वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची चौकशी, VSIचं ऑडिट की अजितदादा टार्गेट?

Political Sugar War: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असताना भाजपनं अजित पवारांची कोंडी केलीय...मात्र ही कोंडी नेमकी कशी करण्यात आलीय? भाजपनं एका दगडात दोन पक्षी कसे मारले आहेत?
Government orders probe into Vasantdada Sugar Institute as political tension escalates between BJP and Ajit Pawar in Maharashtra.
Government orders probe into Vasantdada Sugar Institute as political tension escalates between BJP and Ajit Pawar in Maharashtra.Saam Tv
Published On

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महायुतीबाबत सूचक वक्तव्य केल्यानंतर 24 तासांच्या आतच सरकारने पवार काका पुतण्यांची कोंडी केल्याची चर्चा रंगलीय..कारण सरकारनं साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन थेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिलेत.. ही नियमित प्रक्रिया नाही तर भाजपने ठाण्यानंतर आपला मोर्चा बारामतीकडे वळवल्याचे संकेत आहेत, असा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलाय..

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट साखर उद्योगातील संशोधन आणि प्रशिक्षणाचं महत्वाचं केंद्र आहे. या संस्थेला दरवर्षी सरकारकडून 5 कोटींचं अनुदान दिलं जातं.. याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 1 रुपयाचा निधीही दिला जातो. या अनुदानाचा योग्य वापर होत नसल्याची शंका आल्याने मुख्यमंत्र्यांनी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत..

आता हे प्रकरण चांगलंच तापलंय.. त्यातच महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी चौकशीच्या आदेशांना दुजोरा दिलाय.. मात्र या मुद्द्यावरुन गदारोळ झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचा दावा फेटाळून लावलाय..

सहकारी साखर कारखाने हे दोन्ही राष्ट्रवादीची शक्तीस्थानं... आता भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याकडे वळवल्यानंतरही शरद पवार अध्यक्ष आणि अजित पवार संचालक असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या माध्यमातून भाजप पवारांच्या शक्तीस्थानावर अखेरचा घाव घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे...मात्र भाजपला कुबड्यांची गरज नसल्याचं शाहांनी विधान केल्यानंतर आता ज्या कुबड्यांच्या आधारावर सरकार उभं आहे त्यांना शक्तिहीन करून राज्यात केवळ भाजपचंच ट्रिपल इंजिन पळवण्याची तर रणनीती नाही ना असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com