ज्ञांचा समितीत समावेश करण्यात आलाय. परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी ही समिती उपाय सुचवणार आहे.
ओबीसी आरक्षणाचा बचावासाठी लक्ष्मण हाके गेल्या १० दिवसांपासून उपोषणाला बसले होते. आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळान लक्ष्मण हाके यांना भेट दिली. त्यानंतर शनिवारी लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केलं आहे.
राज्य सरकारचं शिष्टमंडळ हे उपोषणस्थळी पोहोचले आहे. त्यानंतर आता शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंशी चर्चा करणार आहे.
राज्य सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीला पोहोचलं आहे. त्यामुळे थोड्यावेळात शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्याशी बोलणार आहे.
राज्य सरकारचं शिष्टमंडळ १० मिनिटात वडीगोद्रीला पोहोचणार आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके उपोषण सोडणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बीडच्या पोलिसांकडून ओबीसी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
बीडच्या हातोला येथील महिला आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल
5 महिलांसह 20 ओबीसी आंदोलकांवर बीडच्या अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
आषाढी यात्रेच्या निमित्ताने ७ जुलैपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चौवीस तास दर्शन सुरू राहणार आहे. २६ जुलैपर्यंत विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन २४ तास सुरु आहे.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर जिल्हाधिकारीच्या कक्षात खासदार बळवंत वानखडे व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने खासदार बळवंत वानखडे व यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. यापूर्वी नवनीत राणा यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय देण्यात आलं होतं.
सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगर विमानतळावर पोहोचलं आहे. विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त आहेत. हे शिष्टमंडळ काही वेळातच लक्ष्मण हाके यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
खासदार निलेश लंके हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत. मातोश्रीच्या बाहेर नीलेश लंके यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.
पोलीस भरतीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे.
पोलीस भरतीमधील त्रृटी दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री 10 वाजता मुंबईतील माजी नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली. या नगरसेवकांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. पावसापूर्वीची अपुरी कामे, शिक्षक आणि पदवीधर निवडणुका या विषयी महत्वाची चर्चा होणार आहे. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत राज्य सरकारची शिष्टमंडळ हे वडीगोद्रीला जाण्यासाठी दाखल होणार
छत्रपती संभाजी नगरच्या विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात
कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह इतरही भागात पावसाच्या सरी
पावसामुळे अद्याप कुठेही पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या नाहीत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
घणसोली नोडमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी पहायला मिळाली. फूथपाथवर आणि रस्त्याच्या कडेवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांवर फेरीवाले धावून गेले. यामध्ये अतिक्रमण उपअभियंता रोहित ठाकरे यांना मारण्यासाठी फेरीवाले अंगावर धावून गेल्यानं वातावरण तापलं होतं. शहरात फेरीवाल्यांची वाढती मुजोरी पाहता कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
बालगंधर्वमधील कार्यक्रमाला जाण्याआधी शरद पवार यांच्या मोदी बागेत कार्यकर्त्यांची भेटीगाठी सुरु आहे. कार्यकर्त्यांची शरद पवार यांना भेटण्यासाठी मोदी बागेत मोठी गर्दी झाली आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे देखील शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. तर बीआरएसचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आणि माजी प्रशासकीय आधिकारी बी.जें. देशमुख देखील शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
पालघरमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मागील तसाभरापासून पालघर, बोईसर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाच्या दहाव्या दिवशी माजी मंत्री राजेश टोपे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. हा प्रश्न सुटावा कुठेही तेढ निर्माण होऊ नये, असं भेटीनंतर टोपे यांनी म्हटलं.
बिहारमध्ये आणखी एक परीक्षा पुढे ढकलली आहे. टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षा पुढे ढकलली आहे. 26 जून ते 28 जून दरम्यान ही परीक्षा घेण्यात येणार होती. अपरिहार्य कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा या नंतर जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज GST कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक आहे. या बैठकीला अनेक राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या वतीने सचिव बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला अर्थमंत्री अजित पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. नव सरकार स्थापन झाल्यावर होणारी ही पहिलीच बैठक होत होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापुरातील 16 हजार रिक्षा संपावर जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे 25 जून रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असणार आहे. त्याचदिवशी पासिंग दंडाविरोधात २५ जून रोजी रिक्षाचालक आंदोलन करणार आहे. 16 हजार रिक्षा, टॅक्सीचालक संपावर जाणार आहेत. कोल्हापूर जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असल्याची माहिती मिळत आहे.
ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री आणि पुणे या ठिकाणी सकाळी ११.३० वाजता पोहोचणार आहे. शिष्टमंडळ आधी वडीगोद्रीला जाणार आहे. त्यानंतर पुण्यात रवाना होणार आहे. पुण्याहून पुढे मुंबईला परतणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.