सांगलीत 'पुष्पा' चित्रपटाची पुनरावृत्ती रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मागील महिनाभरापासून प्रत्यकेला वेड लावलेला आणि प्रत्येकाच्या ओठांवरतीअजूनही ज्या चित्रपटीमधील गाणं गुणगुणलं ज्या जात आहे तो चित्रपट म्हणजे पुष्पा सर्वांना याची माहिती आता नव्याने सांगायला नको मात्र याच चित्रपटासारखी चंदन तस्करीची सांगलीमध्ये पुनरावृत्ती घडली आहे.
सांगलीत 'पुष्पा' चित्रपटाची पुनरावृत्ती रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
सांगलीत 'पुष्पा' चित्रपटाची पुनरावृत्ती रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाशविजय पाटील
Published On

सांगली : गेल्या महिनाभरापासून प्रत्यकेला वेड लावलेला आणि प्रत्येकाच्या ओठांवरतीअजूनही ज्या चित्रपटीमधील गाणं गुणगुणलं ज्या जात आहे तो चित्रपट म्हणजे पुष्पा सर्वांना याची माहिती आता नव्याने सांगायला नको मात्र याच चित्रपटासारखी चंदन तस्करीची सांगलीमध्ये (Sangli) पुनरावृत्ती घडली आहे. मात्र याच चित्रपटासारखी चंदन तस्करीची सांगलीमध्ये पुनरावृत्ती घडली आहे. रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तब्बल अडीच कोटी रुपयांचे चंदन जप्त करण्यात आले आहे. तर एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या चंदनतस्करीचे रॅकेट कर्नाटक असल्याचे समजते आहे.

सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी (Smuggling of sandalwood) केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती येत आंध्र प्रदेश आणि कर्नाटक (Andhra Pradesh and Karnataka) या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या 2 कोटी 45 लाख 85 हजाराचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन विभागाने धाड टाकून पकडले. यावेळी यासिन इनायतउल्ला (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) याला ताब्यात घेण्यात आले.

सांगलीत 'पुष्पा' चित्रपटाची पुनरावृत्ती रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
PM Modi Press Meet: भारतावर जगाचा विश्वास- पंतप्रधान नरेंद्र मोदी

आंध्र प्रदेश मधील जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी कशी केली जाते यावर प्रकाश टाकणारा चित्रपट पुष्पा नुकताच प्रदर्शित झाला होता. याची मोठी चर्चा सर्वत्र होती. अशाच प्रकारे रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाच्या साह्याने चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेले रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली.

पोलिसांनी मिरज – कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. कोल्हापूर जकात नाका येथे उड्डाणपूल येथे. फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा KA 13 6900 हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 2 कोटी 85 लाखाचे 983 किलो 400 ग्रॅम चंदन असल्याचे निदर्शनास आले. ते जप्त करण्यात आले आहे. याचा कर्नाटकशी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले तर हे रक्त चंदन नेमके आले कुठून याचा तपास सांगली पोलीस करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com