दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात ED कडून याचिका दाखल
केजरीवाल हे समन्स चे पालन करत नसल्याने कोर्टात धाव
कोर्टाने आज याचिका दाखल करून घेतली
7 फेब्रुवारीला कोर्टात होणार सुनावणी
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना ED ने 5 समन्स पाठवले आहेत मात्र केजरीवाल सहकार्य करत नसल्याने ED ने कोर्टात धाव घेतली आहे
झुंडशाहीने कोणी आरक्षण घेतले तर त्याला बाहेर काढले जाईल, असे निवाडे आहेत
उपोषणकर्त्यांनी मागणी केली की आरक्षण मिळाले नाही तर ओबीसी सवलत द्या, मग सर्व ओपन समाजाला द्या
काय चाललय समजत नाही
शिवसेनेचे दोन दिवसीय अधिवेशन होणार
पुढे ढकलण्यात आलेले अधिवेशन होणार
कोल्हापूरला होणार अधिवेशन
१६-१७ फेब्रुवारीला होणार अधिवेशन
पहिल्या दिवशी नेते पदाधिकारी यांचे भाषण मार्गदर्शन होणार
दुस-या दिवशी सायंकाळी सभा होणार
या अधिवेशना करता जय्यत तयारी करण्यात आलीये
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकी बाबत या अधिवेशनात होणार मोठी घोषणा
निवडणूक प्रचाराने मुद्दे जाहीर केले जाणार
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ग्रामीण राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पत्रकारांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी
हुल्लडबाज कार्यकर्त्यांकडून पत्रकारांना चुकीची वागणूक
माध्यमांचे कॅमेरे आणि फोटोग्राफरांना कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ
गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची सुनावणी संपली
पोलिसांनी मागितली १४ दिवसांची पोलीस कोठडी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाटक प्रकरण
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फोडलं
जय श्रीराम चा नारा देत भाजपचे कार्यकर्ते विद्यापीठात जाउन केली तोडफोड
शाई फेक करत काचेचे देखील तोडफोड कार्यकर्त्यांनी केली
देशभरात सध्या केंद्र सरकारच्या जाहिरातीत भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा उल्लेख आहे.
या विरोधात युवक काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे
भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांना पितृशोक
सुखदेव रामभाऊ बोंडे यांच वयाच्या ९१ वर्षी निधन
उद्या सकाळी 10 वाजता अमरावतीच्या अनिल बोंडे यांच्या निवासस्थाना वरून निघणार अंत्यसंस्कार
अनिल बोंडे यांचे वडील सुखदेवराव बोंडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक
कार्यकर्त्यांचा कोर्टाबाहेर गोंधळ सुरू आहे
गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
थोड्याच वेळात गणपत गायकवाड यांना उल्हासनगर येथील चोपडा कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
कळवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल
काळा पोलीस ठाण्यात हालचाली वाढल्या.
नवी दिल्ली -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अन्य नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार
आज संध्याकाळी मोदी-अडवाणी भेट होण्याची शक्यता
'भारतरत्न' जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं मोदी करणार अभिनंदन
शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे सुपुर्द केला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्युपिटरमध्ये जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांकडूनही माहिती घेतली. महेश गायकवाड यांना सहा बुलेट्स लागल्या होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पदाचा दिला राजीनामा
वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती
आम आदमी पक्षाचे सरकार आणि राज्यपाल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू होता 'संघर्ष'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी पोलिसांकडूनही घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ज्युपिटर रुग्णालयानं यासंबंधी मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध केलं आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते.
उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार गणपत गायकवाड आणि इतर आरोपीना व्हिसीद्वारे कोर्टात हजर करणार
व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्याची पोलिसांना परवानगी
कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा निर्णय
नवी दिल्ली
दिल्ली गुन्हे शाखेचे पथक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले
काल रात्री केजरीवाल यांनी नोटीस स्वीकारली नव्हती
त्यानंतर आज पुन्हा अधिकारी हे केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी घरी पोहोचले
पक्षाचे आमदार फोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा केजरीवाल यांनी केला होता आरोप
त्याच अनुषंगाने ही चौकशी करण्यासाठी पथक पोहोचले
केजरीवाल यांच्या घराबाहेर वाढवला पोलीस बंदोबस्त
केजरीवाल यांनी अजूनही नोटीस स्वीकारली नाही
भाजपकडून या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी दाखल केली होती तक्रार
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात राजभवनजवळ मालवाहू ट्रेलर उलटला
ब्रेमेन चौकातून येणारी वाहतूक बोपोडीच्या दिशेने वळवण्यात आली
ट्रेलर उलटल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती
गणेश खिंड रस्त्यावरील विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे.
या कामांसाठी आलेला मालवाहू ट्रेलर राजभवनजवळ चतु:शृंगी पोलीस ठाण्यासमोर वळवताना उलटला
आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
या अपघातामुळे ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडीमार्गे वळवण्यात आली.
या घटनेमुळे दररोज सकाळी विद्यापीठ चौकासमोर होणाऱ्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली
अमरावती
महाविकास आघाडीमध्ये रिपाइंला सहभागी करून न घेतल्यानं राजेंद्र गवई यांची नाराजी
लोकसभेच्या अमरावतीच्या जागेवर रिपाइंचे राजेंद्र गवई यांचा दावा
5 फेब्रुवारी रोजी अमरावतीच्या दर्यापूरमध्ये रिपाइंचा कार्यकर्ता मेळावा
रिपाइं गवई गटाचे नेते राजेंद्र गवई यांची माहिती
इंडिया आघाडीची अमरावतीची काँग्रेसची जागा रिपाइं गवई गटाला न दिल्यास आमच्यासाठी दरवाजे खुले
अमरावतीची जागा दिली नाही तर उमेदवाराला पाडणार, राजेंद्र गवई यांचा इशारा
रिपाइंची 48 पैकी 5 जागांची मागणी
अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात झालाय. ही घटना अकोला जिल्ह्यातील माना इथे घडली आहे. चारचाकी वाहनात प्रवास करणारी लोक मित्राच्या लग्नाला गुजरात वरून वरुडकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडलीय. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार भरधाव असलेल्या चारचाकी वाहनानं ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडलाय. या अपघातात वाहन चालक धीरज वैराळे राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा याचा जागीच मृत्यू झालाय. तर त्यातील अन्य चार जण गंभीर जखमी असून जखमींची उपचार मुर्तीजापुर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहेय.
काँग्रेसच्या कोट्यातून रघुराम राजन यांना उमेदवारी?
राजन अर्थतत्न तसंच मोदी सरकारच्या आर्थिक नितीचे टीकाकार
राजन यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यांच्या यात्रेत घेतला होता सहभाग
राजन यांच्याबरोबर काँग्रेस सरचिटणीस अविनाश पांडे यांच्या नावाचीही चर्चा
भाजप आमदार गणपत गायकवाडांची आमदारकी जाण्याची शक्यता, सूत्रांची साम टीव्हीला माहिती
आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हत्येचा प्रयत्न अन् शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल
गायकवाड यांच्यावरील गुन्ह्याची माहिती पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवल्याची माहिती
कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सध्या गोळीबारानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर व घराबाहेर पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट आणि महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आहे.
- सोलापुरात अजित दादांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स लागले आहेत.
- आगमनानंतर अजितदादांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेतलं. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
- आज संपूर्ण दिवसभर अजित पवार सोलापुरात विविध विकास कामांच उदघाटन,पक्ष मेळावे, पक्ष कार्यालय उदघाटन, पदाधिकाऱ्यांशी संवाद, महिला, अल्प संख्यांक घटकांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
सग -सोयऱ्याच्या राजपुत्रामुळे ओबीसींचे कुठलेही नुकसान होणार नाही ,ओबीसींना भयभीत करण्यात येत आहे. सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे, दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सांगत आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा कुठलाही विरोध नाही, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मंत्री असून ते ओबीसींच्या सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवत आहेत, अशी प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली.
,मराठा समाजाला आरक्षण देणार कसे, एकीकडे ओबीसीला भावनात्मक भडकावून, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून भाजपात जाण्याचे तयारी करीत आहेत. म्हणजेच हे दोन्ही नेते बबन तायवडे आणि छगन भुजबळ हे नागपूरकडे झुकले आहेत. हे उघड - उघड ओबीसींना मूर्ख बनवत आहेत असे विधान ओबीसी नेते, आरक्षण अभ्यासक , माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केले.
राज्य सरकारने मराठा समाजास ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याबाबत जो अध्यादेश काढला आहे तो चुकीचा आणि ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे सदरील अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने सकल ओबीसी बांधवांनी तहसील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे हिललाईन पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. थोड्याच वेळात तिघांनाही कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.