Sudhir Mungantiwar : 'त्यांच्या सारखं केवळ चहा-बिस्किटं खाऊन बैठका संपविल्या नाही, जनतेच्या हिताचे निर्णय झाले'

दाेघे असले तरी या सरकारनं राज्याचे हिताचे निर्णय घेतले.
sudhir mungantiwar, uddhav thackeray
sudhir mungantiwar, uddhav thackeraysaam tv
Published On

Sudhir Mungantiwar : राज्यातील शेतक-यांना भरीव मदत देण्यासाठी राज्य सरकार निश्चितच प्रयत्न करीत आहे. सध्या मिळत असलेली मदत पूरेशी नाही हे माझ्या देखील कानावर आलं आहे. प्रशासकीय चुकांमुळं असे घडलं असेल. सध्याचं सरकार जनतेच्या हिताचं काम करीत आहे. मागच्या सरकारनं केवळ चहा-बिस्किटं खाऊन बैठका संपविल्या असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मविआस लगावला. मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी आज विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बाेलत हाेते.

राज्याच्या हिताचे निर्णय

मंत्रिमंडळाचे खाते वाटप पंधरा ऑगस्टपूर्वी होईल असे सांगतानाच खाते नाही म्हणून काम थांबलेले नाही असं मुनगंटीवार यांनी नमूद केले. ते म्हणाले दोघांचे मंत्रिमंडळ होते तेव्हाही आणि आता विस्तार झाल्यानंतरही राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. मागील सरकारनं तीन बैठकात एकही निर्णय घेतला नाही. केवळ चहा-बिस्किटे खाऊन बैठक संपवली, असा टोलाही त्यांनी लगावला.

sudhir mungantiwar, uddhav thackeray
Ratnagiri : 'उद्धव ठाकरे देव नाहीत, ते सांगताहेत ते सर्व खरं नाही'

त्यांच्याप्रती सहानुभूती आहे

हे बिनचेहऱ्याचे सरकार असल्याची टीका आज सामनातून करण्यात आली. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, सरकार गेल्यानंतर अशी वक्तव्ये केली जातात. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. आमची त्यांच्याप्रती सहानुभूती आहे.

sudhir mungantiwar, uddhav thackeray
Nana Patole : काॅंग्रेस मित्रांना दगा देत नाही; भाजपसह नाना पटाेलेंचा मित्र पक्षास टाेला

शेतकऱ्यांना भरीव मदत देऊ

पूरग्रस्त शेतकऱ्यांना चार-पाचशे रुपयांची मदत करून त्यांची थट्टा करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यावर, मुनगंटीवार यांनी यापुढे असे होणार नाही, असे आश्वासन दिले. अधिकारी किंवा प्रशासनाच्या चुकीमुळे असा प्रकार कुठे होत असेल तर त्याची लगेच दखल घेतली जाईल आणि शेतकऱ्यांना भरपूर मदतीचा हात दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

sudhir mungantiwar, uddhav thackeray
Dongaon : साेन्याच्या मण्यांचा पाऊस पडलाे हाे....! गर्दीमुळं मुंबई नागपूर महामार्ग ठप्प

हे पहिल्यांदाच घडलं नाही

बारा आमदारांची यादी राज्यपालांनी रोखून धरण्याच्या बाबतीत मुनगंटीवार यांनी, तो राज्यपालांचा अधिकार आहे, असे सांगितले. यावर मी बोलणे योग्य नाही. मात्र हे पहिल्यांदाच घडलेले नाही, असेही ते म्हणाले.

Edited By : Siddharth Latkar

sudhir mungantiwar, uddhav thackeray
Latur News : अंबाजोगाई रोडवर बॉम्बच्या अफवेने एकच खळबळ !

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com