सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण
गुन्हे शाखेन घेतलं एकाला ताब्यात
हरियाणा वरून घेण्यात आलं एकाला ताब्यात
या प्रकरणी गुन्हे शाखेने केली आहे विक्की गुप्ता आणि सागर पाल नावाच्या आरोपींना अटक
नाशिकच्या येवला शहरातील गंगासागर तलावा परिसरात एका नवविवाहित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आलीय. सागर विजय कमोदकर, असे या तरुणाचे नाव आहे. केवळ तीन महिन्यापूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असले तरी आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
जयसिंगपूर परिसरात मुसळधार पाऊस
पावसामुळे जयसिंगपूर सांगली मार्गावरील अनेक झाडं उमळून पडलीत
पावसामुळे झाडं उन-मळून पडल्याने जयसिंगपूर सांगली महामार्गावरील वाहतूक ठप्प
वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
आज बीड जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने बीड- पुणे महामार्गावरील निर्गुडी गावाजवळ झाडे उन्मळून पडल्याने महामार्ग बंद झाला आहे. तर नाळवंडीमध्ये आठ ते दहा घरांची पडझड झाल्याने नागरिकांचा संसार उघड्यावर आलाय. त्याचबरोबर गावामधील जवळपास दीडशे वर्षांपूर्वीच वडाचे झाड पडलय. विद्युत पोल तारा खाली आल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर प्रत्येक लोकसभा मतदान संघाचा मनसे समन्वयक घेणार आढावा
उरलेल्या 4 टप्प्यात जे लोकसभा मतदार संघ आहेत त्यांची मनसे समन्वयक घेणार बैठक
मनसेने महायुतीला का पाठिंबा दिला तसेच महायुतीचा प्रचार कसा करायचा यावर बैठकीत होणार चर्चा
स्थानिक पातळीवर महायुतीचा प्रचार करण्यासंदर्भात काय समस्या असणार आहे ते मनसे समन्वयक पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेणार
आजच मनसेच्या समवक्यांची यादी झाली जाहीर
पुण्यात गारांचा पाऊस सर्वत्र ढगाळ वातावरण विजांचा कडकडाट सोसाट्याचा वादळी वारा
वाघोली परिसरात होर्डिंग कारवर कोसळलं, प्रवासी जखमी
होर्डिंग बाजूला करण्याचं काम सुरू
पुणे नगर महामार्ग वाघोलीत कारवर पडले होल्डिंग, त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली, पाहिल्याच पावसामध्ये होल्डिंग पडण्याचा धोका निर्माण झाल्याने, होल्डिंगबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत सलग ३ ते ४ दिवस युक्तिवाद झाला .
उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने मराठा आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली.
आता सर्व याचिकांची अंतिम सुनावणी १३ जून २०२४ पासून सलगपणे घेण्यात येणार आहे.
ज्युनिअर कोलकाता नावाने असलेला, रोखे आणि स्टॉक मार्केट पोर्टफोलिओ केलं जप्त
यात 15 कोटीचे रोखे आणि स्टॉक पोर्टफोलिओमध्ये 580 कोटीचे स्टॉक,असे 606 कोटींचे अकाउंट्स जप्त केल्याचा ईडीचा दावा
तपासात ज्युनिअर कोलकातासह 15 शेल कंपन्या शोधण्यात इडीला यश
FPI अर्थात फॉरेन पोर्टफोलिओ इंव्हेस्टर केली जात होती गुंतवणूक
सर्व कंपन्यांचे महादेव बेटिंग ॲप प्रवर्तकांसोबत कनेक्शन असल्याचा ईडीचा दावा
अमरावती जिल्ह्यातील सांगवा विठोबाच्या यात्रेसाठी कुटुंबासह आलेल्या दोन युवकांचा मालखेड तलावातील गाळ्यात अडकून मृत्यू झाला आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले, काही वेळातच दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
सर्व्हे काहीही सांगू ,पण राज्यात महायुतीला 45 पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही. उरलेल्या तीन जागा कशा मिळतील यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यात महायुतीला 45 पेक्षा कमी जागा मिळतील असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी ते स्वप्न पाहू नये, असा टोला महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकार्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महायुतीला मोठं यश मिळेल असा अशावाद ही व्यक्त केला.
भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील उद्या सकाळी अर्ज भरणार आहेत
संजयकाका अर्ज भरल्यानंतर 2 वाजता स्टेशन चौकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील काळमांडवी धबधब्यात नाशिकहून सात मित्रांसोबत हर्षल जितेंद्र बागुल वय 22 वर्ष हा फिरण्यासाठी आला होता. काळमांडवी धबधब्यात पोहण्यासाठी उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला. पोलिसांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक ५ मधील 39 सेक्शन साईबाबा मंदिराजवळ गाऊन बाजारात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली आहे. दोन व्यापाऱ्यांच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये हा तुफान राडा झाला आहे. याप्रकरणाचा उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस अधिक तपास करत आहेत.
गेली महिनाभर उखाड्यांना हैराण झालेल्या जयसिंगपूरकरांना थोडासा दिलासा
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याचा पारा 39 अंशांवर
हातकणंगले आणि जयसिंगपूर मध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथे गॅस गळतीमुळे दुपारी च्या सुमारास एका झोपडीला आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की त्याचा आजूबाजूच्या घरांनाही फटका बसला आहे. या आगीमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. काही मोटरसायकलींचे नुकसान झाले आहे. काही बकऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.
पाहिजे तेवढा निधी देतो, तुम्ही त्या प्रमाणात बटना दाबा, या अजित पवार यांच्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. मुनगंटीवार म्हणाले की, अजितदादा बोलले त्यात वावगे काहीच नाही. यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी अशी वक्तव्ये केलेली आहेत. देशात पंतप्रधान मोदी यांचा विकासाचा टॉवर असेल आणि सीमकार्ड शरद पवार गटाचा टाकला, तर मोबाईल चालेल का, असा सवालही त्यांनी केला. अजितदादा बोलले त्यात चुकीचे काही नाही. ते जर बोलले असतील, तर निश्चितपणे ते त्या भागाचा विकास करतील, याची मला खात्री आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
लोकसेवा आयोगा मार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत जालन्याच्या नम्रता दामोधर घोरपडे या तरुणीनी देशात AIR675 रँक मिळवत घवघवीत यश संपादन करत IAS होण्याचा मान मिळवला आहे.नम्रता ही जालना जिल्हापरिषद मध्ये पाणी पुरवठा विभागात अभियंता असलेल्या दामोधर घोरपडे यांच्या कन्या आहे.
लोकसेवा आयोगा मार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत जालन्याच्या नम्रता दामोधर घोरपडे या तरुणीनी देशात AIR675 रँक मिळवत घवघवीत यश संपादन करत IAS होण्याचा मान मिळवला आहे.नम्रता ही जालना जिल्हापरिषद मध्ये पाणी पुरवठा विभागात अभियंता असलेल्या दामोधर घोरपडे यांच्या कन्या आहे. नम्रताच्या या यशाने तिच्यावर जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.नम्रता हिचे IAS होण्याचे स्वप्न होत त्या साठी त्यांनी 12 वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारीला सुरवात केली होती आणि आज त्यांना हे घवघवीत यश संपादन केले आहे...
'माझ्यापुढे आव्हान हे अफवांचे आहे, चुकीच्या चर्चांचे आहे. या चर्चा जनसामान्यांच्या मनात आहेत. त्यांचे निराकरण करण्याचे आव्हान माझ्यापुढे आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. रामनवमीनिमित्त पंकजा मुंडे यांनी बीड तालुक्यातील रामगड येथे दर्शन घेतले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
अमित ठाकरे काय म्हणाले?
महाविकास आघाडी/ उद्धव ठाकरे यांना मुंबईत एकही जागा मिळणार नाही
त्यांच्या विरोधात वातावरण आहे. अमोल किर्तीकर यांचा खिचडी घोटाळा समोर आलाय
देशात पुन्हा मोदी सरकार येणार. 300 च्या आसपास जागा मिळतील.
राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच बिनशर्थ पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार
लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुती विरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार
वसंत मोरेना पंतप्रधान व्हायचंय. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा. महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे.
पुण्यात उद्या महाविकास आघाडीचे मोठं शक्तिप्रदर्शन
बारामती , शिरूर आणि पुण्यासाठी उद्या महाविकास आघाडीचे उमदेवार एकत्रित भरणार उमेदवारी अर्ज
सुप्रिया सुळे ,अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर भरणार एकत्रित अर्ज
पुणे शहरात उद्या महाविकास आघाडीची मोठी रॅली
महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे बडे नेते उद्या पुण्यात असतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह संजय राऊत, जयंत पाटील उद्या रॅलीत होणार सहभागी
बाळासाहेब थोरात ,सचिन अहिर,विश्वजित कदम हे नेते देखील उद्याच्या रॅलीत दिसतील.
यांच्यासह पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक आमदार देखील राहणार उपस्थित
पुण्यातील कॅम्प परिसरात महाविकास आघाडीचे उद्या सभा
पुण्यातून लोकसभेसाठी एमआयएम पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर.
गेल्या पंचवीस वर्ष पुण्यातील राजकारणात सक्रिय असलेले अनिस सुंडके एमआयएम पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात.
अनिस सुंडके नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, लहान भाऊ रईस सूंडके नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आल्या होत्या.
मनसेचे मालाड उपसचिव शेख जब्बार यांनी X अकाउंट एक व्हिडियो शेअर केला आहे.
एक वडापाव विक्रता पायाने पीठ मळताना व्हिडिओ केला शेअर
मालवणी म्हाडा गेट नंबर 8 येथील असल्याची माहिती त्यांनी दिली
या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी X अकाउंट वरून केली आहे
पुण्यातील हडपसरमध्ये फायरींग... - हडपसरच्या शेवाळवाडीतील नंदिनी सोसायटी समोर गोळीबार... - व्यावसायिक वादातून जयवंत खलाटे यांच्यावर सुधीर शेडगे या आरोपीने केला गोळीबार... - खलाटे आणि शेडगे दोघेही माजी सैनिक... शहरात दुसऱ्या दिवशी फायरींग..
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अकोला राजेश्वरनगरीमध्ये येणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे (महायुती) उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होणार आहे. येत्या 21 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता अकोल्यातल्या स्थानिक क्रिकेट क्लब इथे विशाल जाहीर सभा होणारआहे, अशी माहिती भाजपचे प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी दिली आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती विरुद्ध महाआघाडीचे नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत. मात्र रामनवमीच्या निमित्ताने शहरातील किराडपुरा इथल्या राम मंदिरात हे सगळे नेते आले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, त्यासोबतच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, संजय शिरसाट, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे आरतीसाठी उपस्थित होते. आरती संपल्यानंतर बाहेर जाताना मात्र हे एकमेकांना कानात बोलत होते. आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांना पेढा खाऊ घातला.
सलमानला केवळ घाबरवण्याचा होता प्लॅन
घरावर किमान दोन मॅगझिन फायर करण्याचं दिलं होत दोघांना टार्गेट
दोघांनाही सुरवातीला एक लाख रुपये देण्यात आले होते आणि उर्वरित तीन लाख काम झाल्यानंतर
आरोपींना मुंबईतच पिस्तूल देण्यात आल होत ते कोणी दिलं याचा शोध सुरू
लॉरेन्स बिष्णोईची देखील पोलीस घेऊ शकतात कोठडी
तसेच गुन्ह्याच गांभीर्य लक्षात घेता मोक्का लावण्याची शक्यता
पुण्यात माती घेऊन निघालेल्या डंपरला आज बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना वारजे बहुली रस्त्यावर खडकवासला धरणाच्या कोपरा कोठी जवळ घडली. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे पाऊण तास बंद होती. पीएमआरडीए’च्या अग्निशामक दलात वतीने दिलेल्या माहितीनुसार, वारजे येथून माती घेऊन हा डंपर निघाला होता. यावेळी खडकवासला फाटा सोडल्यानंतर गाडी चालू असताना डंपरच्या केबिनमधील वायरिंग शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गेल्या पंधरा दिवसांमध्ये प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडल्या. मात्र आज दुपारी तीन वाजता नंतर प्रचार तोफा थंडावणार आहेत. 19 एप्रिल रोजी पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. मतदानाच्या 48 तास आधी प्रचार तोफा थंडावणार असल्याने आज दुपारी तीन वाजेपर्यंत प्रचाराची लगबग दिसून येत आहे. काँग्रेसकडून सिनेअभिनेत्री रिमी सेन यांचा गडचिरोलीत रोडशो तर भाजपकडूनही गडचिरोली शहरात रॅली काढली जात आहे. दुपारी तीन नंतर प्रचार थंडावणार असून गुप्त प्रचाराला जोर येणार आहे.
भिवंडी येथून मुंबईकडे येणारी वाहतूक ठाणे येथे येणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
भिवंडी येथून येणाऱ्या मार्गावर मुंबई ठाण्याला जोडणारा ठाण्यातील कापूरबावडी येथील उड्डाणपूल दुरुस्तीकरिता करण्यात आला बंद...त्यामुळे वाहतुक धीम्या गतीने..
भिवंडी येथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ठाणे येथे झाली वाहतूक कोंडी
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ट्विटरने काही राजकिय पक्षांच्या पोस्ट हटवल्या आहेत.
वायएसआर काँग्रेस, आम आदमी पार्टी, तेलगू देसम पार्टीचे चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या पोस्ट हटवल्या
आचारसंहितेच उल्लघंन झाल्यामुळं निवडणुकीच्या कालावधीत या पोस्ट हटवल्या
आयोगानं 10 एप्रिल रोजी ट्विटरला मेल पाठवत या पोस्ट हटवण्यास सांगीतल होत
परिणय फुके यांच्या कारला साकोली येथे अपघात. सद्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामुळे रात्री 2 वाजेच्या दरम्यान परिणय फुके हे सकोळीवरुन भंडाऱ्याकडे येत असताना काही तरुण विरुद्ध दिशेनं येत होते. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात फुके यांची गाडी दुभाजकाला आदळली. यात त्यांना कुठलीही जिवीतहानी झाली नाही. पण गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. या प्रकरणी साकोली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा लवकर होण्याची शक्यता आहे.
येत्या २१ किंवा २२ ला होणार प्रसिद्ध जाहीरनामा
शरद पवार यांनी केलेल्या कामावर असणार आधारित जाहीरनामा
वाढती महागाई रोखण्याचे असणार जाहीरनाम्यात उपाय
जाहीरनाम्यात निष्ठावंत राष्ट्रवादी ठासून सांगण्यावर असणार भर
जळगाव शहरातील एमआयडीसी भागातील डी सेक्टर मधील एका ऑइल मिलला आग. जळगाव शहरातील एका ऑइल मिल आग ऑइल मिल सकाळी गोडाऊन भागात आग लागल्याने धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे बंब या ठिकाणी पोहोचल्याने आग आटोक्यात पाण्याचा प्रयत्न सुरू. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा घेणार आज शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांची भेट घेणार
अमरावती लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नवनीत राणा रवी राणा आणि आनंदराव अडसूळ यांचा वाद मिटणार का, याकडे सर्वांचे लक्ष
नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राची याचिका आनंदराव अडसूळ यांनी केली होती दाखल
अमरावती लोकसभेवर आनंदराव अडसूळ यांनी. केला होता दावा. राणांच्या विरोधात थोपाडले होते दंड
एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
मुक्ताईनगर पोलिसांत खडसेंनी दिली फिर्याद
अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल
चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना दि. १५ आणि १६ एप्रिल रोजी फोन करण्यात आल्याची तक्रारीत माहिती
कवी मनाचे नेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे येत्या 19 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचे आत्मपरीक्षण करावे, असे म्हणत मला निवडून दिले तर, मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक पाठपुरावा करणार असल्याचे सांगून बिचुकले यांनी सातारा लोकसभेच्या रणांगणात रनशिंग फुंकले आहे.
धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
तिघांमध्ये बैठकीला सुरुवात
माढा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांची चर्चा
आगामी प्रचार नियोजन आणि बैठकांच्या बाबत धैर्यशील मोहिते करणार शरद पवारांशी चर्चा
उत्तम जानकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष
रामनवमीच्या निमित्ताने नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी
आज रामनवमीच्या निमित्ताने नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. रामनवमीच्या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष आरास करण्यात आली आहे. झेंडूच्या फुलांचं तोरण, मंदिराच्या बाहेर खास रांगोळी, मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, आलेल्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राम जन्म सोहळ्याची तयारी देखील काळाराम मंदिरात सुरू झाली आहे. काळा पाषाणातील असलेल्या मुर्त्यांना दुधाभिषेक जलाभिषेक करत पूजाअर्चा केली जाते आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.