संजय गडदे
अंधेरी : खंडणीसाठी अंधेरीतील एका हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या ७ आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी (Police) फिल्मी स्टाईलमध्ये अटक केली आहे. अपहरण झाल्याच्या घटनेनंतर अवघ्या १३ तासातच पोलिसांनी (Kidnapping) अपहरणकर्त्यांच्या तावडीतून हॉटेल व्यवसायिकाची सुटका केली आहे. अनुप शेट्टी (वय ४५) असे हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून पोलीसांनी त्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका केली आहे. (Tajya Batmya)
अंधेरी पूर्व भागातील अंधेरी कुर्ला रोडवर अनुप शेट्टी यांचे वीरा रेसिडेन्सी नावाचे हॉटेल आहे. यात व्यवसायिक भागीदार म्हणून विजय ओखीरकर (४२ वर्षे) यास सोबत घेते. मात्र भागीदारीत वाद निर्माण झाल्यामुळे विजय वखिरकर याने आपले अडीच लाख रुपये शेट्टी यांच्याकडे पुन्हा मागितले. मात्र अनुप शेट्टी हे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या रागातून फिल्मी स्टाईलने सोमवारी दुपारी तीन वाजता हॉटेल वीरा रेसिडेन्सीजवळ अनुप शेट्टी यांच्यावर गोळीबार करून धमकावत गाडीत जबरदस्तीने टाकून सात जणांनी त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे खंडणीचे पैसे मागू लागले. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी एकूण बारा पथके तयार करून अपहरणकर्त्यांचा व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
फिल्मीस्टाईलने पकडले
अपहरणकर्त्यांच्या मागावर ठाणे शहापूरच्या दिशेने पोलिसांची पदके रवाना झाल्यानंतर अपहरणकर्ते शहापूर परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी शहापूर भागातील रस्त्यावर वाहने आडवी लावून अपहरण कर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये पोलिसांच्या गाड्या आपल्या गाडीने उडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी रस्त्यावर मोठे मोठे दगड टाकून अपहरणकर्त्या आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. तरी देखील अपारणकर्त्यांनी गाडी पुढे नेण्यासाठी खटाटोप केला. अखेर पोलिसांनी आपल्या जवळील बंदुका काढून अपहरणकर्त्यांवर रोखल्यानंतर आरोपी पोलिसांना शरण आले. व अपहृत हॉटेल व्यवसायिकाची सुखरूप सुटका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.