Today Marathi News : जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, घनसावंगी तालुक्यातील शेवगाव येथील नदीला पूर

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (14 june 2024) : पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौरा, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबईसह महाराष्ट्रातील पावसाच्या अपडेट, वाहतूक सेवा, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, घनसावंगी तालुक्यातील शेवगाव येथील नदीला पूर

जालना जिल्ह्यात आज सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली घनसावंगी तालुक्यातल्या शेवगाव येथे आज जोरदार पाऊस बरसल्याने नदीला पूर आलाय. या पुरामुळे रांजणी घनसावंगी रोड वरच्या पुलावरून पाणी वाहू लागलंय. जिल्ह्यातील बदनापूर अंबड घनसावंगी या तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस बरसत असून यामुळे बळीराजा सुखावला आहे.

लेखिका अरुंधती रॉय यांच्या अडचणीत वाढ, UAPA अंतर्गत खटला चालवण्याची परवानगी

अरुंधती रॉय यांच्या विरोधात UAPA अंतर्गत खटला चालवण्याची दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिली परवानगी. अरुंधती रॉय आणि काश्मीरचे माजी प्राध्यापक शेख शौकत हुसेन यांच्यावर 2010 मध्ये एका कार्यक्रमात कथित प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांंच्यावर आरोप आहे.

Ashadhi Wari 2024 : दौंड येथील प्रस्तावित कत्तलखाना रद्द करण्याचा निर्णय, आषाढी वारीच्या बैठकी केली होती मागणी

आषाढी वारीच्या बैठकीत घेतलेला महत्वाचा निर्णय

दौंड येथील प्रस्तावित कत्तलखाना रद्द करण्याचा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांची आग्रही मागणी केली मान्य

दौंड येथील कत्तलखाना रद्द करण्यासाठी बंडातात्या कराडकर हे आंदोलनाच्या पवित्र्यात होते.

या कत्तलखान्यामुळे भीमा आणि इंद्रायणी नदी अपवित्र होईल अशी वारकऱ्यांचे म्हणणे होते.

रत्नागिरी - अनुस्कुरा घाटातील दरड हटविण्यात यश,  सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी रस्ता खुला

रत्नागिरी - अनुस्कुरा घाट अखेर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला

घाटातील दरड हटविण्यात प्रशासनाला यश

घाटातील मोठा दगड ब्लास्टिंग करून करण्यात आला बाजूला

दुपारी दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती

आता सर्व दरड हटविण्यात आल्याने रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी करण्यात आला खुला

वाशिममध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, संत्री बागांसह पिकांचं मोठं नुकसान

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यांतील जनुना, मोहरी, गिंभा, खडी, पोटी, बेलखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस...

मोहरी येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे संत्रा पीक, भाजीपाल्याचे मोठं नुकसान..

अवघ्या तासभराच्या पावसाने पेरणीकरीता तयार केलेली शेते पार खरडून गेली..

Nagpur Blast : चामुंडी एक्सप्लोझीव कंपनीकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखाचे चेक वाटप

कंपनी मालकाकडून 25 लाखाचा निधी असलेले चेक वाटप सुरू

तहसीलदार यांनी आणलेले चेक माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी जीप अध्यक्ष सुनीता देशमुख यांच्या हस्ते मृतकाचं कुटुंबियांना चेक वाटप

कंपनी कडून आलेले चेक तहसील यांनी आणले नंतर वाटप झाले आहे..

शेतात एकत्र बसलेल्या चौघांवर कोसळली वीज, संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात दुर्घटना

संभाजीनगर वैजापूर तालुक्यात वीज पडून एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी

मुसळधार पाऊस आल्यानंतर शेतात एकत्र बसलेल्या चौघांवर वीज पडली

मराठवाड्यात १४ दिवसात वीज पडून २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

पावसाळ्यात वीज पडण्याचे संकट मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर

वैजापूर तालुक्यातील शिवराई येथील घटना

B. S. Yeddyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना हाय कोर्टाचा दिलासा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना कर्नाटक हायकोर्टाचा मोठा दिलासा

फास्ट ट्रॅक कोर्टाने अटक वॉरंट जारी केलेल्या निर्णयाला कोर्टाने दिली स्थगिती

पुढील सुनावणी पर्यंत येडियुरप्पा यांना अटकेपासून दिलासा

न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानुसार येडियुरप्पा यांना १७ जून रोजी CID समोर तपासासाठी हजर राहाव लागणार

Kolhapur News : मालवणहून पुण्याला जाणारी एसटी बस दाजीपूरमध्ये झाली पलटी

कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर इथं मालवणहून पुण्याला जाणारी एसटी बस झाली पलटी

वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा बसवरील सुटला ताबा

या अपघातात पाच प्रवासी जखमी तर एसटीचं मोठं नुकसान

Monsoon Session : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै दरम्यान होणार  

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै दरम्यान होणार आहे. अधिवेशनात पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

सांगोल्यात पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाला ठोकले टाळे

राज्यात शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. अशातच सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत १३० शिक्षक कमी आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याच मुद्द्यावर आज सांगोला येथे गटशिक्षण अधिकारी कार्यालयास संतप्त पालकांनी टाळे ठोकले.

Sandipan Bhumre  : संदीपान भूमरेंनी दिला आमदारकीचा राजीनामा

शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भूमरे यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे दिलं राजीनाम्याचं पत्र.

मानवी तस्करी, सायबर क्राईमप्रकरणी NIA ची नाशिकमध्ये मोठी कारवाई

मानवी तस्करी, सट्टेबाजी आणि सायबर फ्रॉड प्रकरणी नाशिकमधून एकाला अटक

सुदर्शन दराडे असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव

थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाममध्ये अवैध पद्धतीने मानवी तस्करी, सायबर फ्रॉड, सट्टेबाजी आणि अन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर NIA ची कारवाई

Assembly Session : विधीमंडळ कामगाज सल्लागार समितीची मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत थोड्याच वेळात बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात पोहचले असून थोड्याच वेळात विधीमंडळ कामगाज सल्लागार समितीची होणार बैठक. ५ आठवडे पावसाळी अधिवेशन कालावधी असावा अशी अनेक आमदारांची इच्छा व्यक्त केली आहे.

Jalna News : जालन्यात व्यापाऱ्याची फसवणूक; आरोपीकडून तब्बल 45 लाख रुपये जप्त

जालना आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीकडून तब्बल 45 लाख रुपये जप्त केले आहेत. २५० कोटींचे कर्ज देतो म्हणत जालन्यातील व्यापाऱ्याला अडीच कोटींचा गंडा घातला आहे.

Nagpur Blast : नागपुरातील स्फोटप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक, नागपूर-अमरावती महामार्ग रोखला

मृतदेह असलेल्या रुग्णवाहिका चामुंडा कंपनीच्या गेट समोर नेण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामस्थ आक्रमक झाले असून नागपूर अमरावती महामार्ग रोखून धरला आहे. जोपर्यंत चेक मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

MP Nilesh Lanke : गजा मारणेकडून सत्कार स्वीकारल्यानंतर निलेश लंकेंची सारवासारव

दिल्ली वरून आल्यानंतर मी एका हॉस्पिटल कामानिमित्त गेलो होतो. त्यावेळी रस्त्यात काहींनी हात केला आणि सत्कार केला तो पर्यत तो व्यक्ती कोण होता मला माहीत नाही, मी अशा व्यक्तींना जवळ करत नाही, नंतर मला पार्श्वभूमी समजली ही भेट नियोजित नाही तर अपघाताने घडली. अजित पवार गटाकडे काही बोलायला नाही म्हणून ते बोलत असल्यांच नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

Kolhapur News: कोल्हापूर आणि कोकणाला जोडणारा अनुस्कुरा घाट 18 तासापासून बंद

कोल्हापूर आणि कोकणाला जोडणारा अनुस्कुरा घाट गेल्या 18 तासापासून बंद आहे. अनुस्कुरा घाटात दरड कोसळली आहे. प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मोठे दगड ब्रेकरच्या साह्याने तोडून रस्त्यावरून हटवण्याचे काम सुरू आहे.

Hingoli Rain: हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात पावसाची हजेरी

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे, गेल्या तीन दिवसात या भागात दमदार पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

Nagpur Blast : नागपुरातील चामुंडा कंपनी ब्लास्ट प्रकरण, संचालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा

नागपुरातील चामुंडा एक्सप्लोसिव्ह ब्लास्ट प्रकरणी कंपनीचे मालक शिव शंकर खेमका यांना हिंगणा पोलिसांनी ताब्यात घेतलं. संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनुष्यवध, मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajit Pawar : पक्षात कोणीही नाराज नाही - अजित पवार

छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चेवर अजित पवार काय म्हणाले?

छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे की, कोणीही नाराज नाही.

विरोधक किंवा आमचे जवळचे मित्र असून त्यांनी बातम्या पेरल्या आहेत.

Dombivli News : डोंबिवलीत फ्लॅटमध्ये आढळला वयोवृद्ध महिलेचा मृतदेह

डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्री नगर परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. वसंत निवास इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सापडला आहे. आशा रायकर (65 )असे या मृत महिलेचे नाव आहे. हत्या की अपघात ? विष्णू नगर पोलिसांचा तपास सुरू आहे.

Karnataka News : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना जेल की बेल? आज होणार निर्णय

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना जेल की बेल याचा निर्णय आज होणार आहे.

फास्टट्रॅक कोर्टाने काल येडियुरप्पा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं.

कोर्टाच्या त्या निर्णयाविरोधात येडियुरप्पा यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

येडियुरप्पा यांच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

Neet Exam : नीट परीक्षा घोटाळा प्रकरण : CBI चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळणार नाही - सुप्रीम कोर्ट

नीट परीक्षा घोटाळा प्रकरण सुप्रीम कोर्टाचं भाष्य

सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टाने एकत्र केल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाने counselingवर बंदी घालण्यास नकार दिला आहे.

CBI चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळणार नाही, असेही कोर्टाने म्हटलं आहे.

kalyan News : कल्याणमधील किल्ले दुर्गाडीच्या बुरुजाचा भाग ढासळला

कल्याणमधील किल्ले दुर्गाडीच्या बुरुजाचा भाग ढासळला आहे गुरुवारी झालेल्या पावसामुळे मध्यरात्रीच्या सुमारास बुरुजाचा भाग ढासळला.छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला उभारला होता. या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी सरकारनेही निधी दिला होता.

Raj Thackeray Birthday : मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज ठाकरेंना वाढदिवसांच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर माध्यमातून राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Kolhapur : कोल्हापुरातील अनुस्कुरा घाटाची वाहतूक 16 तासापासून बंद

कोल्हापूर कोकणाला जोडणारा अनुस्कुरा घाट गेल्या 16 तासापासून बंद आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत असल्याने दरड कोसळल्याने अनुस्कुरा घाट बंद झाला आहे. अनुस्कुरा घाटातील दरड काढण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुलै पासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. 'एकला चलो रे' च्या बैठकीतील निर्णयानंतर राज ठाकरे महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

East vidarbha : पूर्व विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा, पावसाअभावी वातावरणात उकाडा

पूर्व विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनची नागरिकांना अजूनही प्रतीक्षाच आहे. पावसाअभावी वातावरणात नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवत आहे. बुधवारी नागपुरात 41.1 कमाल तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूरमध्ये 41.8 कमाल तापमानाची नोंद झाली. नागपूरसह चंद्रपूर, वर्धा,भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे.

alibaug news : अलिबागच्या समुद्रात बुडून पुण्यातील तरुणाचा मृत्यू

पुण्यातील आळंदीतून अलिबागला फिरायला आलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. अविनाश शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे.

Anna Hazare : शिखर बँक घोटाळा प्रकरण; क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार

शिखर बँक घोटाळा प्रकरणातअतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आव्हान देणार आहेत. या प्रकरणी अण्णा हजारे निषेध याचिका दाखल करणार आहेत. अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला.

Sharad Pawar News : शरद पवार दुष्काळी प्रश्नाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार

शरद पवार दुष्काळी प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. अद्याप या दोन्ही नेत्यांच्या भेटीची वेळ मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे.B

Narendra Modi News : PM मोदी जी-7 देशांच्या बैठकीसाठी इटलीला पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 देशांच्या बैठकीसाठी इटलीला पोहोचले आहेत. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, 'मी जी-7 देशांच्या बैठकीसाठी इटलीला पोहोचलो. मला आशा आहे की, जगभरातील नेते सकारात्मक चर्चा करतील. ही चर्चा चांगले परिणाम देणारी असेल. आम्ही जगासमोरील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चांगल्या भविष्यासाठी सहकार्य वाढवण्यावर आमचा भर असेल'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com