आगामी नागपूर मनपा निवडणूकीत भाजप २५ ते ३० टक्के उमेदवार बदलणार

नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकीत भाजप २५ के ३० टक्के उमेदवार बदलणार आहे. समाधानकारक कामगीरी नसणाऱ्या नगरसेवकांना डच्चू देण्यात येणार आहे.
आगामी नागपूर मनपा निवडणूकीत भाजप २५ ते ३० टक्के उमेदवार बदलणार
आगामी नागपूर मनपा निवडणूकीत भाजप २५ ते ३० टक्के उमेदवार बदलणार Saam Tv News
Published On

नागपुर महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकीत भाजप २५ के ३० टक्के उमेदवार बदलणार आहे. समाधानकारक कामगीरी नसणाऱ्या नगरसेवकांना डच्चू देण्यात येणार आहे अशी माहिती सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी दिली आहे. (BJP will change 25 to 30 percent candidates in the upcoming Nagpur Municipal Corporation elections)

हे देखील पहा -

आगामी नागपूर महापालिका निवडणुकीत सत्तापक्ष असलेला भाजप आपल्या 25 ते 30 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार आहे. या नगसेवकांची कामगीरी समाधानकारक नसल्यानं या नगरसेवकांना वगळणार आहे. त्यामुळं भाजप नगरसेवकांची धाकधूक वाढलीय. नागपूर महापालिकेत गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्यानं भाजप कुठलाही धोका पत्करायला तयार नाही.

आगामी नागपूर मनपा निवडणूकीत भाजप २५ ते ३० टक्के उमेदवार बदलणार
भाजपा कार्यालयात महिला सुरक्षित नाहीत; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप!

त्यामुळेच पाच वर्षात चांगली कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना भाजप डच्चू देणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप BJP आणि काँग्रेसमध्ये Congress आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महापालिकेमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपनं शहराचा बट्ट्याबोळ केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर महाविकास आघाडी सरकार विकास कामांसाठी निधी देत नाही, सरकारच्या दबावाखाली आयुक्त फाईल मंजूर करत नाही, असा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे शहरात सध्या काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com