Exam : दहावी, बारावीच्या परीक्षांवरती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा बहिष्कार

ऑनलाइन परीक्षेत शंका आहे. त्यामुळे परीक्षा ऑफलाईनच व्हायला पाहिजेत अशी भूमीकाही महामंडळाने घेतली आहे.
Exam : दहावी, बारावीच्या परीक्षांवरती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा बहिष्कार
Exam : दहावी, बारावीच्या परीक्षांवरती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा बहिष्कार Saam TV
Published On

अविनाश कानडजे -

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे, शिवाय दहावी बारावीच्या परीक्षेसाठी (Tenth Twelfth Exam) आमच्या इमारती उपलब्ध करून देणार नसल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ (Maharashtra State Institute of Education Corporation)अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. शिवाय ऑनलाइन परीक्षेत शंका आहे. त्यामुळे परीक्षा ऑफलाईनच व्हायला पाहिजेत असंही वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.

आधीच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनू केलेल्या आंदोलनामुळे त्यांची परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन हे अद्याप स्पष्ट झालेलं नसतानाच आता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळांनेच परीक्षा ऑफलाईनच घ्या अशी भूमीका घेतल्याने नवे तर्क वितर्क लढवले जात आहेत.

Exam : दहावी, बारावीच्या परीक्षांवरती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा बहिष्कार
Hindustani Bhau बाहेर येईपर्यंत कोणतंही पाऊल उचलू नये - वकील अशोक मुळे यांचं विद्यार्थ्यांना आवाहन

दरम्यान शासनाकडून आम्हाला 2019 पासून सातव्या वेतन आयोगानुसार 5 टक्के अनुदान मिळाले नाही. तसंच प्रत्येक परीक्षेमध्ये घोळ होत असल्यामुळे शासनाने पवित्र पोर्टल (Pavitra Portal) रद्द करावे. तीन वर्षांमध्ये राज्य शासनाकडे 4 हजार कोटी रुपये बाकी आहेत. त्यातील फक्त 60 कोटी रुपये मंजूर केले आहे. तीन वर्षाचे वेतनेतर अनुदान मिळत नाही तोपर्यंत परीक्षेवर बहिष्कार टाकू असा इशारा देखील विजय नवल यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com