Today's Marathi News Live: भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांना मातृशोक

Maharashtra Live Marathi Batmya and Updates (15 April 2024): देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...
Saam TV Live News in Marathi
Breaking News and live updates in Marathi | 15 April 2024 Latest Update on PM Narendra Modi, Uddhav Thackeray, Salman Khan, CBSE, Pune and overall MaharashtraSaam TV
Published On

भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांना मातृशोक

भाजप नेते व माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या मातोश्री गुणवंतीबेन जयंतीलाल सोमया यांचे निधन झाले आहे.

अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात

गेल्या 2 दिवासाआधी अवकाळी पावसाने जिल्हात थैमान घातले होते,व मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. पुन्हा आलेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांचे नुकसान होणार आहे.

उमेदवारी घेण्यावरून विनायक राऊतांचा नारायण राणे आणि किरण सामंतांना चिमटा

मागच्या विधानसभेला नरेंद्र मोदींची सभा होऊन देखील भाजपच्या दारुण पराभव झाला होता. अमित शहा जरी आले तरी कोकण हा बाळासाहेबांचा कुणीही दुरावा निर्माण करु शकणार नाही. कोकण नारायण राणे आणि किरण सामंत यांनी घेतलेले उमेदवारी अर्ज म्हणजे राजकारणाची थट्टा, अशी अवेहलना का होते याचा विचार दोघांनी करावा, अशी टीका विनायक राऊतांनी केलीय.

अंबाबाई देवीचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत सुरू

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण. श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे सकाळचे धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर देवीच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येईल. संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभाग शाखा, औरंगाबाद यांच्याकडील अधिकाऱ्यांमार्फत १४ व १५ एप्रिल २०२४ रोजी संवर्धन प्रक्रिया करण्यात आली आहे.

पालघरमध्ये एसटी बसची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिला सरपंचाचा मृत्यू

- पालघर-मनोर महामार्गावरील मनोर बाजारपेठेत भीषण अपघात

- भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक

- अपघातात सरपंच सोनाली लोखंडे यांचा जागीच मृत्यू

- भीषण अपघाताची घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद

मुंबईची मेट्रो लाईन विस्कळीत

मेट्रो डोर बंद होत नसल्यामुळे बाकीच्या मेट्रो उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

धैर्यशील मोहिते पाटील उद्या भरणार उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र शरद पवार यांच्या इतर मतदारसंघातील पूर्वनियोजित दौऱ्यामुळे उपस्थित राहणार नाहीत.कालच शरद पवार यांनी अकलूज मधील शिवरत्न बंगल्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती.

सुनेत्रा पवार १८ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्या १८ तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत राहणार आहेत.

संजय राऊत १९ एप्रिलला पुन्हा सांगली दौऱ्यावर

चंद्रहार पाटील यांच्यासाठी पुन्हा एकदा संजय राऊत मैदानात उतरले आहेत. संजय राऊत चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सांगलीसाठी काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक असताना ही जागा ठाकरे गटाला गेल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे.

पैठण तालुक्यात उष्माघाताने 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

मराठवाड्यात पैठण तालुक्यातील बिडकिन येथे 30 वर्षीय युवकाचा रविवारी उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मराठवाडा हा पहिला बळी असल्याची चर्चा सुरू आहे.

सांगलीत महाविकास आघाडीला धक्का

शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील आणि कार्यकर्ते नाराज झालेत. दुसरीकडे विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून पाटील यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय.

सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला - शरद पवार

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दुसऱ्या संशयिताची ओळख पटली

विशाल उर्फ कालूसोबत होता त्याचा सारंग नावाचा साथीदार

सलमानच्या घरावर गोळीबार करून दोघेही बिहारला पळल्याचा संशय

बिहार, जयपूर तसेच दिल्लीला मुंबई गुन्हे शाखेची पथके रवाना

CBSE च्या सहावी, नववी आणि ११वी विद्यार्थ्यांच्या गुणांसाठी क्रेडिट सिस्टीम राबवणार

सीबीएसई शाळांमध्ये सहावी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांसाठी क्रेडिट सिस्टीम राबवली जाणार

सहावीच्या विद्यार्थ्याला ४० क्रेडिट, तर नववीच्या विद्यार्थ्याला ४० ते ५४ क्रेडिट आणि अकरावीच्या विद्यार्थ्यालाही देणार क्रेडिट

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक

वर्षभरात वर्गात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार

येत्या शैक्षणिक वर्षापासून २०२४-२५ हा बदल लागू करण्यात येणार

पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी घेतला उमेदवारी अर्ज

मुरलीधर मोहोळ यांना भारतीय जनता पक्षाकडून एबी फॉर्म

भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे यांच्या हस्ते मोहोळ यांना दिला अर्ज

खासदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित

लवकरच मोहोळ भरणार उमेदवारी अर्ज

राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. कोल्हापुरातील दसरा चौक परिसरातून पारंपरिक पद्धतीने बैलगाडीत बसून हजारो कार्यकर्त्यांसोबत राजू शेट्टी यांनी शक्तिप्रदर्शन केले. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात रॅली काढून राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.

ठाकरेंना मुंबईत धक्का, माजी नगरसेविका अश्विनी मते यांचा भाजपत प्रवेश

घाटकोपर येथील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांचा भाजपमध्ये प्रवेश

आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत प्रवेश

बारामतीमधील लाटे गावातील शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, आत्महत्येचा Video व्हायरल

बारामती येथील लाटे गावातील एका शेतकऱ्याने कॅमेऱ्यासमोर आत्महत्या केलीय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऐन निवडणुकीत कोकणात राऊत-राणे यांच्यात जुंपली

भाजप नेते निलेश राणे लवकरच करणार गौप्यस्फोट

खासदार विनायक राऊतांना निलेश राणेंचा इशारा

रेड्डी पोर्टवरून राणे विरोधात राऊत सामना

रेड्डी पोर्टच्या अधिकाऱ्यांसोबत राऊत कुटुंबाचे संबंध उघड करणार

पत्रकार परिषद घेत राणे करणार राऊतांची पोलखोल

संविधान बदलण्याचा खोटा प्रचार सुरू; अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल

कोल्हापूर :

संविधान बदलण्याचा खोटा प्रचार त्यांच्याकडून सुरू आहे.

2014 आणि 2019 साली तसंच केलं. 2024 मधील निवडणुकीतही ते तसेच वागत आहेत.

देशाचे जवाहरलाल नेहरू झाल्यापासून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक पंतप्रधान झालेत.

या सगळ्यांच्या काळामध्ये घटनेमध्ये 106 वेळा बदल झालेले आहेत.

त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का?

लोकांची दिशाभूल सुरू आहे. मोदींबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत.

या खोट्या प्रचाराला बळी पडू नका

अजित पवार यांनी डागली विरोधकांवर तोफ

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, संभाजीनगरमधील घटना

कारमध्ये सिलिंडरमधून गॅस भरताना भीषण स्फोट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या निमखेडा येथील घटना

स्फोटाच्या आवाजानं गाव हादरलं, गावकऱ्यांच्या कानठळ्या बसल्या

मुंबई, रायगड आणि ठाण्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा

आज आणि उद्यासाठी (१५ आणि १६ एप्रिल) उष्णतेच्या लाटेचा अंदाज

सरासरी तापमानात ४.५ अंश सेल्सिअसहून अधिक वाढीचा अंदाज

कमाल तापमान ३७-३९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता

भरपूर पाणी प्या आणि सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान घराबाहेर न पडण्याचं हवामान विभागाकडून आवाहन

मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा झटका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका करणार भाजपत प्रवेश

घाटकोपर येथील माजी नगरसेविका आणि विभाग संघटक अश्विनी मते थोड्याच वेळात करणार भाजपत प्रवेश

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार, हल्लेखोरांचं 'रायगड कनेक्शन'

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाचं रायगड कनेक्शन समोर आलंय

गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा मूळ मालक आणि मध्यस्थीची चौकशी सुरू

नवी मुंबईतील दोघांची गुन्हे शाखेकडून चौकशी

हल्लेखोरांनी दुचाकी पेणवरून खरेदी केल्याची माहिती

गोळीबार केल्यानंतर माउंट मेरी चर्चजवळच दुचाकी सोडून केला होता पोबारा

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तिढा वाढला

नारायण राणेंनंतर इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्यासाठी घेण्यात आले उमेदवारी अर्ज

किरण सामंत यांच्याकडून घेण्यात आले चार उमेदवारी अर्ज

शिवसेनेकडून किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार

कालच किरण सामंत यांनी नागपूर येथे जाऊन घेतली होती देवेंद्र फडणवीस यांची घेतली होती भेट

दोन्ही इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज घेण्यात आल्याने उमेदवार कोण याची उत्सुकता शिगेला

रायगडचे 'इंडिया आघाडी'चे उमेदवार अनंत गीतेंनी भरला उमेदवारी अर्ज

रायगड :

'इंडिया आघाडी'चे उमेदवार अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे केला अर्ज दाखल

रायगड लोकसभा मतदारसंघातून गीतेंनी भरला उमेदवारी अर्ज

आमदार भास्कर जाधव, आमदार जयंत पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, काँग्रेसचे प्रवीण ठाकूर उपस्थित

नवनीत राणा यांचे बॅनर EC ने हटवले

अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांचे बॅनर निवडणूक आयोगाने हटवले

प्रचाराचे बॅनर लावण्यासाठी ग्रामपंचायतची परवानगी न घेतल्यामुळे कारवाई

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामधील तळवेल ग्रामपंचायत हद्दीत लागले होते प्रचाराचे बॅनर

बारामतीत शेतकऱ्यानं संपवलं जीवन

बारामती :

बारामतीत शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने व्हिडिओमध्ये सांगितली हाकिगत

शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हनुमंत सणस असे शेतकऱ्याचे नाव

बारामती तालुक्यातील लाटे येथील घटना

माजी आमदार नारायण आबा पाटील करणार शरद पवार गटात प्रवेश

26 एप्रिल रोजी जाहीर सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत नारायण पाटील आपल्या शेकडो समर्थकांसह करणार प्रवेश

नारायण पाटील हे मोहिते पाटील समर्थक

प्रकाश आवाडे यांची निवडणुकीतून माघार, बंड शमवण्यात एकनाथ शिंदे यशस्वी

कोल्हापूर :

महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत स्वतः प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना

प्रकाश आवाडे यांचे बंड थंड करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी

यंदा मान्सूनचं आगमन कधी? भारतीय हवामान खात्याची आज महत्वाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली -

भारतीय हवामान खात्याची (IMD) आज दुपारी २.३० वाजता होणार पत्रकार परिषद

मान्सूनच्या आगमनाची घोषणा आज केली जाणार

यंदा देशात पावसाचं प्रमाण कसं असणार? बळीराजाला दिलासा मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळणार

हवामान खात्याच्या पत्रकार परिषदेनंतर देशातल्या यंदाच्या मान्सूनची परिस्थिती स्पष्ट होणार

कपिल पाटील यांनी राज ठाकरे यांची घेतली भेट

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी राज ठाकरे यांची घेतली भेट

15 मिनिटांच्या भेटीनंतर कपिल पाटील माध्यमांशी न बोलताच निघून गेले

पुण्यातील काँग्रेसचे नाराज नेते आबा बागुल आणि देवेंद्र फडणवीसांची नागपुरात भेट, चर्चांना उधाण

पुण्याचे काँग्रेस मध्ये नाराज असलेले नेते आबा बागुल यांनी नागपुरात देवेद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. एका लग्न समारंभामध्ये नागपूरला आबा बागुल भाजपच्या दोन्ही नेत्यांना भेटले. भेट राजकीय नाही, लग्नात भेट झाल्याचं बागुल यांचा दावा

शरद पवार साताऱ्यात दाखल

साताऱ्यात शरद पवारांचं जंगी स्वागत, शरद पवार यांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे अर्ज दाखल करणार. साताऱ्यात शरद पवार गटाचं शक्तिप्रदर्शन

BRS नेत्या के कविता यांना न्यायालयीन कोठडी

BRS नेत्या के कविता यांना २३ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात CBI ने के. कविता यांना केली अटक होती.

विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयाचा निर्णय

Saam TV Live News in Marathi
Devendra Fadnavis : राहुल गांधींना दोष देणार नाही, कारण ते वाचत नाहीत; जाहीरनाम्यावरून देवेंद्र फडणवीसांची टीका

महायुतीची ताकद वाढणार, आज मराठा महासंघ पाठिंबा देणार

आज मराठा महासंघ महायुतीला पाठिंबा देणार आहे.

लोकसभेसाठी मराठा महासंघ महायुतीला पाठिंबा देणार

मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप आणि महायुती मधील प्रमुख नेत्यांची दुपारी २ वाजता पत्रकार परिषद

भाजपच्या प्रदेश कार्यालयात होणार पत्रकार परिषद

या पत्रकार परिषदेत मराठा महासंघाकडून महायुतीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पाठिंबा जाहीर केला जाणार

गरीब वर्गाकरिता पुढील 5 वर्षकरिता मोफत अन्न : देवेंद्र फडणवीस

संकल्पपत्रावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

- गरीब वर्गाकरिता पुढील 5 वर्षकरिता मोफत अन्न

- आयुष्यमान भारत अंतर्गत चिकित्सा उपचार मोफत

- ट्रान्सजेंडर चा समावेश आयुष्यमान मध्ये झाला आहे

- 3 कोटी घर मिळणार

बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

बीडच्या केज तालुक्यातील औरंगपूर येथील इयत्ता 8 वीमध्ये शिकणाऱ्या हर्षदा फसके या विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. तिच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना दिनांक 12 रोजी तिचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कुंबेफळ येथील दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून अधिक तपास युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करत आहेत.

भाजपचा जाहीरनामा हाच महायुतीचा जाहीरनामा : मुख्यमंत्री शिंदे

भाजपच्या जाहीरनाम्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'भाजपचा जाहीरनामा हाच महायुतीचा जाहीरनामा आहे. त्याच मी स्वागत करतो. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी जे केलं. या जाहीरनामा सर्वसामान्यांचं जीवन बदलणारा जाहीरनामा आहे. त्याचं मी स्वागत करतो आणि मोदींना धन्यवाद देतो'.

जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास 400 कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील,बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते जवळपास 60 ते 70 वाहनातून बुलढाण्यात पोहोचले होते. बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश समारोहाच्या वेळी मोठी घोषणाबाजी झाली. यामुळे मात्र जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का पोहोचला आहे.

सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट आधीच ठरला होता, समोर आली महत्वाची माहिती

सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबाराचा कट आधीच ठरल्याचे समोर आलं आहे.

सुरुवातीला असा कयास बांधला जात होता की गोळीबारात वापरलेली बाईक चोरीची आहे.

मात्र तपासात ही बाईक विकत घेतल्याचं निष्पन्न झाल आहे.

रायगडच्या पेणवरून सेकंड हॅन्ड बाईक विकत घेण्यात आली होती.

सध्या पोलीस या बाईकच्या मूळ मालकाची चौकशी करत आहेत.

काल माउंट मेरी चर्चजवळून ही बाईक जप्त करण्यात आली होती.

मनमाड-मालेगावर महामार्गावर बस उलटली; ५० पेक्षा अधिक प्रवासी जखमी

पुणे येथून नेपाळकडे जात असलेली ट्रॅव्हल बस मनमाड-मालेगाव महामार्गावर व-हाणे गावाजवळ उलटली. या अपघातात जवळपास ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले. आता त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविले आहे. तर या अपघातात एका दहा वर्षाच्या मुलाचा हात अडकल्याने जेसीबीच्या सहाय्याने त्याला मदत करत बाहेर काढण्यात आले. स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे हा अपघात झाल्याच बोलले जात आहे. आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान घेणार अरविंद केजरीवाल यांची भेट

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार

दुपारी १२ वाजता तिहार जेलमध्ये घेणार भेट

अरविंद केजरीवाल कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आहेत अटकेत

सातऱ्यात शरद पवार गट शक्तीप्रदर्शन करणार

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार आज साताऱ्यात उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानातून शरद पवार साताऱ्याला होणार रवाना.

साताऱ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि महाविकास आघाडीचे मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. तर सातारा दौरा आटोपून शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात येणार आहेत. आज संध्याकाळी बारामती लोकसभा मतदारसंघातील यवत मध्ये शरद पवारांची जाहीर सभा. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे आज शरद पवार गटात करणार प्रवेश होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com