नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषीचा काहीही संबंध नाही. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही, तर या शेतकऱ्यांना घेऊन तुमच्या नाका-तोंडात कांदा घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. (Maharashtra Politics News In Marathi)
हे देखील पाहा -
नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुईमध्ये कांदा परिषदेचे आयोजन केले होते. निफाड तालुक्यातील रुईमध्ये कांदा परिषद ही सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित पार पडली. या परिषदेत प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली. प्रवीण दरेकर म्हणाले, राज्यात कृषी मूल्य आयोग नाही, त्यामुळे केंद्रापर्यंत आवाज पोहचत नाही. फडणवीस सरकारच्या काळात पीक विमा शेतकऱ्यांना मिळायचाय आता पीक विमा कंपन्यांकडे जात आहे. कंपन्यांच्या मर्जीप्रमाणे पीक विमा चालणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषीचा काही संबंध नाही, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर घणाघात केला.
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, 'कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही, तर या शेतकऱ्यांना घेऊन तुमच्या नाका-तोंडात कांदा घातल्याशिवाय राहणार नाही.केंद्राच्या योजनेतून शेतकरी आणि सामान्यांचं भलं होत असेल,तर केंद्राला श्रेय मिळेल म्हणून मुद्दाम सरकार मॅचिंग ग्रँट देत नाही. हे अवदसा सरकार आहे.केंद्राचा पैसा तसाच पडून आहे. मोदींना, फडणवीसांना श्रेय मिळू नये, म्हणून लोकांची अवदशा झाली तरी चालेल पण सरकार मॅचिंग ग्रँट देत नाही, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर केला.
'जे होतंय ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे होत आहे. नाचता येईना अंगण वाकडे, असं राज्य सरकार आहे .सर्व केंद्र सरकारवर ढकलायचं, असा राज्य सरकारचा रडीचा डाव आहे, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.