Today's Marathi News Live : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वरळी सी लिंकवर आकर्षित विद्युत रोषणाई

Maharashtra Live Marathi and Updates (13 April 2024): राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, विशाल पाटील यांची भूमिका, माढा लोकसभा, लोकसभा निवडणूक, आयएपीएल सामना, देशातील आणि राज्यातील महत्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
Aajchya Marathi Batmya Live - 13 April 2024 | Latest Updates on  IPL, Lok Sabha Election, PM Narendra Modi and overall Maharashtra
Aajchya Marathi Batmya Live - 13 April 2024 | Latest Updates on IPL, Lok Sabha Election, PM Narendra Modi and overall MaharashtraSaam TV

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वरळी सी लिंकवर आकर्षित विद्युत रोषणाई

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्यावर हल्ला, रोड शो दरम्यान दगडफेक

विजयवाडा इथं रोडशो सुरू असताना दगडफेकीत मुख्यमंत्री जखमी

मुख्यमंत्र्यांच्या डाव्या भूवईला मार

आमदार वेल्लामपल्ली हल्ल्यात जखमी

हल्ल्यानंतर प्रथमोपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रोड शो पुन्हा सुरू केल्याची माहिती

20 हजार वह्यांच्या माध्यमातून 8 हजार स्क्वेअर फूटमध्ये साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती

बीडच्या गेवराई येथे भीम ज्योती जन्मोत्सव समितीच्या वतीने तब्बल 8 हजार स्क्वेअर फुटवर 20 हजार वह्यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. जयंती समितीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून उद्देश पघळ यांनी ही प्रतिकृती साकारली आहे. गेल्या 10 दिवसांपासून यासाठी तयारी सुरू होती. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.

अंबरनाथ स्थानकात प्रवाशांनी दिला एकाला चांगलाच चोप

अंबरनाथ रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांना चाकू, आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्याच्या बहाण्याने उभ्या असणाऱ्या दोन तरुणांपैकी एकाला प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी चांगला चोप दिलाय,अंबरनाथ रेल्वे फलाट क्रमांक एक व दोन वरील मुंबई दिशेला उभ्या असणाऱ्या दोन पैकी एका तरुणाला जमावाने पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

उत्तर मुंबईतून तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी?; काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याची शक्यता

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आयात करणार ?

उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या तेजस्विनी घोसाळकर यांना काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिली जाणार - सूत्र

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार

तेजस्विनी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार होत्या

चांगला संपर्क असल्याने त्यांच्या नावावर शिककामोर्तब होण्याची शक्यता

सूत्रांची माहिती

पुणे महापालिकेने दोन अनधिकृत पब केले जमीनदोस्त

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कल्याणीनगरमध्ये कारवाई करीत सील केलेल्या ‘एलरो’ आणि ‘युनिकॉर्न’ या दोन्ही पबवर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने हातोडा चालवत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बाळा नांदगावकर यांची घेतली भेट

दक्षिण मुंबई मध्ये मंगलप्रभात लोढा इच्छुक आहेत

मनसेचे पाठिंबा देण्यात आला त्यामुळे मंगलप्रभात लोढा यांनी गाठीभेटी वाढवल्या आहेत

माझ्यासमोर कोणाचंही आव्हान नाही; माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा दावा

धैर्यशील मोहिते पाटील यांचे किंवा इतर कोणत्याही उमेदवाराचे माझ्यासमोर आव्हान नाही. असा मोठा दावा माढ्याचे भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज पंढरपुरात केला. ही निवडणूक कोणाला पाडण्यासाठी किंवा कोणाची जिरवण्यासाठी नाही तर देशाला तिसरी महासत्ता बनविण्यासाठी ही निवडणूक आहे. देशात विरोधी पक्ष सुध्दा राहणार नाही. माझा समोर ना कोणत्या पक्षाचे किंवा उमेदवाराचे आव्हान नाही असं ही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.‌

मुंबईतील जागांवर काँग्रेसची बैठक,  २ जागा मिळाल्याने नेते आहेत नाराज

काँग्रेस नेते बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल आणि आमदार अस्लम शेख बैठकीसाठी दाखल

मुंबईमध्ये काँग्रेसला २ जागा मिळाल्याने नेते आहेत नाराज

मुंबईची परिस्थिती अध्यक्षांच्या समोर मांडणार

सोबतच काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या २ जागी कोण उमेदवार असावेत यावरही चर्चा होण्याची शक्यता

केंद्रीय मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

मुंबईत चार सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा विचारला जाब

मुंबईतील विरार भागामध्ये संरक्षक उपकरणाविना सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची स्वच्छता करणाऱ्या चार कामगारांचा झाला होता मृत्यू

आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिलेत

रस्ता ओलांडताना टँकरची धडक,  शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू

नाशिकच्या येवला शहरातील विंचूर चौफुली येथे संध्याकाळच्या सुमारास ट्युशनवरून सायकलने घरी जात असलेल्या भूमिका पटेल या शाळकरी मुलीला टँकरची धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

विशाल पाटील लढले तर पाठिंबाही देऊ आणि निवडूनही आणू, प्रकाश आंबेडकर यांचं आश्वासन

सांगली लोकसभेत विशाल पाटील लढले, तर त्यांना पाठिंबाही देऊ आणि निवडूनही आणू

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली ग्वाही

चार दिवसांपूर्वी विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी आंबडेकर यांची घेतली होती भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित होणार

उद्या सकाळी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जाहीरनाम्याच प्रकाशन सकाळी ८.३० वाजता होणार भाजप मुख्यालयात प्रकाशन

अकलूजमध्ये तीन बडे नेते एकत्र, धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाला असणार उपस्थित

धैर्यशिल मोहिते पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यानिमित्त शरद पवार, सुशिलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित असणार आहेत.

महादेव ॲप प्रकरणी साहिल खानची तीन तास चौकशी

अभिनेता साहिल खानची मुंबई पोलीस आयुक्तालयात तीन तास चौकशी

पोलिसांना सहकार्य करणार असल्याचा साहिल खानचा दावा

या प्रकरणी साहिल खान आहे आरोपी

सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्या नंतर साहिल खान चौकशीला हजर

तामिळनाडूत AIADMK ला MIM पक्षाचा पाठिंबा

तामिळनाडूत AIADMK ला असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षाचा पाठिंबा

असदुद्दीन ओवेसी ट्विट -

AIADMK ने भाजपसोबत युती करण्यास नकार दिलाय

आगामी काळात देखील कधीही भाजपशी युती न करण्याचे वचन त्यांनी दिलंय

CAA, NPR आणि NRC ला विरोध करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिलय

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत MIM ने AIADMK ला पाठिंबा दिलाय

विधानसभा निवडणुकीसाठीही आमची युती कायम राहणार

MIM प्रमुख असद्दुदिन ओवेसी यांची ट्विट करत माहिती

स्वाभिमानीच्या २०० कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, 15 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश

शेतकरी आंदोलनात गुन्हे दाखल असल्याने 15 एप्रिलला पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना

15 एप्रिल रोजी माजी खासदार राजू शेट्टी भरणार उमेदवारी अर्ज

अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते जमू नये यासाठी सरकारने छडयंत्र केल्याचा राजू शेट्टींचा आरोप

कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्ते पोलीस ठाण्यात हजेरी लावणार नाहीत

सरकार व मुख्यमंत्री रडीचा डाव खेळत असल्याचा ही शेट्टींचा आरोप

मात्र मागील हंगामातील ऊसाचे पैसे घेतल्याशिवाय सरकार व कारखानदारांना सोडणार नाही

राजू शेट्टींचा इशारा

सुषमा अंधारेंविरोधात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंविरोधात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार.

तक्रार करत केली कठोर कारवाईची मागणी

राजकीय फायदा व निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी तक्रार.

वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या विरोधात अंधारेंनी पत्रकार परिषद घेत त्या पत्रकार परिषदेत १७ महिन्यांच्या मुलाला मंचावर केले होते उपस्थित

त्या प्रकरणी बालहक्क संरक्षण आयोगाने केली तक्रार

नरेंद्र मोदी महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही,  राहुल गांधींचा गंभीर आरोप

गेल्या १० वर्षात नरेंद्र मोदींनी उद्योगपतींसाठी सरकार चालवलं. सामान्य जनतेच्या हाताला मात्र काहीही लागलं नाही. भाजपवाले आणि नरेंद्र मोदी कधीही महागाईवर बोलत नाहीत. कधी शेकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. शेतीमालाला भाव नाही. तरुणांना रोजगार नाही, अशी परिस्थिती सध्या देशात असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

हातकणंगलेत प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीचं टेन्शन वाढलं

प्रकाश आवाडे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू

या बैठकीला मंत्री शंभूराजे देसाई, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने देखील उपस्थित

बैठकीतून धैर्यशील माने अचानक आले बाहेर

उद्धव ठाकरेंची पालघरची सभा फेल, म्हणून लोकल प्रवासाचा इव्हेंट, संजय शिरसाट यांचा दावा

पालघर ची सभा फेल गेली म्हणून लोकल चा इव्हेंट केला लोक सोबत संवाद साधला का

आमचे मुंबईकर गेली अनेक वर्ष प्रवस करतात

राज ठाकरे हे मास लीडर आहेत

त्यांनी काही सभेचे आयोजन सुद्धा केले आहे

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र आले तर हिंदुत्त्वाची लाट येईल

राज्यात 45 पेक्षा जास्त जागा निवडून येतील

अजित पवार यांच्या जिजाई बंगल्यावरून बारामती लोकसभेची मोर्चेबांधणी

पुण्यात अजित पवार यांच्या शिवाजीनगर येथील जिजाई बंगल्यावरून सुरूय बारामती लोकसभेची मोर्चेबांधणी

बारामती लोकसभा जिंकण्यासाठी अजित पवार लागले कामाला.

आज सकाळपासूनच पुण्यातील जिजाई बंगल्यावर नुसताच भेटीगाठींचा धडाका

अनेक संघटनांनाही दादांकडून भेटीसाठी पाचारण

दलित पँथर पासून ते कलाकारांपर्यंत सगळेच दादांना भेटण्यासाठी जिजाई बंगल्यावर..

सकाळपासून किमान हजारेक कार्यकर्ते दादांना भेटून गेले असावेत

मुंबईतील बीकेसी परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग

निवृत्ती वेतन विभागाच्या या कार्यालयाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला लागली आहे आग..

कार्यालयातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतरही आग विझत नसल्याने अग्निशमन दलाला पाचारण...

नुकतीच आग लागली असून आगीचे कारण सध्या तरी अस्पष्ट...

अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू...

अपक्ष आमदार प्रकाश आवाडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

प्रकाश आवाडे यांनी कालच हातकणंगले लोक सभा निवडणूक लढवण्याची केली होती घोषणा

महायुतीचे उमेदवार असताना देखील प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीची केली आहे घोषणा

हातकणंगले लोकसभा निवडणुकी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आवाडे यांच्यात होणार चर्चा

मुंबई काँग्रेस विभागीय अध्यक्ष वर्षा गायकवाड,  अस्लम शेख, अमिन पटेल दिल्लीला रवाना

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस कैसी वेणुगोपाल यांची आज भेट घेण्याची शक्यता

मुंबईतील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड नाराज

आम्हाला संमिश्र सरकार हवंय- उद्धव ठाकरे

 उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. यामध्ये बोलताना त्यांनी आम्हाला संमिश्र सरकार हवंय, असं म्हटलं आहे. 

जळगावमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली; बीआरएसचे जळगावच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश

जळगावमध्ये बीआरएसला मोठा धक्का बसला आहे. जळगावचे बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभेच राहू शकलं नसतं - राज ठाकरे

राज ठाकरे काय काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला तरी, नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभेच राहू शकलं नसतं. मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं, असे राज ठाकरे म्हणाले. एका बाजूला खंबीर नेतृत्व असताना म्हणून आमच्या पक्षाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आमच्या काही मागण्या आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, गड किल्ल्याचं संरक्षण... उद्योग धंद्यात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य समान अपत्यांसारखी बघावीत.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

न्यायमुर्ती संजीव खन्ना आणि दिपांकर दत्ता करणार केजरीवाल यांच्या अटकेवर सुनावणी

केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात दिले आहे आव्हान

दिल्ली उच्च न्यायालयाने आपची याचिका फेटाळून लावल्यानंतर आपचं पुढचं पाऊल

केजरीवाल यांची अटक योग्य असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने ९ एप्रिलच्या निकालात म्हटलं होतं.

विजय वडेट्टीवार यांची मंत्री अत्राम यांच्यावर सडकून टीका

विजय वडेट्टीवार यांची मंत्री अत्राम यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'लोकसभा निवडणुकीत अत्राम यांचा गड ढासळणार, भाजप बरोबर बैठकीचे पुरावे द्या नाहीतर राजकारण सोडा, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा; गरोदर मातेच्या पोषण आहारात आढळली कीड

Today's Marathi News Live : चिंता वाढली! राज्यात फक्त 33 टक्के पाणीसाठा

राज्यात 33% पाणीसाठा

आजचा पाणीसाठा अहवाल

कोकण ४० टक्के साठा़

पुणे ३१ टक्के

नाशिक ३५ टक्के

औरंगाबाद मराठवाडा सर्वात‌ कमी १८ टक्के

अमरावती ४१ टक्के

नागपुर ४४ टक्के

मोदींचे नाणे घासून गुळगुळीत झालंय; संजय राऊत यांची टीका

संजय राऊत हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. 'मोदींचे नाणे घासून गुळगुळीत झालंय. मोदी मोदी आता बाजारात चालत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

देशात भाजपच्या 400 पेक्षा जास्त जागा येतील : अशोक चव्हाण

देशात चारशे पेक्षा अधिक जागा येतील, असं वक्तव्य भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी केलंय. ते नांदेड येथे भाजपच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

'विकसित भारताची ही संकल्पना आहे. या विकसित भारत संकल्पनेला खऱ्या अर्थाने अंमलात आणायचं असेल, तर मग लोकांपर्यंत पोहचणारा नेता सर्व मान्य नेता निवडून गेला पाहिजे. आज ज्या वेळेस भाजपने 400 पार चा नारा सुरू केला आहे, म्हणजे काही तरी कॅल्क्युलेशन असेल. काहीतरी कॅल्क्युलेशन असल्याशिवाय 400 पारचा नारा उगाच कोणी देणार नाही. देशांमध्ये जे वातावरण आहे, त्या वातावरणाच्या अनुषंगाने केलेलं कॅल्क्युलेशन आहे. देशांमध्ये भाजप आणि मित्र पक्षाच्या 400 पेक्षा अधिक जागा आल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणाले.

लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरीत जिल्ह्यात स्टॅम्पचा तुटवडा

लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरीत जिल्ह्यात स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्टॅम्प व्हेंडरकडे सध्या स्टॅप आणि बाॅण्ड शिल्लक नाहीत. स्टॅम्प व्हेंडरचे दर तीन वर्षांनी होणारे लायसन्स नुतनीकरण न झाल्याने अडचणी अनेक सरकारी कामे खोळंबली, नागरिकांचे मोठे हाल जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडून मार्च महिन्याच्या शेवटी नुतनीकरणाचे लायन्सन देणं अपेक्षित रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ४० स्टॅम्प व्हेंडर, स्टॅप आणि बाॅण्ड व्हेंडरकडे नसल्याने अडचणी महसुल विभागातील अनेक कामांना ब्रेक, उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा अडचणींना सामना करावा लागणार

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रविंद्र वायकरांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रविंद्र वायकरांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत रविंद्र वायकर यांना उमेदवारी देण्यावर चर्चा

घोटाळ्याचे आरोप असलेल्या रविंद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका

भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा वायकरांविरोधात नकाराचा सूर

महायुतीचा प्रचार करताना अडचण निर्माण होऊ शकते

भाजप कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली नाराजी

अमोल कीर्तिकरांविरोधातील प्रचारात भाजपची कोंडी होण्याची कार्यकर्त्यांनी व्यक्त केली भावना

निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवला,दोन कर्मचारी निलंबित

लोकसभा निवडणुकीसाठी उभे करण्यात आलेल्या चेक पोस्टमध्ये विनापरवानगी गैरहजर राहिल्या प्रकरणी 2 जणांचे निलंबन करण्यात आले आहे. तुळजापूर तालुका कृषी कार्यालय येथील वरिष्ठ लिपीक एस एस सोलनकर आणि पंचायत समिती तुळजापूर येथील ग्रामसेवक डी डी कांबळे यांचे निलंबन करण्यात आले आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक कामात हलगर्जी पणाचा ठपका ठेवत त्यांना निलंबित केले आहे.

बुलडाण्यातील देव्हारी गावाला अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक घरात शिरले पाणी

बुलढाणा जिल्ह्यात चौथ्या दिवशी देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाका बसलाय. मोताळा तालुक्यासह बुलढाणा तालुक्यातील देव्हारी या गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि तुफान गारपीट झाली आहे. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांचं मोठं नुकसान झालंय. तर घरातील आवश्यक वस्तूंचे नुकसान झाले. काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी देव्हारी गावातील नुकसानीची पाहणी केली. नागरिकांना तात्काळ मदत करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अमरावतीत वादळी वाऱ्याने झाडे कोसळली, अनेक मार्ग बंद; शाळेला सुट्टी

अमरावतीत आज पहाटे शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने शहरातील अनेक भागात झाडे कोसळून पडली. यामुळे इर्विन चौकातील भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रकार कार्यालय अक्षरशा जमीन दोस्त झाले. शहरातील बस स्थानकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद बस स्थानकांकडून चौकात जाणारा मार्गावर विजेच्या तारा व झाडे कोसळली. खापर्डे बगीच्यातील राजवाडे विद्याभवनाच्या दोन्ही बाजूने झाडे पडली. शाळेच्या भिंतीवर देखील झाड कोसळल्याने, शाळेकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद झाल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली. शहरात अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.

लातूर जिल्ह्यात चौथ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी

लातूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटत अवकाळी पाऊस पडतो आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागातील शेती पिकाचे , आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागे सह इतर शेती पिकाच मोठ नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यात वीज पडून एकूण 7 पशुधन दगावल्याची देखील माहिती समोर येत आहे..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.