'शरद पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र...'; आमदार गोपीचंद पडळकरांची टीका

ओबीसी आरक्षणच्या मुद्यावरूनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर आगपाखड केली आहे.
BJP mla gopichand padalkar has criticized NCP chief sharad pawar
BJP mla gopichand padalkar has criticized NCP chief sharad pawar Saam Tv
Published On

पंढरपूर : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर (Sharad Pawar ) टीकास्त्र सोडलं आहे. पवारांनी संस्कृती वर बोलू नये. पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल. पवारांना ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाची खरी हत्या पवारांनी केली आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ओबीसी आरक्षणच्या मुद्यावरूनही आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांनी पवार कुटुंबीयांवर आगपाखड केली आहे. (BJP mla gopichand padalkar has criticized NCP chief sharad pawar )

हे देखील पाहा -

पुढे पडळकर म्हणाले, 'तुमच्या बद्दलची सगळी माहिती महाराष्ट्राला झाली आहे. पूर्वी लोक तुमच्या विरोधात बोलत नव्हते. श्रीलंकेतील घराणेशाहीला कंटाळून लोकांनी उद्रेक केला. तसंच लोक पवार कुटुंबाच्या विरोधात रस्त्यावर उतरतील, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. आपल्या जवळच्या प्रस्थापितांना सत्तेत वाटा मिळावा, या साठीच पवारांची धडपड सुरु आहे. त्यांना ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही. त्यामुळे

BJP mla gopichand padalkar has criticized NCP chief sharad pawar
'यांचे राजकारण दोन तालुक्यांचे', दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

ओबीसी आरक्षणाची खरी हत्या पवारांनी केली आहे, असा खळबळजनक आरोप आमदार पडळकर यांनी केला. काँग्रेस फक्त वसुली करण्यात मशगुल आहे, त्याचे मंत्री परदेशात गेले आहेत. त्यांची अवस्था ना घर का ना घट का अशी झाली आहे. जेलमध्ये जाण्यापेक्षा त्यांना राज गादी मिळाली आहे. झोपायला बंगले मिळाले आहेत, म्हणत पडळकरांनी काँग्रेस मंत्र्यावर टीका केली. ओबीसी, मराठा यांच्या आरक्षणा विषयी काही देणे घेणे नाही, असे म्हणत पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com