मुनगंटीवारांच्या 'त्या' कबुलीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, हा तर त्यांचा मोठेपणा!

Supriya Sule
Supriya SuleSaam Tv

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maharashtra Government) स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष भाजपने (BJP) राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षावर टीका-टीप्पणी करण्याचं सत्र सुरुच ठेवलंय. महाविकास आघाडीत बिघाडी करुन सत्तेत येण्यासाठी भाजपकडून नेहमीच विरोधकांवर तोफ डागली जाते. मात्र, यावेळी भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारचं घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत (NCP) सकारात्मक प्रतिक्रिय दिली आहे. राष्ट्रवादीसोबत युती झाली नाही ही भाजपची चूक झाली. तसंच शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत युती केली नाही, ही पण आमची चूक असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी माध्यमांशी संवाद साधून मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीबद्दल सुधीर मुंनगंटीवार इतक्या प्रेमाने बोलत आहे, हे ऐकून मनाला आनंद झाला. एखादा माणूस इतक्या गोष्टी कबूल करत असेल आणि प्रायश्चित, चुक वगैरे एवढं म्हणत असेल हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अशी प्रतिक्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Supriya Sule
Kamalnath resigns : काँग्रेसमध्ये मोठी घडामोड; कमलनाथांनी विरोधी पक्षनेतेपद सोडलं

सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीबाबत केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांनी प्रश्न विचारला. यावेळी सुप्रिया सुळे उत्तर देताना म्हणाल्या, एखादा माणूस इतक्या गोष्टी कबूल करत असेल आणि प्रायश्चित, चुक वगैरे एवढं म्हणत असेल हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी योग्य अयोग्य, काय खरं, असं म्हणतचं नाही. पण राष्ट्रवादीबद्दल ते इतक्या प्रेमाने आज बोलतायत हे एकूण मनाला आनंद झाला. आणि कुठेतरी आशेचा किरण दिसतोय मला. की, कै. यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये जरी आमचे वैचारीक मतभेद असले, तरी मनातले विरोध जर कमी होऊन चांगली चर्चा झाली पाहिजे.

तसंच सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, एकामेकांचा विरोध जरुर झाला पाहिजे पण तो वैचारिक झाला पाहिजे. ते जर महाराष्ट्रात होणार असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते. वैचारीक मतभेद असलेच पाहिजेत, मतभेद नसावेत आणि कुठल्याही विषयामध्ये कटुता नसावी. आणि कुठल्याही कृतीतून राज्याचं नुकसान होत असेल तर त्या पक्षाची कृती अयोग्य असेल.

Edited By- Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com