Kamalnath resigns : काँग्रेसमध्ये मोठी घडामोड; कमलनाथांनी विरोधी पक्षनेतेपद सोडलं

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
Kamalnath resigns : काँग्रेसमध्ये मोठी घडामोड; कमलनाथांनी विरोधी पक्षनेतेपद सोडलं
Kamalnath resigns : काँग्रेसमध्ये मोठी घडामोड; कमलनाथांनी विरोधी पक्षनेतेपद सोडलंSAAM TV

भोपाळ: मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता गोविंद सिंह यांची निवड करण्यात आली आहे. कमलनाथ हे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा याआधीच सुरू होती. कमलनाथ यांनी काँग्रेस हायकमांडकडे पदाचा राजीनामा सोपवला आहे. मात्र, त्यांनी राजीनामा का दिला, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Kamalnath resigns : काँग्रेसमध्ये मोठी घडामोड; कमलनाथांनी विरोधी पक्षनेतेपद सोडलं
राज ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी; 6 हजार पोलिस, 720 SRPF जवानांसह चोख सुरक्षा

गेले अनेक दिवस वेगवेगळ्या मुद्द्यांवरून कमलनाथ वादात सापडले आहेत. विधानसभेच्या कार्यवाही संबंधित टिप्पणी करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता. भाजपच्या नेत्यांची बडबड ऐकण्यासाठी सभागृहातील कामकाजात सहभागी होत असल्याचे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर भाजपनं आक्षेप नोंदवला होता. तसेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. हा वाद अजून शमला नाही, तोच कमलनाथ यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गोविंद सिंह यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

Kamalnath resigns : काँग्रेसमध्ये मोठी घडामोड; कमलनाथांनी विरोधी पक्षनेतेपद सोडलं
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवेशाची ऑफर; भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

कोण आहेत गोविंद सिंह?

गोविंद सिंह यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. गोविंद सिंह हे सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. आता त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. मात्र,त्यांच्या निवडीवरून आतापासूनच राजकारण सुरू झालं आहे. भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदी एससी, एसटी किंवा ओबीसी प्रवर्गातील कोणत्याही नेत्याची निवड केली नाही. ही बाब त्यांच्यासाठी अपमानास्पद आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. गोविंद सिंह हे दिग्विजय सिंह यांचे जवळचे मानले जातात.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com