एकनाथ शिंदे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध; सर्व बैठकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर

Eknath Shinde
Eknath ShindeSaamTvNews

गडचिरोली : जिल्हा नियोजन विकास समितीची सभा उद्या 29 एप्रिल रोजी आभासी पद्धतीने होणार आहे. मात्र या सभेआधीच जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधी (bjp leaders) पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात एकवटले आहेत. शिंदे यांच्या हुकूमशाही धोरणाविरोधात जिल्हा नियोजन विकास समितीच्या आगामी सर्व बैठकांवर बहिष्कार (Boycott meeting) घालण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Eknath Shinde
मुनगंटीवारांच्या 'त्या' कबुलीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, हा तर त्यांचा मोठेपणा!

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हुकूमशाही धोरणाविरोधात गडचिरोलीत भाजप लोकप्रतिनिधींनी कठोर पवित्रा घेतला आहे. यापुढे होणाऱ्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या सर्व बैठकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय भाजप लोकप्रतिनिधींनी पत्रपरिषदेत जाहीर केला. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आ कृष्णा गजबे उपस्थित होते.  जिल्हा नियोजनाच्या निधी वाटपात भाजप लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेले तीन वर्ष विकास निधीतील तरतुदी केवळ कागदोपत्रीच राहिल्याची टीका भाजपने केली आहे. दरम्यान पालकमंत्र्यांनी गेल्या तीन वर्षात केवळ पोकळ आश्वासने दिली. असा आरोप करण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे उद्या 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता याच जिल्हा नियोजन समितीची सभा आभासी पद्धतीने होत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिलीय.

Eknath Shinde
पालकमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाचा दिलासा; ९ मेपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर

पालकमंत्री शिंदे अभावानेच गडचिरोलीत येत असल्याने त्यांचे नियोजन भवनातील कार्यालयदेखील बंद अवस्थेत आहेत. अशी टीका भाजपने केली आहे. मुख्यमंत्रीपद हुकलेले महत्वाचे मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. आता विकास कामे होतील, ही आशा फोल ठरली आहे असेही आ. डॉ. होळी यावेळी म्हणाले.

दुसरीकडे सिरोंचा येथील पुष्कर मेळ्याला दहा कोटी रुपये निधी दिला असला तरी केवळ 63 लक्ष एवढाच खर्च झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अवतीभवती दलाल सक्रिय झाल्याचा घणाघाती आरोप करत पालकमंत्र्यांचे सर्व निर्णय हे दलाल घेत असल्याची गंभीर टीका आ. डॉ. होळी यांनी केलीय. त्यामुळे भाजप लोकप्रतिनिधींनी आजच्या पत्रकारपरिषदेत गेल्या तीन वर्षातील जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीतील निधीची तरतूद व प्रत्यक्ष वाटपाबाबतचा तक्ता सादर करून सत्यता दाखविली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com