'संजय राऊत यांचा अहंकार आडवा येतोय, सत्तेचा माज बरा नव्हे', खासदार अनिल बोंडेंचा घणाघात

भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचीत खासदार अनिल बोंडे यांनी संजय राऊतांचा समाचार घेतलाय.
Anil Bonde and sanjay raut
Anil Bonde and sanjay rautsaam tv
Published On

अमरावती : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपवर सडकून टीका केली होती. घोडेबाजारातील घोड्यांमुळे महाविकास आघाडी सरकारवर (mva government) कोणताही परिणाम होत नाही,असा घणाघात राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे केला होता. राऊतांच्या या विधानाचा भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचीत खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी समाचार घेतलाय.

Anil Bonde and sanjay raut
Maharashtra Corona: काळजी घ्या! दिवसभरात कोरोना रुग्णांत लक्षणीय वाढ

संजय राऊत यांचा अहंकार आडवा येतोय. संजय राऊतांना निवडणूक समजली नाहीय. शिवसेनेने एक नंबरची उमेदवारी संजय पवार यांना का दिली नाही? सत्तेचा माज बरा नव्हे, अशा कठोर शब्दांत बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे. माध्यमांशी बोलताना बोंडे म्हणाले, आमदार मुक्ताताईला भेटून आनंद झाला. स्वतःची तब्येत बरी नसतानाही त्यांनी घर सोडून मोलाचं योगदान दिलं.

तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनीही आजारी असताना मतदानाचा हक्क बजावला. असे लोकप्रतिनिधी कर्तव्याची जाण ठेवतात. म्हणून आम्ही आमच्या विजयाचं श्रेय या दोघांना दिलं आहे. मी त्यांची भेट घेवून आभार व्यक्त केले. त्यांनी दोघांनी लवकर बरे होऊन समाजकारण पुन्हा सुरु करावे, अशी मी प्रार्थना करतोय. तसेच शिवसेनेवर टीका करताना बोंडे म्हणाले, त्यांनी संभाजी राजेंना फसवलं आणि त्यांच्या मावळ्याला देखील फसवले. छत्रपती संभाजीराजेंचा अपमान करण्यात आला आणि संजय पवारांचाही अपमान केला.

Anil Bonde and sanjay raut
मोठी बातमी : अकोला जिल्हा हादरला! बार्शी टाकळी जवळ भुकंपाचे धक्के

नाना पटोलेंनी एमआयएमच्या मतांचे संशोधन करावे. स्वतःच घर सांभाळता येत नाही आणि एमआयएमला शिकवायला निघाले आहेत, असा टोलाही बोंडे यांनी पटोले यांना लगावला. बाळासाहेब गेल्यापासून शिवसेना फसवण्याचं काम करत आहे.फसवणूकीशिवाय शिवसेनेला दुसरा धंदा नाही. सुहास कांदेंचं एक मत बाद झालं नसतं, तरी पराभव होणार होता. संजय राऊत यांनी संभाजीराजेंचा अपमान केला. मावळ्याचाही अपमान केला.सरकार चालवताना समन्वय नाही.महाराष्ट्राचं वाटोळं होतंय, असं म्हणत ठाकरे सरकारवर बोंडे यांनी तोफ डागली.

Edited by - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com