महायुतीचे लोकसभा उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ २३ तारखेला घेणार जाहीर सभा
अकोल्यात दुपारी साडेतीन वाजता सभेचं आयोजन
तसेच २४ एप्रिलला नवनीत राणांच्या प्रचारार्थ शाहांची अमरावतीत सभा
बुधवारी दुपारी दीड वाजता अमित शाह अमरावतीतून घेणार विरोधकांचा समाचार
नंदुरबार लोकसभेच्या माहितीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित हे आपला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंत्री विजयकुमार गावित यासोबतच भाजपचे वरिष्ठ नेते स्थानिक आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून यावेळी ते नंदुरबार मध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत हिना गावित यांच्या निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उद्या सकाळी ढोल ताशाचा गजरात हजारो कार्यकर्त्यांच्या सोबतीने ते भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज हा दाखल करणार आहेत.
देशात शरद पवार यांच्या काळात 10हजार कोटीची कर्ज माफी झाली मात्र आता 10 हजार पेक्षा जास्त शेतकरी दिल्ली ला गेले पण प्रधानमंत्री त्यांना भेटले नाही
आमचं कोरोना च्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार सुरू होत, तेव्हा चांगलं काम सुरू होत, उद्धव ठाकरे सरकार ने शेतकऱ्यांची कर्ज माफी केली होती
पण आता मोदी सरकार ने गरीब लोकांसाठी काहीही केलं नाही ,काही मूठभर लोक श्रीमंत झाली
महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या उद्या सभा
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ उद्या सायंकाळी सहा वाजता संयुक्त सभा
तर उद्धव ठाकरे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी उद्या दुपारी १२ वाजता सभा घेणार
अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे हे विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार सभा करताना नेमकं काय बोलणार? याकडे लक्ष
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना ८ ते ९ किलो सोने चौकशीत आढळून आले आहे. हे सोने आर सी बाफना ज्वेलर्स असल्याची माहिती समोर आलीय. जळगाव शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे नयनतारा शोरुममध्ये रात्री आयकर विभागाच्या पथकाने चौकशी केली.
प्रस्तावित बांधकाम सुरू असलेल्या केंद्रीय मंत्रालयाला आग
काम करणाऱ्या जेसीबीला लागली आग
आगीचे स्वरूप भीषण असल्याची माहिती
फायर ब्रिगेडचे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आग लागलेली इमारत सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा भाग
अजित पवार
निवडणूक आयोगाने काय निर्णय द्यावा त्यामध्ये आम्हाला बोलण्याचा आणि इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही
निवडणूक आयोगाला पूर्णपणे स्वायत्तता आहे
न्यायव्यवस्थेला पण निवडून आयोगाला स्वायत्तता आहे
ही स्वायत्तता आजची नाही आहे
नोटीस येतात त्या संदर्भात नोटीसला उत्तर द्यायचे असते
कुणी काय पराभव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
त्यांनी जय भवानी शब्द काढण्यास नकार दिला त्याबाबत मला काय माहिती
आपण संविधानाचे पालन केलं पाहिजे कायद्याचा पालन केलं पाहिजे
जनमताच अधिकार दिलेला आहे त्याचा आपण पालन केलं पाहिजे समोरच्यांनी पण त्याचा पालन केलं पाहिजे
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना ८ ते ९ किलो सोने चौकशीत आढळून आले असून हे सोने आर सी बाफना ज्वेलर्स असल्याची माहिती समोर
जळगाव शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे नयनतारा शोरुममध्ये रात्री आयकर विभागाच्या पथकाने केली चौकशी
महाराष्ट्रात आणि देशात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे .
एका बाजूला इंडीया आघाडी तर दुसऱ्या बाजूला इंडी आघाडी आहे, त्यामुळें सर्व पक्ष मोदींना हरवण्यासाठी एकत्र आलेले आहे.
पण मला असं वाटतं की मोदींना त्यांच्या कामाची पावती तिसऱ्यांदा भेटणार आहे.
राज्यात ४० पेक्षा जास्त जागा येतील
अमरावती मध्ये वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिल्यानंतर वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेस चे उमेदवार बळबनतं वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शैलेश गवई यांना वंचितने बडतर्फ केलं आहे.
रायगडमधून सुनील तटकरे आणि अनंत गीते यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणारा उमेदवार रिंगणात
महाविकास आघाडीचे अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखी 2 अनंत गीते यांनी यापूर्वीच भरला आहे अर्ज
शंभर दिवसात परदेशातला काळा पैसा आणतो म्हटले होते
१५ लाख देतो म्हटले तो जुमला होता
भारत सरकारकडे काळा पैशाबाबतची माहिती आहे पण कारवाई झाली नाही.
आमचा आरोप आहे मोदींकडे कागदपत्रे असताना कारवाई झाली नाही. तोडपाणी झालेली आहे
(काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टिका)
अर्थकारणाचा विकास दर मोदींच्या कार्यकाळात कमी झाला
मशाल गाण्यात भवानीचा उल्लेख केल्याने निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठविण्यात आलीये. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. ही हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असून आम्ही ते सहन करणार नाही असं म्हटलंय होत. मात्र आता यावरून राज्याचे महसूमंत्री राधाकृष्ण विखेंनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन ढासळलं असल्याचं म्हटलंय. तर ते बेताल विधान करत असून त्यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली असल्याची टीका त्यांनी केलीये. तर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णय योग्य हे कायद्याचे राज्य असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
चर्चगेट विरार लोकलमध्ये प्रवासादरम्यान दोन महिलांची बाचाबाची झाली. दोन्हीही महिलांना रेल्वे डब्यातील सुरक्षा रक्षकांनी आरपीएफ पोलीस ठाण्यात जमा केले. यातील एका महिलेने आपल्या पतीला बोलावून घेतले. आरपीएफ ठाण्यात महिलेचा पती दाखल होताच त्याने विरोधी महिलेचा पती समजून रेल्वे गार्डला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी आता गार्डने मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वसई पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
प्रियांका गांधी या लवकरच पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ प्रियांका गांधी यांचा दौरा असणार आहे.
मुळशी पॅटर्ननुसार गोळीबार केल्यानंतर तरुणावर वार केल्याची घटना पुण्यातील येरवडा भागात २ दिवसांपूर्वी घडली होती. विकी राजू चंडालीया (वय ३१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल चंडालीया याने याआधीच पोलिसात तक्रार दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी मालती शंकर थविल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. प्रचारासाठी काही दिवस उरलेले आहेत. त्यामध्ये आता परभणी लोकसभेचाही समावेश आहे. यापार्श्वभूमीवर परभणीतील महाविकास आघाडीचे संजय जाधव ,महायुतीचे महादेव जानकर ,वंचितचे पंजाबराव डख,बहुजन समाज पार्टीचे आलमगीर खान यांच्यासह इतरांनी मतदारांच्या गाठीभेटीवर जोर लावल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.
नगर जिल्ह्यात कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे.. संगमनेर तालुक्यातील नांदूर शिंगोटे - लोणी रस्त्यावरील नीमोन गावाजवळ हा अपघात झाला आहे. दुचाकीवरील दोन जणांचा जागीच तर एकाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुंडलिक मेंगाळ, युवराज मेंगाळ आणि संदीप आगविले असे मयत तरुणांचे आहे
शरद पवार यांचे जळगावमध्ये आगमन
जळगावमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी शरद पवारांची बंद दाराआड चर्चा
रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे एक गट नाराज
नाराजी दूर करण्यासंदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती
परभणीत वाळू माफियांची दहशत समोर आली आहे. परभणीत वाळू माफियाने थेट सरकारी अधिकाऱ्यांसोबत झटपट केली.
उद्धव ठाकरे यांचा आजपासून चार दिवस विदर्भात प्रचार सभांचा धुरळा उडणार
आज उद्धव ठाकरे यांचा बुलढाणा दौरा
बुलढाणा येथील खामगाव येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा
नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची मोठी सभा बुलढाणा खामगाव येथे घेणार आहेत
आज संध्याकाळी 6 वाजता ही सभा असणार आहे
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी
तालुक्यातील जवळा दुमाला गावात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन घेतला नुकसानीचा आढावा
शेतकऱ्याच्या फळबागा पॉलीहाऊसचे मोठे नुकसान
प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या सूचना
गेल्या काही वर्षांपासून कुर्ल्यात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सध्या उन्हाळा सुरू असून अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत नाही.
कुर्ल्यातील मुरली मिलन सोसायटी, गुप्ता टेरेस, मोरारजी टेरेस येथील रहिवाशी पाण्याच्या समस्येला त्रस्त आहेत
यामुळे त्रस्त रहिवाशांनी मॅच फॅक्टरी लेन परिसरात सोसायटी बाहेर लावले बॅनर...
'नो वॉटर नो व्होट' , पाणी पुरवठा सुरळीत व्हावा नाहीतर मतदानावर बहिष्कार अशा आशयाचे बॅनर..
अमरावतीत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांची बंडखोरी
वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा दिला आहे.
अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीत उभी फूट
समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती
वंचितकडून जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांच्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष
वंचितने आनंदराज आंबेडकर यांना पाठींबा दिल्याने जिल्हाध्यक्ष नाराज
रिपब्लिकन सेना वंचितच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देत नसल्याचा आरोप
वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई करणार बळवंत वानखडे यांचा प्रचार
पुण्यातून झाशीसाठी सोडण्यात 22 विशेष रेल्वे गाड्या येणार आहे.
या मार्गावर 22 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाचा निर्णय
21 एप्रिल ते 20 जून दरम्यान सोडण्यात येणार अतिरिक्त रेल्वे गाड्या
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार प्रकरण
गुन्हे शाखेने गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईला देखील केलं आरोपी
लॉरेन्स सध्या कारागृहात आहे तर अनमोल परदेशात असल्याची माहिती
गोळीबाराच्या काही तासांतच अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबूक खात्यावरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती.
गुन्ह्यात कलम वाढवण्यात आले आहे. या प्रकरणी पुरावे नष्ट करणे आणि धमकी दिल्याबद्दल कलमात वाढ करण्यात आली आहे.
शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार घेणार पक्षाचा आढावा
जामनेर येथे पदाधिकारी, कार्यकर्त्या मेळाव्याला करणार मार्गदर्शन
रावेर लोकसभा मतदारसंघात पक्षांतर्गत नाराजीचा पक्षाला फटका बसू नये म्हणून चर्चा करण्याची शक्यता
माजी आमदार संतोष चौधरी नाराज असल्याने लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.