भाजपा कार्यालयात महिला सुरक्षित नाहीत; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप!

भाजपचे पद देते, म्हणून महिलेला कार्यलयात बोलवून छेडछाड करण्यात आली.
भाजपा कार्यालयात महिला सुरक्षित नाहीत; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप!
भाजपा कार्यालयात महिला सुरक्षित नाहीत; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप! SaamTV

मुंबई : मुंबईच्या बोरिवली (Borivali) प्रभाग क्रमांक 16 च्या भाजप नगरसेविका अंजली खेडकर (BJP corporator Anjali Khedkar) यांच्या कार्यलयात एका पदाधिकाऱ्याने महिलेला बोलवून छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Congress spokesperson Sachin Sawant) यांनी त्यांच्या ट्विटर वरुन माहिती दिली आहे.

भाजपचे पद देते म्हणून महिलेला कार्यलयात बोलवून छेडछाड करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आता भाजपला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलेच धारेवरती धरले आहे. काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत याबद्दल ट्विट (Tweet) करून माहिती दिली आहे की भाजपाच्या महिला विरोधी कशी भूमिका आहे या मधून दिसत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.(Sachin Sawant alleges women are not safe in BJP office)

'इतर भाजपा नगरसेविका व नेत्यांनी तक्रार करणाऱ्या महिलेलाच मारहाण केली. ‌महिला भाजपा कार्यालयात सुरक्षित नाहीत व तीलाच छळले जाते आणि अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घातले जाते. महिला विरोधी भाजपाचा जाहीर निषेध! ज्यांनी प्रकरण दाबले त्या भाजपा नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे ‌' असं ट्विट सावंत यांनी केलं आहे तसेच राज्यात महिला सुरक्षा नाय आहेत त्या साठी भाजपचे बारा आमदार पत्र लिहतात आणि दुसरीकडे मात्र भाजपच्या कार्यालयात महिलांवरती अत्याचार होत आहेत हे फक्त ढोंगी आहेत आणि फडणवीस सरकारच्या (Fadanvis Goverment) काळातच महिलांवरती सर्वात जास्त अत्याचार झाल्याचही सचिन सावंत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान त्या महिलेवरती झालेल्या अन्याविरोधात बोरिवली पोलीस स्टेशन (Borivali Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बोरिवली मध्ये भाजपा नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयामध्ये महिलाचा विनयभंग झाल्यानंतर त्या महिलेनी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी (MP Gopal Shetty) व आमदार सुनील राणे (MLA Sunil Rane) यांना पत्र लिहून मदत मागितली मात्र मदत मिळाली नाही उलट त्या पीडित महिला वर तीन नगरसेविका मिळून मारहाण केल्यास अशा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी देश पातळीवरुण सुरु असल्याचही सावंत यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com