Today's Marathi News Live: भ्रष्टाचारासंदर्भात भाजपच्या लोकांची थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार? संजय राऊतांचं ट्वीट

Maharashtra Live Marathi and Updates (14 April 2024): देश विदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...
Aajchya Marathi Batmya Live 14 April 2024 | Latest Updates on  IPL, Lok Sabha Election, PM Narendra Modi and overall Maharashtra
Aajchya Marathi Batmya Live 14 April 2024 | Latest Updates on IPL, Lok Sabha Election, PM Narendra Modi and overall MaharashtraSaam TV

भ्रष्टाचारासंदर्भात भाजपच्या लोकांची थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार? संजय राऊतांचं ट्वीट

महाराष्ट्रातील भाजपचे नेते भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलीय. सोशल मीडियावर पोस्ट करत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींकडे भाजप नेत्यांची तक्रार केलीय.

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण; संशयिताची ओळख पटली

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. संशयित हल्लेखोराची ओळख पटल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आलाय. या हल्लेखोराचे नाव गँगस्टर विशाल उर्फ कालू असे आहे. काही महिन्यांपूर्वी रोहतकच्या गुरूग्राममधील एका स्क्रॅप डीलरवर अंधाधुंद फायरिंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

पुणे अपघात: पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरताना रिक्षाने घेतला पेट

सातारा रोडवरील भापकर पेट्रोल पंपावर सीएनजी भरत असताना रिक्षाच्या टाकीचा स्फोट झाला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सर्तकतेने मोठा अनर्थ टाळला.

सलमान खान गोळीबार प्रकरण:  राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला

गॅलेक्सीच्या बाहेर सकाळी गोळीबारीची घटना घडल्यानंतर मुंबई खळबळ उडालीय. सलमान खानला इशारा देण्यासाठी बिष्णोई गॅगकडून हा गोळीबार करण्यात आला. गोळीबारीची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सलमान खानची विचारपूस केलीय. आता राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला गेले आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रवेश

सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात आजपासून पुन्हा नवे वादळ उठण्यास सुरुवात होत असुन एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या राजकारणावर मोठे वर्चस्व असलेले मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा जिल्ह्याच्या राजकरणाची सूत्रे हाती घेण्याची तयारी आज अकलूज येथुन सूरू झाली आहे, असेच म्हटले जात आहे. आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशिलकुमार शिंदे, जयंत पाटील हे अकलूजला शिवरत्न बंगल्यावर येऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करुन गेले. तर सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्य उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्ष प्रवेश केला.

 गोंदीयाला समृद्धी महामार्गाला जोडणार, भंडाऱ्याच्या सभेत अमित शहांचं आश्वासन 

समृद्धी महामार्ग नागपूरपर्यंत होता, तो आता गोंदीया पर्यंत नेणार आहे. हा भाग दुर्गम आहे. त्यामुळे विकासापासून नेहमीच वंचित राहीला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर गोंदीयाला समृद्धी महामार्गाला जोडणार आहे. त्यामुळे या इथल्या जनतेचा थेट पुणे, मुंबईशी संबध येईल. विकासाची साधने पोहचवण्यासाठी मदत होणार आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

पुढच्या ३ वर्षात नक्षलवाद संपवून टाकणार, अमित शहांचं भंडाऱ्याच्या सभेत आश्वासन

नरेंद्र मोदींनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध केलं. सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानाला सडेतोड उत्तर दिलं. छत्तीसगडमधील नक्षलवात संपवला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरपुढच्या ३ वर्षांत नक्षलवादाचा समूळ नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी जे घोषणा पत्र सादर केलं तेच इंदिरा गांधी यांनीही सादर केलं होतं. मात्र गरिबी गेली नाही. मोदींनी ते करुन दाखवलं.

५ दशकं सत्तेत राहूनही बाबासाहेबांना भारतरत्न दिलं नाही, अमित शहांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

अमित शहा यांची आज भंडाऱ्यात प्रचारसभा होत आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत हरवलं होतं. ५ दशकं सत्तेत असूनही बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिलं नाही.

काँग्रेस खोटं बोलते भाजपला 400 सीट मिळाली तर आरक्षण संपवणार

आम्ही कधी आरक्षण नाही संपवणार

आम्ही बहुमतच्या उपयोग 370 आणि ट्रिपल तलाक संपवला

भाजप जेव्हा पर्यंत आहेत तेव्हा पर्यंत आरक्षण संपणार नाही

ही मोदी ची गॅरंटी आहे

व्होट सुनील मेंढे ला द्या, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार आहेत

ओबीसींसाठी 60 वर्षात काय केलं सांगा; देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना खुलं आव्हान

370 कलम रद्द करणारे अमित भाई शाह..

डॉ आंबेडकर यांनी सर्वांना समान अधिकार दिले

मोदी म्हणतात बाबासाहेबांचा संविधान होत म्हणून चाय विकणारा पंतप्रधान बनला

एक विकास पुरुष मोदी...आमचा कडे आता मनसे चा इंजिनं आलं...दुसरीकडे राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये डब्बेच नाहीत

महाराष्ट्रात ओबीसी निर्णयाचे 30 निर्णय झाले

ओबीसी विद्यार्थ्यांची पूर्ण व्यवस्था, महायुती सरकारने केली...

- 60 वर्ष ओबीसींसाठी कायदा केला नाही, मोदीने केलं..

- 10 वर्ष ट्रेलर होत पिक्चर अभी बाकी है...

- केंद्र सरकार राज्य सरकार तुमचा साठी कटिबद्ध आहे....

शरद पवार गटाचे नाराज नेते अभयसिंह जगताप आणि जयंत पाटील गुप्त बैठक

शरद पवार गटाचे नाराज नेते अभयसिंह जगताप आणि जयंत पाटील यांची अकलूज मध्ये गुप्त बैठक

शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने जगताप नाराज.

जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे केली होती घोषणा.

त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जगताप यांची गुप्त भेट.

भेटीचा तपशील समजू शकला नाही.

विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भेटीसाठी प्रणिती शिंदे अकलूजमध्ये

प्रणिती शिंदे विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भेटीला

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडल्यानंतर प्रणिती शिंदे अकलूजमध्ये

आज शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, पोलिसांना सापडली संशयास्पद दुचाकी

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पोलिसांना संशयास्पद दुचाकी सापडली आहे. गोळीबार करण्यासाठी बाईकचा वापर झाल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केलाय

भाईंदरमध्ये इमारतिची भिंत कोसळली; दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

भाईंदर पूर्वेच्या एका इमारतिच्या सदनिका मधील भिंत कोसळली

यामध्ये दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू,एक जखमी

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाणे समोरील इमारती घडली घटना

श्रीनाथ ज्योती बिल्डिंगमध्ये तळ मजल्यावर एका सदनिका मध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले, दोन मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला.

मृत व्यक्तीची नाव हरिनाम चौहान वय वर्षे ५५,तर मखनलाल यादव वय वर्षे २६ असे आहे.

आकाश कुमार यादव जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत

संविधान कोणी बदलू शकत नाही : देवेंद्र फडणवीस

विरोधकांकडून संविधान बदलण्याचा आरोप होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत प्रतिक्रिया दिलीय, विरोधकांना बोलायला मुद्देच नाही. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारची त्यांची नीती आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणी बदलू शकत नाही. बाबासाहेबांचे संविधान आहे म्हणून चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री झाला असे ते म्हणाले.

उल्हासनगरच्या समता नगर स्मशानभूमीत लागली आग

उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील समता नगर स्मशानभूमी आज दुपारी आग लागली. या आगीत स्मशानातील काही झाडे तसेच सुकलेली लाकडे जळालीत. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळावर पोहोचून ही आग अटोक्यात आणली. अग्निशामक दल लागलीच घटनास्थळी पोहोचल्याने स्मशानात सरणासाठी असलेली लाकडे थोडक्यात वाचली. ही आग कशामुळे लागली त्याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर लागलीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

नंदुरबार लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री उमेदवार दिल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नंदुरबार लोकसभेसाठी हेमंत सूर्यवंशी यांची उमेदवारी निश्चित केली आहे. सूर्यवंशी हे टोकरे कोळी समाजाचे आहेत तर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसने नवीन उमेदवार दिल्यामुळे जोरदार प्रचार करावा लागत आहे. तर दुसरीकडे वंचितनेही उमेदवार दिला असल्यामुळे काँग्रेस समोर आता नवीन आव्हान येऊन ठेपलं आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे महायुतीच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरणार असून या अपक्ष उमेदवारांमुळे नेमकं कुणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार, हे येणाऱ्या काळात लवकरच समजणार आहे. मात्र नंदुरबार लोकसभेसाठी उमेदवारांची संख्या वाढत असल्याने निवडणूक ही रंगतदार होणार हे मात्र निश्चित आहे.

मानखुर्दमध्ये भाजपच्या प्रचार रथाची तोडफोड; परिसरात तणावाचं वातावरण

मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड परिसरात अज्ञात व्यक्तींनी भाजपच्या प्रचार रथाची तोडफोड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो असलेले बँनर फाडून टाकण्यात आले आहे. या घटनेनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी सलमान नावाच्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

माढ्यातील अभय जगतापांच्या बंडाची शरद पवारांनी घेतली दखल

माढ्यातील अभय जगतापांच्या बंडाची शरद पवारांनी घेतली दखल

शरद पवारांनी अभय जगतापांना तातडीनं भेटीसाठी बोलावलं

माढ्यात धैर्यशिल मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढण्याचे अभय जगतापांनी दिले होते संकेत

शरद पवारांच्या बैठकीनंतर अभय जगतापांची भूमिका काय घेणार याकडे माढ्यातील नेत्यांचं लक्ष

अभय जगताप अपक्ष उभे राहिल्यास याचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. यामुळे शरद पवारांनी सावध पवित्रा घेतला आहे.

पृथ्वीवरून थेट स्वर्गात जागा मिळवून देतो, पुण्यातील डॉक्टरांची ६ कोटींची फसवणूक

पृथ्वीवरून थेट स्वर्गात जागा मिळवून देतो असं म्हणत पुण्यातील नामांकित डॉक्टरांची तब्बल ६ कोटींची फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अब्दुल मजीद शेख, यास्मिन शेख,इतैए श्याम शेख, अम्मा सादीक शेख आणि राजू आढाव अशी आरोपींची नावे आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंकडून थेट सलमान खानला फोन; नेमकी काय चर्चा झाली?

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रेतील घराबाहेर आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारानंतर विरोधी पक्षाने सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला फोन करुन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे.

गोळीबारानंतर शिंदेंनी सलमान खानला धीर दिला आहे. घाबरण्याचं काम नाही, तुमच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानला सांगितलं आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं निमित्त साधत भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिला सक्षमकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भाजपच्या या जाहीरनाम्यावर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यांनी १० वर्षात रोज संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुडदा पाडला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे ढोंग आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

तुम्ही आजचा दिवस निवडला असेल तर ती त्यांच्या मनातली भीती आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारासंदर्भात मोठी अपडेट

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रेतील घराबाहेर आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोई टोळीने केला असावा, असा संशय मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून अनेक पथके तैनात केली आहेत. सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा कायदा लागू करावा; उदयनराजे कडाडले

देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 133 व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले जात आहे साताऱ्यातही खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने नगरपालिका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलत असताना त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांना बाबत कायदा आणण्याची विनंती केली आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, ज्यांची लायकी नाही अशी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी महापुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील अशी वक्तव्य करत असतात.

अशा व्यक्तींवर देशद्रोहाचा कायदा लागू केला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

भाजपचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध; अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ आले असून राजकीय नेत्यांनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप आज लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. या जाहीरनाम्यात अनेक मोठमोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाहीरनाम्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com