Today's Marathi News Live: महायुतीच्या सलग दुसऱ्या मेळाव्याला पूनम महाजन अनुपस्थित

Maharashtra Live Marathi and Updates (12 April 2024): धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला राजीनामा, लोकसभा निवडणूक, आयपीएल सामना , देशातील आणि राज्यातील महत्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
Maharashtra's Live News by Saam Tv
Live Marathi Batmya in (12 April 2024) | Latest Update on IPL 2024, Lok Sabha Election, PM Modi, VBA, Pune, Mumbai and Overall MaharashtraSaam TV

महायुतीच्या सलग दुसऱ्या मेळाव्याला पूनम महाजन यांची अनुपस्थित

चुनाभट्टीतील आजच्या महायुतीच्या मेळाव्याला पूनम महाजन यांची गैरहजेरी

आशिष शेलारांची मेळाव्याला हजेरी पण पूनम महाजन अनुपस्थित

नियोजित कार्यक्रमामुळे पुनम महाजन आल्या नाहीत अशी माहिती

राज्यसभेचा खासदार आहे पण माझी कर्मभूमी दक्षिण मुंबई आहे; मिलिंद देवरा

देशातील सर्वात श्रीमंत लोक मलबार हील परीसरात राहतात

अरविंद सावंत यांचा पराभव करावा लागणार आहे

चहावाला देशाचा पंतप्रधान आहेत आणि रिक्षावाला आपल्या राज्याचा मुख्यमंत्री आहे

मला काल एकनाथ शिंदे यांनी सांगितले मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे

हे महायुतीसाठी जिंकणे महत्त्वाचे

जो खासदार 10 वर्ष फक्त टीव्हीवर आलेत पण मतदार संघात फिरले नाहीत अरविंद सावंत यांच्यावर टीका

१७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा दावा

मोदी यांचा कडून गॅरंटीचा प्रचार केला जातो.

13 सप्टेंबर 2021 मध्ये ट्रेडिंग कंपनी चे 21 हजार कोटीचं ड्रग पकडण्यात आलं..

30% ने महागाई वाढली त्याची गॅरंटी मोदी सरकार देतात....

- मोदींची गॅरंटी आहे भाव घेवून शेतकऱ्याची लूट करायचं.

-मोदी ला पुन्हा सत्ता दिली तर ते लुटण्या शिवाय राहणार नाही.

- मोदी दुसरी गॅरंटी काय देतात, सरकारी निम सरकारी कंपनी बंद पडल्या.12 कोटी कर्मचारी बेरोजगार झाले

- मोदी म्हणतात मला पुन्हा संधी द्या, अजून मी नोकरी कमी करण्याशिवाय राहणार नाही,आणि बेरोजगार करण्या शिवाय राहणार नाही..

- 17 लाख कुटुंब यांनी भारतीय नागिकत्व सोडलं.

- मोदी गॅरंटी देतात, मला पुन्हा सत्ता द्या 20 लाख कुटुंब भारतीय नागिकत्व सोडणार..

धारावी पुनर्विकास होताना किती जण पात्र होतील माहिती नाही; आदित्य ठाकरे

आज च जे सरकार आहे ते एका माणसाचं सरकार आहे

धारावी च विकास हा आपल्याला देखील पाहिजे

अजून माहित नाही आहे धारावी पुनर्विकास होत असताना किती लोक पात्र असतील आणि किती अपात्र असतील

कुठे जाणार तुम्ही लोक

तुमची घर तुमचा डोळ्या समोर बाधली गेली पाहिजे

कोणाचा खत्यात १५ लाख आले आहेत का

महागाई कमी होणार बोले होते

आज जर विचार केला नाही तर देशात वेगळी लाट निर्माण होणार आहे

बिहार मधील तेजस्वी जाधव याचा देखील पाठीत खंजीर खुपसला गेला

कर नाही त्याला डर कशाला? अमित साटम यांंचा गजानन किर्तीकरांवर पलटवार

गजानन कीर्तिकर यांचे देशप्रेमापेक्षा पुत्र प्रेम वरचढ झालेले दिसतं

पुत्र प्रेमामुळे त्यांचे असे वक्तव्य दिसत आहे

कर नाही त्याला डर कशाला?

अमोल कीर्तीकर यांनी जर काही केले नसेल त्यांना घाबरण्याची गरज नाही

हेमंत गोडसे यांनी कार्यकर्त्यांसह कल्याणमध्ये घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट

जागा कोणत्या पक्षाला सुटणार हा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यावर बऱ्यापैकी तोडगा निघाल्याचे वरिष्ठांनी सांगितलं मात्र कुठली जागा कुठल्या पक्षाला मिळणार याबाबत अधिकृत रित्या घोषणा झालेली नाही

पारंपरिक ही जागा शिवसेनेनेच लढवलेली आहे

ही जागा शिवसेनेला सुटावी असा आमचा आग्रह तसा मुख्यमंत्री देखील आग्रह आहे

जो काही निर्णय आहे तो आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील

शेवटच्या टप्प्यात निवडणुका असल्या तरी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले त्यांचा प्रचार सुरू झालाय त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून अधिकृत उमेदवारी बाबत घोषणा करावी जेणेंकडून महायुतीच्या उमेदवाराला प्रचार करणे सोपे होईल या मागणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात महायुतीचा थोड्याच वेळात मेळावा

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा राहणार उपस्थित

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी महायुतीचा मेळावा

महायुतीच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुद्धा बॅनर लावला फोटो

मंगल प्रभात लोढा यांनी काल राज ठाकरे यांची घेतली होती भेट

उद्धव ठाकरे यांचा लोकल ट्रेनने प्रवास

आज पालघर येथे प्रचारस सभेला संबोधित केल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे बोईसर ते वांद्रे असा लोकल ट्रेनने प्रवास करत आहेत.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची उद्या महत्त्वपूर्ण बैठक, महायुतीच्या प्रचाराबाबत होणार चर्चा?

शनिवारी उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडणार. गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेची उद्याची ही पहिलीच बैठक आहे. महायुतीच्या प्रचाराबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.

माढा लोकसभेसाठी मुंबईत होणार बैठक, अजित पवार, देवेंद्र फडणवीस असणार उपस्थित

येत्या २ दिवसांनी या बैठकीचे आयोजन

मुंबईतील बैठकीला रामराजे निंबाळकर आणि रणजित निंबाळकर यांना एकत्र बसवून चर्चा केली जाण्याची शक्यता

अजित पवार, देवेंद्र फडणवीस , रामराजे निंबाळकर आणि रणजित निंबाळकर यांची एकत्रित बैठक होणार

विटा शहरात बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग

विटा मधील विवेकानंदनगरमध्ये आहे गोडाऊन

आग आटोक्यात आणण्यासाठी विटा मधील अग्निशमन पथकाचे प्रयत्न सुरू

कराड तालुक्यात वादळाचा तडाखा, अवकाळी पाऊस

कराड तालुक्यात वादळी पाऊस

कोळे, काले भागात पावसाची तासभर बॅटिंग

कोळे येथे झाड पडल्याने विद्युत पुरवठा खंडित

वाढवण बंदराचा विषय १९९५ मध्ये संपला, तो पुन्हा जिवंत कोणी केला?; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

जो विषय 95 साली शिवसेना प्रमुखांनी संपवला तो पुन्हा जिवंत कोणी केला . (वाढवण बंदर )

जीव गेला तरी चालेल पण वाढवण बंदर नको . अशी स्थानिकांची भूमिका .

पंत वाढवण बंदर रद्द अस बाळासाहेबांनी सांगितलं .

आता परत हवा कोणी भरली .

जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प राबविणार असाल तर राबवून दाखवा.

तुमच्या वर बुलडोझर फिरवू .

रावण विद्वान होता अस भागवत म्हणतात . पण तुम्ही बसवलेले विद्वान पण नाहीत . फक्त अहंकारी .,

परत आले तर रणगाडे आणून वाढवन बंदर करतील .

एकही भुल कमळ का फुल ही चूक महागात पडली

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधींच्या विदर्भात सभा

राहुल गांधी उद्या शनिवारी १३ एप्रिलला भंडाऱ्यात तर मल्लिकार्जून खर्गे रविवारी १४ ला नागपुरात घेणार सभा.

मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधींच्या प्रचार सभेला मविआचे प्रमुख नेते उपस्थित राहणार.

शहादा तालुक्यातील अनेक गावांना अवकाळीचा तडाखा

शहादा तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱयासह अवकाळी पावसाने झोडपले

जवळपास अर्धातास झालेल्या वादळी वाऱयाने बामखेडा,सारंगखेडा ,वडाळी , फेस गावातील पिकांचे नुकसान

फेस गावातील जिल्हा परिषद शाळेचे नुकसान

परिसरातल्या केळीच्या बागा झाल्या उद्धस्थ

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी

लोकसभा निवडणुकीत भाजपा पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवाराचं काम करणार नाहीत

गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आक्रमक

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करणार नाही भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका

गजानन कीर्तिकर हे सातत्याने भाजपा विरोधात बोलत असल्यामुळे भाजपा पदाधिकारी नाराज

भाजपा नेतृत्वाला पत्र देऊन त्यांच्या भावना कळवणार

परराष्ट्र मंत्रालयाकडून इराण, इस्रायलसाठी प्रवास सल्लागार सूचना जारी

सरकार कडून पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व भारतीयांना इराण किंवा इस्रायलला न जाण्याचा सल्ला

सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधण्याच्या आणि नोंदणी करण्याच्या सूचना

इराण आणि इस्रायल या दोन्ही देशात सध्या तणावाची परिस्थितीत

पुढील ४८ तास महत्वाचे असल्याने खबरदारी म्हणून सल्लागार सूचना जारी

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात अन्याय यात्रा झाली, आशिष शेलार यांची टीका

काँग्रेस नेत्यांनी न्याय का संकल्प, न्याय यात्रा काढत होते

पूर्ण देशभरातून यात्रा काढली मात्र महाराष्ट्रात तिचे रूपांतर अन्याय यात्रेत झालं

सांगलीवर अन्याय, उत्तर मुंबईमध्ये जबरदस्तीने गळ्यात टाकून अन्याय, दक्षिण मुंबईत मुंबई काँग्रेस अध्यक्ष सीट न मिळाल्यामुळे अन्याय

जी न्याय यात्रा म्हणून काढली महाराष्ट्रात त्यांच्या मित्र पक्षांनीच अशी वागणूक दिले की तिचं रूपांतर अन्याय यात्रेत झालं

ऑन महाराष्ट्र अध्यक्ष मुंबई अध्यक्ष काँग्रेस वाद

काँग्रेसच्या अंतर्गत विषयात जायचं नाही

ज्या पद्धतीने आत लाथा बुक्क्या मारल्या जातात या सगळ्यात एकत्रितपणा संघटन काँग्रेसमध्ये दिसून येत नाही

वाईट या गोष्टीचा वाटतंय ज्या बातम्या समोर येत आहेत नाना पटोले हे त्या ठिकाणी आमच्या भगिनीवर अन्याय करतात

वर्षाताई आमच्या भगिनी आहेत, त्या मुंबईतल्या आहेत मुंबईचे अध्यक्ष आहेत

आपल्या समाजातील भगिनींवर पक्षांतर्गत अशा पद्धतीने अन्याय करणे हे बातम्यातून समोर येते हे योग्य नाही

वाशिम जिल्ह्याला अवकाळी पाऊस, गारपीटीचा तडाखा

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात गारपीटसह पाऊस बरसला.. त्यामुळे शेतकऱ्याचे चिंतेत अधिकची भर पडली आहे...भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस बरसात असल्याने उन्हाळी पिकासह फळबागांना या पावसाने अधिकचा फटका बसताना दिसतोय.. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात साडेतीन हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याच समोर आल्या नंतर आज झालेल्या पाऊस आणि गारपिटीने आता हा आकडा वाढणार आहे..

शेतकऱ्यांच्या खतावर 18 टक्के GST, 400 रुपयांचा गॅस 1100 रुपयांवर; जयंत पाटील यांचा केंद्र सरकारवर निशाणा

शेतकऱ्यांच्या खतावर 18 टक्के GST आहे...

या देशात आमचं सरकार असताना कपड्यावर ,चपलेवर टॅक्स नव्हता, शेतकरी ज्या वस्तू वापरत होते ठवर टॅक्स नव्हता..

पण ता या सराकर ने सर्व गोष्टीवर टॅक्स लावला

सगळ्या देशात सिलेंडर वाटप केले आणि 400 रुपयांचा गॅस 1100 रुपयांवर गेला

आता प्रत्येकाच्या घरात जी बेकार पोर आहे ते यांचं पाप आहे

IIT मध्ये पास झालेल्या पोरांना नोकऱ्या लागत नाही

भुजबळ यांचा पराभव करणे अशक्य,  प्रकाश शेंडगे यांचा दावा

या पक्षाचा जन्मच आरक्षणाच्या लढाईतून झाला आहे

ही भावना असली तरी... मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुद्धा भूमिका आहे

पण, ते आरक्षण 50 टक्केच्या वर द्यावं.

आम्हाला आमचं आरक्षण वाचवायचं असेल तर, आमची सत्ता आल्यानंतर प्रत्येक जी आर पाहावं लागेल.

बेरोजगार, शेतकरी हे मुद्दे सुद्धा आहेतच

भुजबळ यांना कुठल्या पक्षातून उमेदवारी मिळाली तर ओबीसी समाजा सोबत असेल

भुजबळ यांचा पराभव करणे अशक्य आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

दुपारी अडीज वाजता मुख्यमंत्री होणार कोल्हापुरात दाखल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत होणार आढावा बैठक

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा मुख्यमंत्री घेणार आढावा

उद्या सायंकाळी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची होणार बैठक

ज्योती मेटे यांचे दीर रामहरी मेटे यांचा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय

शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असताना त्यांचे दीर रामहरी मेटे यांनी महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

लक्ष्मण हाके यांना माढ्यातून उमेदवारी, ओबीसी बहुजन पार्टीत करणार प्रवेश

लक्ष्मण हाके यांना माढ्यातून उमेदवारी

थोड्याच वेळात ओबीसी बहुजन पार्टीत करणार प्रवेश

लक्ष्मण हाक्के उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते

थोड्याच वेळात प्रकाश शेंडगे पत्रकार परिषद घेऊन करणार घोषणा

BRS नेत्या के कविता यांना ३ दिवसांची CBI कोठडी

BRS नेत्या के कविता यांना ३ दिवसांची CBI कोठडी

१५ एप्रिल पर्यंत के कविता यांना CBI कोठडी

CBI ने ५ दिवसांची मागितली होती कोठडी

के कविता यांचा मुक्काम आता CBI कोठडीत

छत्रपती संभाजीनगरमध्ये 6,652 बालके कुपोषित

महिला आणि बालविकास विभागाने जिल्ह्यात केलेल्या 2 हजार 883 अंगणवाड्यांच्या तपासणीतून धक्कादायक माहिती समोर आलीय. जिल्ह्यात 6 हजार 652 कुपोषित बालके आढळुन आले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे बालकांच्या पोषणावर परिणाम झाल्याच या तपासणीतून समोर आलय. दरम्यान या तपासणीमध्ये 1 हजार 503 बालके तीव्र कुपोषित तर 5 हजार 149 बालके मध्यम कुपोषित आहे. मात्र संप मिटल्या नंतर अंगणवाडी सेविका परत कामावर आल्याने कामे सुरू असली तरीसुद्धा समोर आलेली जिल्ह्यातील आकडेवारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे.

मोताळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, मका, ज्वारीच्या पिकांचं प्रचंड नुकसान

मोताळा - तालुक्यात आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली यामध्ये तालुक्यातील बोराखडी अंत्री पुन्हई यासह अनेक गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतातील मका व ज्वारीचे पीक पूर्णपणे झोपले असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून प्रशासनाने तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून होत आहे.

मोताळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट; मका ज्वारीचें अतोनात नुकसान

तालुक्यात आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली यामध्ये तालुक्यातील बोराखडी अंत्री पुन्हई यासह अनेक गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतातील मका व ज्वारीचे पीक पूर्णपणे झोपले असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून प्रशासनाने तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून होत आहे.

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा ओबीसी बहुजन पार्टीत प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लक्ष्मण हाके करणार प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीत प्रवेश

माढा लोकसभामधून, प्रकाश शेंडगे देणार लक्ष्मण हाके यांना उमेदवारी

लक्ष्मण हाके माढा लोकसभा मधून धनगर समाजाचा चेहरा

माढा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 लाख धनगर समाज आहे

सध्याचे भाजपाचे उमेदवार रंजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस SP चे संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दोघेही मराठा आहेत

मराठा समाजाच्या आंदोलनात, मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाची बाजू मांडली होती

Onion News: खाजगी कांदा लिलाव सुरु करण्याहून वाद हाणामारी,पत्रकारांना धक्का-बुक्की

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हमाल-मापारी यांनी बंद पुकारलेला असताना नाशिकच्या येवला बाजार समितीच्या नोंदणीकृत, व्यापारी यांनी खाजगी जागेत कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेतला याला शेतक-यांनी प्रतिसाद दिला असताना बाजार समिती बाहेर सुरु असलेल्या लिलावाला हमाल-मापारी यांनी विरोध केला आणि त्यातून शेतकरी व हमाल-मापारी यांच्यात वाद होऊन हाणामारीच्या घटना घडल्या. या संदर्भात बातमी करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना जमावातील काही लोकांनी धक्का-बुक्की केल्याची घटना घडली.

MVA News: भाजपसोबत मविआने लोकसभेच्या २० जागा फिक्स केल्या आहेत - प्रकाश आंबेडकर

भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीने फिक्स केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणा अशी काही जागांची नावं घेत त्यांनी या जागा फिक्स असल्याचं सांगितलं. निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आताच लावता येणार नाही. कारण या निवडणुकीवर जरांगे आणि ओबीसी हे दोन फॅक्टर मोठा परिणाम करणार आहेत, असं मतही आंबेडकर यांनी व्यक्त केले.

Nashik Lok Sabha Election: नाशिक लोकसभा मतदारसंघावरून पुन्हा ट्विस्ट

पौराणिक शहर असलेल्या नाशिकच्या जागेवर साधू-महंतांना लोकसभेवर जाण्याची संधी द्यावी

रणजित सावरकर यांची मागणी, नाशिकच्या जागेवरून पुन्हा नवा ट्विस्ट

नाशिक पौराणिक शहर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कर्तव्य क्षेत्र

नाशिकमधून लोकसभेवर जाण्यासाठी महंत अनिकेत शास्त्री यांच्यासारख्या महंतांना संधी द्यावी

रणजित सावरकर यांनी आज नाशिक दौऱ्यावर असताना केली मागणी

नाशिक दौऱ्यात रणजित सावरकर यांनी घेतली महंत अनिकेत शास्त्री यांची भेट

नाशिकच्या उमेदवारीच्या चर्चेवर शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची प्रतिक्रिया

नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मानणारा आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भेटीत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही जागा शिवसेनेसाठी कशी महत्वाची आहे, यासंदर्भात सांगणार आहोत. पुढील निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

माढानंतर आता नाशिक मतदारसंघासाठी बैठक

माढा लोकसभा मतदारसंघासाठी घेतलेल्या बैठकीनंतर आता अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची स्वतंत्र बैठक

नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती

नाशिक लोकसभेवरून महायुतीमध्ये आहे रस्सीखेच

माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा - अजित पवार

देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक

माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा

अजित पवारांचे कार्यकर्त्यांना निर्देश

रामराजे नाईक निंबाळकर यांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम न करण्याची भूमिका

त्यानंतर अजित पवार यांनी तात्काळ देवगिरी निवासस्थानी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक

आजच्या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघातील फलटणचे आमदार दीपक चव्हाण,

रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घाडगे यांसह नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर उपस्थित

भाजपचे माजी आमदार सानप आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा

भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची छगन भुजबळ यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा

काल दुपारी तब्बल दीड तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती

निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची सानप यांचे स्पष्टीकरण

मात्र, छगन भुजबळ मित्रपक्षाचेच आहेत. त्यामुळे आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचंय, असं सानप म्हणाले.

सानप आणि भुजबळ यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

भुजबळ महायुतीचे उमेदवार असणार अशी चर्चा सुरू असताना ही भेट झाल्यानं भेटीला महत्त्व

बाळासाहेब सानप यांना पक्षात डावलल्याचीही मागील काळात होती चर्चा

कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये लोकसभा उमेदवाराचा प्रचार? भाजप कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना धरले धारेवर

कोल्हापूरमधील कॉलेजमध्ये एका विशेष लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याच्या सूचना? कॉलेजच्या प्राचार्यांना भाजप कार्यकर्त्यांनी धरले धारेवर

कर्मचाऱ्यांना एक फॉर्म दिल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची निवडणूक आयोगावर टीका

नवी दिल्ली -

निवडणूक आयोग पक्षपातीपणाने वागत असल्याचा काँग्रेसचा आरोप

निवडणूक आयोगाकडे वेळ मागूनही ती देत नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे

दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशातील राजगढ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात

जयंत पाटील - राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट, चर्चांना उधाण

कोल्हापूर (Kolhapur)

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट

यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधील घरी झाली दोघांची भेट

जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे उपस्थित

जयंत पाटील यांच्याकडून हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना मदतीसाठी आमदार यड्रावकरांना घातलं साकडं

शिंदे गटांसोबत असलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण

धैर्यशील माने यांच्यावरील नाराजीमुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव देखील हातकणंगले लोकसभेसाठी होतं चर्चेत

रायगडमधील 'वंचित'चा उमेदवार जाहीर

रायगड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. महाडच्या कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. वंचितने काल आपली नऊ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. त्यात कुमुदिनी चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नांदेडच्या हदगावमध्ये सभा

नांदेड

हिंगोली लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी आज, शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे जाहीर सभा होणार आहे. काही वेळात मुख्यमंत्री शिंदे हे हदगाव येथे पोहोचतील. हदगाव शहरातील सुमन गार्डनमध्ये शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. बाबुराव कदम कोहळीकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांचे हदगाव हे होमग्राउंड आहे. त्यामुळे शिंदे यांच्या सभेकडे हिंगोलीसह नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील 'ससून' प्रशासनावर कारवाईची शिफारस

ससून सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल रुग्णाला उंदराने चावा घेतल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला होता.

या रुग्णाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती.

समितीने चौकशी करून आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे सादर केला

रुग्णालय प्रशासनावर कारवाईची शिफारस

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार प्रचार पत्रकावर बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो

बारामती लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मनसेचे राज ठाकरे यांचा देखील फोटो प्रसिद्ध करण्यात आहे. राज ठाकरे यांच्या फोटोनंतर रामदास आठवले, रासपाचे महादेव जानकर यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राजापूरमध्ये भाजपचा काँग्रेसला आणखी एक धक्का; बडा नेता हाती कमळ घेणार

राजापूरमध्ये भाजपचा काँग्रेसला आणखी एक धक्का

काँग्रेसचे कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर हाती कमळ घेणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा काँग्रेसला धक्का

रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १५ एप्रिलला होणार प्रवेश

रत्नागिरीतील एका समारंभात मांडवकरांचा भाजपात जाहीर प्रवेश

मांडवकरांकडे राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष पदाची जबाबदारी

Bengaluru's Rameshwaram Cafe: बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरण, दोघे ताब्यात

बेंगळुरू मधील रामेश्वरम् कॅफे स्फोट प्रकरण

NIA ने दोन व्यक्तींना घेतल ताब्यात

पश्चिम बंगाल मधून घेतल ताब्यात

अब्दुल मतीन, मुसाबिर हुसेन यांना घेतल ताब्यात

हेच दोन्ही मुख्य आरोपी असल्याचा NIA चा दावा

शरद पवारांनी त्यांची विचारसरणी स्वीकारण्यास  नकार दिल्याने पक्ष फुटला - जयंत पाटील

जयंत पाटील यांनी प्रफु्ल पटेल यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ' शरद पवारांना NDA नेण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न होते. ते तयार असते तर गेलेच असते ना? शरद पवार जाण्यासाठी कधीच तयार होते, या सगळ्या मंडळींच्या प्रश्न होता त्यांचे विचारसरणी स्वीकाराला नकार दिल्याने पक्ष फुटला.

जयंत पाटील यांनी प्रफु्ल पटेल यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ' शरद पवारांना NDA नेण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न होते. ते तयार असते तर गेलेच असते ना? शरद पवार जाण्यासाठी कधीच तयार होते, या सगळ्या मंडळींच्या प्रश्न होता त्यांचे विचारसरणी स्वीकाराला नकार दिल्याने पक्ष फुटला.शिंदे गटाकडून नाशिकच्या जागेसाठी अजय बोरस्ते यांना ग्रीन सिग्नल?

शिंदे गटाकडून नाशिकच्या जागेसाठी अजय बोरस्ते यांना ग्रीन सिग्नल?

- मुख्यमंत्र्यांकडून अजय बोरस्ते यांना बोलावणं,

अजय बोरस्ते ठाण्याकडे रवाना

- अजय बोरस्ते यांच्या नावाची गेल्या 4-5 दिवसांपासून सुरूय चर्चा

- महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटला ?

- हेमंत गोडसे यांच्या ऐवजी बोरस्ते यांना सेनेकडून चाल?

भरधाव वाहनाची गायीच्या कळपला धडक, धडकेत चार गायी जागीच ठार

वाहनाची गायीच्या कळपला धडक, धडकेत चार गायी जागीच ठार

यवतमाळच्या नेर जवळ वाळू वाहतुक करणाऱ्या टिपरने गायीच्या कळपला धडक,धडकेत जार गायी जागीच ठार तर वीस गायी गंभीर जखमी

नेर नजिक नियर ते शिरसगाव जवळील घटना,

वाळू वाहतुक करणाऱ्या टिपरची गायीच्या कळपला धडक ग्रामस्थ संतप्त,

टिपरचा चालक पसार,ग्रामस्थांकडून जखमी गायींना बाहेर काढण्याचं करताहेत प्रयत्न

या घटनेत चार गायी जागीच ठार तर वीस गायी गंभीर जखमी झाल्याची माहिती

येस बँक फसवणूक प्रकरणी मोठी अपडेट; ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक

येस बँकेचं ४०० कोटींची फसवणूक प्रकरण

आर्थिक गुन्हे शाखेने ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला केली अटक

आरोपी अजीत मेननला केरळ वरून करण्यात आली अटक

तीन वर्षांपासून आर्थिक गन्हे शाखा होती मागावर

आरोपी कॉक्स ॲण्ड कंपनीचे प्रवर्तक पीटर केरकर यांचा सहकारी

मेनन विरोधात बजावण्यात आलं होतं लूक आउट सर्क्युलर

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर सुभाष चौधरी यांची पुन्हा नियुक्ती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर सुभाष चौधरी यांची पुन्हा नियुक्ती

कुलगुरू पदाचा कार्यभार डॉ सुभाष चौधरी यांनी स्वीकारला

नागपूर विद्यापीठात विविध कामात गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवत सुभाष चौधरी यांना दीड महिन्यापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबित केलं होतं

राज्यपालांच्या या निर्णया विरोधात डॉक्टर सुभाष चौधरी हे उच्च न्यायालयात गेले होते.

उच्च न्यायालयाने कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या निलंबनाचा निर्णय रद्द केला.

सोबतच राज्यपालांना चार आठवड्यांचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली होती

मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्यपालांच्या वतीने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले नाही

त्यामुळे निलंबित कुलगुरू डॉ सुभाष चौधरी पुन्हा कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com