Today Marathi News: T20 विश्वचषक: भारत-कॅनडा सामना रद्द

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (15 june 2024) : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजकीय घडामोडी, राज्यातील पावसाच्या अपडेट, मुंबई वाहतूक कोंडी अपडेट, चिमुकल्यांचा शाळेचा पहिला दिवस, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv
Published On

T20 World Cup 2024: भारत-कॅनडा सामना रद्द 

फ्लोरिडा येथे होणारा भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना रद्द करण्यात आलाय. मैदान ओले असल्याने नाणेफेकही होऊ शकली नाहीये. दरम्यान अ गटात टीम इंडिया अव्वल स्थानावर कायम आहे.

FDI:  आईस्क्रीममध्ये बोट सापडल्या प्रकरणी एफडीआयची कारवाई, फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना

इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

यम्मो आईस्क्रीममध्ये बोट सापडल्या प्रकरणी एफडीआयनं या सूचना दिल्यात.

यम्मो कंपनी इंदापूर, गाजियाबाद आणि पुणे येथील कंपनीतून आईस्क्रीम घेते. बोट कुठल्या कंपनीच्या आईस्क्रीममध्ये बोट सापडलं ते अद्याप माहिती नसलं तरी मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

Buldhana Rain: बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगात मुसळधार पाऊस

जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद परिसरातील सातपुडा पर्वत रंगात मुसळधार पाऊस होतोय. दोन्ही तालुक्यातील सातपुडा पर्वतातून येणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सूनगाव येथील नदीला आलेल्या पुरामुळे झोपडपट्टी भागातील अनेक घरात पाणी शिरले आहे. नद्यांना पाणी आल्याने नागरिकात आनंदाचं वातावरण आहे. खर्डा नदीच्या पुलावरून पाणी असल्याने शेगाव - संग्रामपूर - जळगाव जामोद मार्ग दोन तासांपासून बंद आहे.

Raksha Khadse : खडसे आणि महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतःप्रयत्न करणार: रक्षा खडसे

जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार, केंद्रीय राज्यमंत्री यांची माहिती रक्षा खडसे यांनी दिली. नाथाभाऊ मोठे नेते आहेत, त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतीलचआणि योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.

Murlidhar Mohol: पुरंदर विमानतळाबाबत लवकर निर्णय होईल: मुरलीधर मोहोळ

पुणे विमानतळ रन वे बाबत उद्या बैठक घेण्यात येणार आहे. पुरंदर विमानतळ बाबत लवकर निर्णय होईल. भू-संपादन बाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. नवीन टर्मिनल लवकर सुरू होईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांनी पुण्यात दिलीय.

Adulterated Ghee : नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट तुपाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दफाश

आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोलने ७८० लिटर बनावट तूप जप्त केलंय. अमुल, कृष्णा तसेच सागर ब्रँडच्या नावाखाली बनवाट तुपाची विक्री सुरू झालीय. सी बी कंट्रोल आणि अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकलीय. तुपात पाम तेल, वनस्पती तेल तसेच रंग रंगाची भेसळ करताना दोघांना रंगेहात पकडले. चमन यादव आणि झामन यादव यांच्या विरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 MHT CET चा निकाल उद्या संध्याकाळी 6 वाजता लागणार

MHT CET चा निकाल उद्या लागणार आहे. अधिकृत वेबसाइटवर जाणून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत.

Hingoli Rain: हिंगोलीत ढगफुटी जिंतूर राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

ढगफुटी झाल्याने शेतात आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने कंत्राटदाराने तात्पुरत्या स्वरूपात पुलाचं बांधकाम केलं होतं हा पूल आता पावसाने वाहून गेल्याने वाहतूक व्यवस्था बंद झालीय.

Vidhan Sabha Election : शरद पवार गटाकडून पुण्यातील विधानसभेच्या ६ जागांची मागणी

आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या ⁠पुणे शहरातील पदाधिकार्यांची बैठक झाली. ही बैठक प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पुण्यातील सहा जागा द्याव्यात अशी मागणी केलीय. ⁠२०१९ ला लढवलेल्या चार जागा तर हव्यात. ⁠२०१९ ला हडपसर, खडकवासला, वडगावशेरी, पर्वती जागा लढवण्याचा निर्धार शरद पवार गटाने केलाय.

MP Murlidhar Mohol: मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ पाहिल्यांद्याच पुण्यात दाखल

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ पाहिल्यांद्याच पुणे शहर कार्यालयात येणार आहेत. मोहोळ यांच्या स्वागतासाठी पक्ष कार्यालयात मोठी तयारी सुरू आहे. जेसीबीने हार घालत, फुलांची उधळण करत मोहोळ यांचं पक्ष कार्यालयात स्वागत केलं जाणार आहे.

Pune Rain: पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाची सुरुवात

दुष्काळी संकटाचा सामना करत असताना आता पाऊसाचे जोरदार आगमन झाल्याने ओढे नाले वाहू लागलेत तर शेतशिवार पाण्याखाली गेलाय. त्यामुळे शेतकरी वर्गाला या पावसाने दिलासा मिळतोय.

Amol Kirtikar: अमोल कीर्तिकर प्रकरणात कोर्टात जाऊ - उद्धव ठाकरे

'अमोल कीर्तिकर प्रकरणात आम्ही कोर्टात जाऊ. या प्रकरणी निकाल दिला आहे, त्यावर आम्हाला संशय आहे. आम्ही कोर्टात ते सिद्ध होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणूक एकत्र लढणार - उद्धव ठाकरे

'आम्ही विधानसभेसाठी लवकरात लवकर निर्णय घेणार आहे. आम्ही लोकसभेमध्ये लढलो, त्याच्या अधिक ताकदीने विधानसभा लढणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Maratha Reservation: मंत्रीमंडळाची मंगळवारी बैठक,  सगे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदीबाबत मंत्री शंभूराजे अहवाल मांडणार

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सगे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदीबाबत अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री शंभूराजे मांडणार आहेत. जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे.

Nandurbar News: नंदुरबारमध्ये धडगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी, 1 तासापासून रुग्णवाहिका अडकली 

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमध्ये गेल्या एक तासापासून रुग्णवाहिका अडकली आहे. बेशिस्त वाहनधारकांमुळे धडगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेत वाहनांच्या दीड किलोमीटर रांगच रांगा लागल्या आहेत.

 Narayan Rane: नारायण राणे यांची संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद 

खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषद संध्याकाळी 4 वाजता कुडाळ येथे होणार आहे.

Uttarakhand Accident: अलकनंदा नदीत टेम्पो कोसळला; 8 भाविकांचा जागीच मृत्यू, तर 15 जण जखमी

उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत टेम्पो ट्रॅव्हलर कोसळला. या अपघातात 8 भाविकांचा जागीच मृत्यू, तर 15 जण जखमी झालेत. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 23 भाविक असल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. सर्व भाविक बद्रीनाथ दर्शनासाठी जात होते. हे सर्व भाविक दिल्लीचे असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत.

Sheena Bora Case News : शीना बोरा हत्याकांडाबाबत मोठी अपडेट, जप्त केलेली हाडे गायब

शीना बोरा हत्याकांडाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शीनाच्या सांगाड्यातील हाडांचे अवशे गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. शोधाशोध करूनही सापडले नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

Nagpur News : नागपुरातील धामना अपघात प्रकरण, मृतांचा आकडा वाढला

धामना अपघात प्रकरणात मृतकाचा आकडा 8 वर पोहोचला आहे. श्रद्धा पाटील नामक 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाली आहे. उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला आहे.

 Ghaziabad fire : गाझियाबादमध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

गाझियाबादमध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. फॅक्टरीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या भीषण आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Ravindra Waikar : रवींद्र वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा नोंद

निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यानेच पंडीलकरला फोन पुरवल्याचे समोर आलं आहे.

या प्रकरणी वनराई पोलिसात रवींद्र वायकरांच्या मेहुण्यासहित दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तक्रार दिली. मतमोजणी सुरू असताना दिनेश गुरवनेच पंडीलकरला मोबाइल पुरवल्याचे तपासात उघड झाली आहे.

murlidhar mohol : पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं जंगी स्वागत

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा शहरात विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. मुरलीधर मोहोळ विमानतळावरून निघताच मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी नागरिकांकडून मोहोळ यांचे स्वागत करण्यात आलं. महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून शहरात मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ आज प्रथमच पुण्यात आले आहेत.

Jalna Rain Update : जालन्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहार भिजला

जालन्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. जालन्यातील परतुरमध्ये लिखित पिंपरी गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. या पावसामुळे अंगणवाडीमध्ये शिरल्याने अंगणवाडीत बालकांसाठीचा ठेवलेला जवळपास दीड क्विंटल पूरक पोषण आहार भिजला आहे. तर गरोदर महिलांच्या किट देखील भिजल्या आहेत.

Sunita Kejriwal : कोर्टाच्या कामकाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढा, कोर्टाकडून सुनीता केजरीवाल यांना सूचना

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर सुनीता केजरीवाल यांनी कोर्टाला व्हीसीद्वारे बाजू मांडली होती, तो व्हिडिओ काढण्याच्या कोर्टाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Thane Politics : ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी नगरसेविकेचा शिंदे गटात प्रवेश

ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसला आहे.

मीरा भाईंदर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका व शहर अध्यक्ष तारा घरत यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.

मीरा भाईंदर शहरात अधिक दोन माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे.

 Amit Shah : जम्मू-काश्मीरबाबत अमित शहा यांनी बोलावली महत्वाची बैठक

जम्मू-काश्मीरबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित राहणार आहेत.

जम्मू-काश्मीरमधील सद्य परिस्थिती बाबतचा आढावा शहा घेणार आहेत.

Maratha Reservation : मंत्री उदय सामंत घेणार मनोज जरांगे यांची भेट

मंत्री उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. मंत्री उदय सामंत हे आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Sikkim Rain Update : सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर; ६ जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक पर्यटक अडकले

सिक्कीमला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. या पावसामुळे 1200 हून अधिक पर्यटक अनेक ठिकाणी अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे विविध घटनेत जवळपास 6 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे अनेक भागातील दरडी कोसळल्याने अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. अनेक नद्यांना पूर आल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा दिला इशारा आहे.

yogi adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घेणार मोहन भागवत यांची भेट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आरआरएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार आहे.

संघाने भाजप संदर्भात केलेल्या वक्तव्याचा पार्श्वभूमीवर दोघांमध्ये महत्वाची भेट होणार आहे.

तसेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आलेले अपयशासह योगी हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांचे भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर झळकले

बारामतीत सुनेत्रा पवार यांचे भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर झळकले आहे.

सुनेत्रा पवार राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

बारामती शहरातील श्रीकांत जाधव मित्रपरिवाराने शहरभर बॅनर लावले.

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार?

महाविकास आघाडीची आज दुपारी दोन वाजता मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्र येथे संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले संबोधित करणार आहेत. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते काय बोलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा पुण्यात येणार

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आज केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात येणार आहेत. पुणे विमानतळावर पुणे शहर भाजपकडून त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. विमानतळापासून ते पुणे भाजप कार्यलयापर्यंत जल्लोष रॅली काढण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com