मुंबई : हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) आगामी होणाऱ्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. गुढीपाडव्याच्या मनसे मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिंदीवरील भोंग्यांना कडाडून विरोध करत हिंदुत्वाचं रणशिंग फुंकलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात मनसे-भाजपच्या युतीच्या (MNS-BJP Alliance) चर्चांणा उधाण आलं. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला भाजपने वाढता पाठिंबा दिला. त्यानंतर मनसे ही भाजपचीच टीम असल्याचा सूर विरोधकांनी लावला. तसंच हिंदुत्वाचा मुद्यावरून उत्तर भारतीयांचा राज ठाकरेंना समर्थन मिळत आहे, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप-मनसे युती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये १ मे ला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेसाठी (MNS Rally) मनसे कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. त्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्याला जाऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे दरम्यानच्या काळात भाजप-मनसे युती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप-मनसे युतीबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
भाजप-मनसे युतीच्या शक्यतेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेली माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, भाजप-मनसे युतीची शक्यता अद्याप चर्चा नाहीये. संघाची अशा राजकीय गोष्टींमध्ये कुठलीही भूमिका नाही. याबाबत प्रस्ताव असल्यास भाजप योग्यवेळी योग्य निर्णय घेईल. भविष्यात काय प्रस्ताव येईल,याबाबत भाष्य करणे सध्या योग्य नाही.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.