Today's Marathi News Live : आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना ED कडून अटक

Today's Marathi latest news update : देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...
Aajchya Marathi Batmya Live - 18 April 2024 | Latest Updates on IPL, Amit Shah, Lok Sabha Election, Amit Shah and overall Maharashtra
Aajchya Marathi Batmya Live - 18 April 2024 | Latest Updates on IPL, Amit Shah, Lok Sabha Election, Amit Shah and overall MaharashtraSaam Tv

आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना ED कडून अटक

दिल्ली वक्फ बोर्ड नियुक्ती घोटाळ्याप्रकरणी PMLA कायद्यानुसार त्यांना अटक करण्यात आलीय. खान यांची ED ने 9 तास चौकशी केल्यानंतर त्यांनाअटक करण्यात आली आहे

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्याला अवकाळी पाऊसाचा तडाखा

दरीबडची या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. वादळी वाऱ्याने अनेक घराचे पत्रे गेले उडून, या घटनेत एक लहान मुलगा जखमी झालाय.

वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सहावी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सहावी यादी जाहीर झाली आहे. यात शिर्डी मतदार संघातून उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर साताऱ्यातून सैनिक असलेल्या प्रशांत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना दोन मेपासून सुट्ट्या जाहीर

राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना दोन मेपासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षण संचालनालयाने परिपत्रक काढले आहे. विदर्भ वगळता सर्व ठिकाणी 15 जूनला शाळा सुरू होणार आहेत.

सोलापूर लोकसभा निवडणूकीतून एमआयएमने घेतली माघार

सोलापूर लोकसभेसाठी एमआयएम उमेदवार उभा करणारा नाही. ओवेसी यांच्या आदेशाने पार्टीने घेतला निर्णय घेण्यात आलाय.संविधानाला वाचावाण्यासाठी घेण्यात आला निर्णय,त्यामुळे येत्या काळात संविधान वाचावणाऱ्या पार्टीला समर्थन देणार आहे

नाथाभाऊनंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना विश्वासात घेऊनच एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश घेतला जाईल असं रक्षा खडसे म्हणाल्या.

जळगाव शहरातील सराफ बाजारात सोन्याला झळाळी , 24 कॅरेट सोन्याचे भाव 75 हजार 700 वर

आज जळगाव शहरातील सराफ बाजारात सोनं भावात वाढ झाली आहे. आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 75 हजार 700 वर पोहोचलाय. तर चांदीचा भाव 86 हजार 500 झाला असून ते दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवलीय. युद्धाची परिस्थितीमुळे हे भाव वाढत असल्याचे या ठिकाणी सांगण्यात येत आहे अजून भाव वाढण्याची शक्यता वर्तवलीय.

नरेंद्र मोदी सर्व जाती धर्म घटकाला मदत करतात - अजित पवार

सांगली येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी नागरिकांना महायुतीच्या जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. बळीराजाला अधिक मदत करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणालेत. विजेते शेतीचे पहिले दर होते तेच ठेवायचे, असा आम्ही निर्णय घेतला. आता टेंभू ताकारी म्हैसाळ पुरंदरसह अनेक योजना सोलर पॅनेलवर करण्याचा निर्णय घेतला. या योजनांसाठी लगणाऱ्या विजेची बचत होईल.

लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला भीषण आग

लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला भीषण आग लागलीय. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. आग शमवताना दोन कर्मचारी होरपळले आहेत. ही आग का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यातील कारखाना आहे. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस पोहचले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजी भिडे यांनी घेतली भेट

कवलापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस आणि संभाजी भिडे यांची भेट झाली. संभाजी भिडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केलीय.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

किशोरी पेडणेकर यांना अंतरिम जामीन केला मंजूर झालाय . पेडणेकर यांच्यावर कोवीड काळात डेडबॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात दिलासा मिळावा यासाठी पेडणेकर उच्च न्यायालयात गेल्या होत्या. यावर आज उच्च न्यायालयालयात सुनावणी पार पडली.

रत्नागिरी - रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटला

रत्नागिरी - रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटला आहे. आज अखेर नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. यामुळे नारायण राणे आणि विनायक राऊत अशी लढत रंगणार आहे. नारायण राणे असल्याने कसलीच चिंता नाही माझ्या मताधिक्यामध्ये वाढ होईल, असं विनायक राऊत म्हणालेत.

मीच साडेतीन लाख मतांनी मीच विजयी होणार : महादेव जानकरांचा दावा

परभणी लोकसभा मतदार संघात शिट्टीच वाजणार असून साडेतीन लाख मतांनी मिच विजयी होणार असल्याचा दावा परभणी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी केलाय.आज जानकर यांनी घनसावंगी आणि अंबड तालुक्याचा दौरा करत पायी रॅली काढली या रॅलीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.मला राज्याचा नाही केंद्राचा जानकर व्हायचंय असा टोलाही महादेव जानकर यांनी उत्तम जानकर यांना लगावलाय.

पुण्यातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ विरुद्धात तक्रार

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरुद्धात तक्रार

छत्रपती संभाजीनगर : हर्षवर्धन जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

चौथ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी हर्षवर्धन जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते अपक्ष उमेदवार होते. त्यांच्या त्यावेळच्या उमेदवारीने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली होती. आता यावेळच्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव काय असेल हे पाहावं लागेल.

परभणी लोकसभा मतदारसंघातील 10 ते 12 गावांचा मतदानावर बहिष्कार

परभणी लोकसभा मतदार संघातील गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव ते गोळवाडी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडल्याने 10 ते 12 गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे.20 वर्षांपासून ग्रामस्थ रस्त्यांच्या मागणीसाठी शासन प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करत आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी आज पुन्हा उमेदवारी अर्ज केला दाखल

महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आज पुन्हा एक उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ओमराजे यांनी यापूर्वी अर्ज दाखल करताना ab फॉर्म व इतर कागदपत्रे दिली नव्हती. कागदपत्रे अपूर्ण असल्याने जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी त्रुटीची नोटीस बजावली होती.

भाई जगताप यांची उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून निवडणूक लढवण्याची तयारी

भाई जगतप यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवायची तयारी दर्शवली आहे.

यावर आता राहुल गांधी निर्णय घेतील, हा प्रश्न तुम्ही राहुल गांधींना विचारायला हवा

या लोकसभा मतदारसंघातून मी वर्षा गायकवाड नसीम खान हे इच्छुक आहोत

येता दोन-चार दिवसात यावर निर्णय होईल.

आमदार देवयानी फरांदे धमकी प्रकरण, पोलिसांकडून धमकी देणाऱ्या संशयिताला अटक

- सोशल मीडियावर आमदार देवयानी फरांदे यांना धमकी प्रकरण

- नाशिक पोलिसांकडून धमकी देणाऱ्या संशयिताला अटक

- भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या बंदोबस्तात वाढ

- आमदार देवयानी फरांदे यांनी केली होती पोलीस आयुक्तांकडे तक्रार

- गुस्ताख का साथ देने वाला बी गुस्ताख है, अशा आशयाखाली पोस्ट व्हायरल केल्या होत्या.

PM नरेंद्र मोदी यांची परभणीत 20 एप्रिलला जाहीर सभा

परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. परभणीत 20 एप्रिलला ही जाहीर सभा होणार आहे

ईडीकडून राज कुंद्रा यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त

ईडीने राज कुंद्रा यांची कोट्यावधींची मालमत्ता जप्त केली आहे.

बीटकॉइन प्रकरणी ईडीची कारवाई

एकूण ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पीएमएलए कायद्यांतर्गत करण्यात जप्तीची कारवाई

शिल्पा शेट्टीच्या नावे आलेला जुहू येथील रहिवाशी फ्लॅट तसेच कुंद्रा यांच्या नावे असलेला पुण्यातील बंगला आणि शेअर्स करण्यात आले जप्त

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; २ जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

- मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

- समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ गाडीचा भीषण अपघात

- अपघातात गाडीतील २ जण जागीच ठार, तर ३ जण गंभीर जखमी

- चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

- महामार्गावरील साईड बॅरियरला तोडून गाडी उलटली

- गाडीतील सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगरच्या करवड गावचे रहिवासी

- छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे येत असताना झाला अपघात

रायगडच्या अलिबाग वडखळ रस्त्यावर वाहतूक कोंडी

० अलिबाग वडखळ रस्त्यावर वाहतूक कोंडी

० पेजारी ते अलिबागदरम्यान वाहनांच्या रांगा

० महायुतीची जाहीर सभेसाठी अलिबागला आलेले कार्यकर्ते आणि पर्यटकांच्या वाहनांचा वाहतूक कोंडीमुळे खोळंबा

कोकणात सुनिल तटकरे यांनी मनसे संपवली असताना त्यांचा प्रचार कसा करायाचा? पदाधिकाऱ्यांचा सवाल

महायुतीचे रायगडचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्याबाबत असलेल्या नाराजीला घेऊन रत्नागिरी आणि रायगडचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला

कोकणात सुनिल तटकरे यांनी मनसे संपवली असताना त्यांचा प्रचार कसा करायचा पदाधिकाऱ्यांचा सवाल.

सुनील तटकरेच्या उमेदवारीवरून मनसेमध्ये नाराजी वैभवजी खेडेकर, संतोष नलावडे, सचिन गायकवाड, विनोद जानवलकर यांच्या सह अनेक मनसे पदअधिकारी बैठकीला उपस्तिथ आहेत

महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा सुटला; उदय सामंत यांनी केली उमेदवाराची घोषणा

उदय सामंत काय म्हणाले?

किरण सामंत यांचा पूर्णपणे मानसन्मान महायुतीमध्ये केला जाईल.

महायुतीचे उमेदवार नारायण राणे असतील.

आम्ही आमची भूमिका जाहिर केली आहे.

मुंबई अग्रितांडव! रे रोड परिसरातील गोदामाला आग

मुंबईतील रे रोड परिसरात गोडाऊनला आग

अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल

आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

आगीच कारण अद्याप अस्पष्ट

सोलापुरातील उमेदवारांच्या अर्जात त्रुटी

- सोलापूर लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांच्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात आढळल्या त्रुटी

- दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र आयोगाच्या नमुन्यात नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवाराला पत्राद्वारे कळवले.

- दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जतील एका पानावर राहिली होती स्वाक्षरी

- ही गंभीर बाब नसून पुढील 3 दिवसात ती स्वाक्षरी करावी लागणार आहे.

- ही बाबा लक्षात येताच राम सातपुते यांनी स्वाक्षरी करत केली त्रुटी दूर

- अर्जाच्या छाननीपर्यंत त्रुटीची पूर्तता करण्यासाठी उमेदवारांना वेळ दिला जाणार आहे.

 प्रणिती शिंदेंना मोठा दिलासा; भगीरथ भालकेंकडून पाठिंबा जाहीर

पंढरपूरचे बीआरएसचे नेते भगीरथ भालके यांचा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा ...

भगीरथ भालके यांनी रात्री उशिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची घेतली भेट..

भेटी दरम्यान भालकेंनी प्रणिती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला..

पंढरपूर व मंगळवेढा या भागात भगीरथ भालकेंची मोठी राजकीय ताकद..

भगीरथ भालके यांनी अलीकडेच बी आर एस मध्ये केला होता पक्षप्रवेश...

माझ्यासाठी वैयक्तिक लढाई नाही, ही विचारांची लढाई - सुप्रिया सुळे

बारामतीत अर्ज दाखल करण्यापूर्वी सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

माझ्यासाठी वैयक्तिक लढाई नाही, ही लढाई विचारांची आहे.

समोर कोण लढत आहे, याचा विचार मी करत नाही. कारण मी वैयक्तिक टीका कधी करत नाही.

चंद्रकांत पाटील म्हणतात की, शरद पवार यांना संपवायचे आहे. देशात ज्या नेत्याकडे बघितलं जातं, त्यांच्या विरोधात हे षडयंत्र आहे.

अमित शहा यांच्या सभेसाठी रत्नागिरीतील मैदान निश्चित

रत्नागिरी-

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेसाठी रत्नागिरीतील मैदान निश्चित करण्यात आलं आहे.

भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा सभेसाठी निश्चित

शहा यांच्या सभेसाठी भाजपकडून तीन मैदानाची चाचपणी

रत्नागिरीतील गोगटे काॅलेज मैदान, प्रमोद महाजन क्रिडा संकुल आणि शिवाजी स्टेडिअमच्या मैदानांचा प्रस्ताव त्यापैकी गोगटे कॉलेज मैदानावर सभेची तयारी सुरू

शहांच्या सभेसाठी मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी २४ एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीत जाहीर सभा

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या घोषणा होण्यापूर्वीच भाजपची प्रचार स्टॅस्टर्जी

नाशिकमधील गंगापूर धरणाची पाणी क्षमता वाढली

- नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची क्षमता २३ लाख ४० हजार लिटरनं वाढली

- २ दिवसांत गंगापूर धरणातून काढला २३५० क्युबिक मीटर गाळ

- ७ टीएमसी क्षमता असणाऱ्या गंगापूर धरणाची क्षमता गाळामुळे ५.५ टीएमसीपर्यंत झालीय कमी

- मंगळवारपासून धरणातून गाळ काढण्याच्या कामाला करण्यात आलीय सुरुवात

- दररोज १० तास जेसीबीच्या सहाय्याने काढला जातोय गाळ

- धरणातून काढलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहचवला जातोय.

नगरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला

अहमदनगर शहरातील गाय किंवा परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला आहे. यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरामध्ये पसरल्यानंतर बघ्यांनी तुफान गर्दी केली होती.

गेल्या दोन महिन्यापासून गायके मळ्यात अत्यंत भीतीचे आणि दहशतीचे वातावरण या बिबट्याने केले होते. हा बिबट्या जरी जेर बंद झाला असला तरी आणखी एक मादी व तिचे पिल्ले या भागात आजही निदर्शनास येत असल्याचे या परिसरातील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

त्यामुळे आता मादीला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज भरायला सुरुवात

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यासाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात

चौथ्या टप्प्यात देशात १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघासाठी होणार मतदान

आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर या 10 राज्यामधे होणार मतदान

महाराष्ट्रातील ११ जागेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान

चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी होणार आहे मतदान

महाराष्ट्रातील या ११ मतदार संघात होणार मतदान -

नंदुरबार

जळगाव

रावेर

जालना

छत्रपती संभाजीनगर

मावळ

पुणे

शिरूर

अहमदनगर

शिर्डी

बीड

पुणे हादरलं! गेल्या 24 तासांत 3 गोळीबाराच्या घटना

पुण्यात मागील 24 तासांत तीन गोळीबाराच्या घटना

सिंहगड पोलिस ठाणे हद्दीतील भूमकर चौकात गोळीबार झाल्याची घटना

गणेश गायकवाड याच्यावर गोळीबार झाला असून त्याच्या खांद्याला गोळी लागली आहे.

आज पहाटे अडीच वाजताच्या सुमाराची घटना.

माचीस मागण्याच्या कारणातून वाद झाला असल्याचे समजते.

गोळीबाराच्या घटनेने पुण्यात दहशतीचे वातावरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com